Kisan Sabha Farmer March
Kisan Sabha Farmer March Agrowon
ताज्या बातम्या

Kisan Sabha : किसान सभेचा उद्या अकोले ते लोणी पायी मोर्चा

Team Agrowon

Nagar News :नैसर्गिक आपत्ती (Natural Calamity) व राज्यात सुरू असलेल्या नीतिभ्रष्ट राजकारणाचा परिणाम म्हणून शेतकरी, कामगार, शेतमजूर, कर्मचारी श्रमिकांचे मूलभूत प्रश्न अत्यंत तीव्र झाले आहेत. राज्यातील राजकीय अस्थिरतेमुळे सामान्य जनतेचे व विकासाचे प्रश्न संपूर्णपणे बाजूला फेकले गेले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसाठी किसान सभेच्या (Kisan Sabha) पुढाकाराने २६, २७ आणि २८ एप्रिल रोजी अकोले ते लोणी असा राज्यव्यापी पायी मोर्चा (Farmer March) काढण्यात येत आहे.

अखिल भारतीय किसान सभा, सीटू, बांधकाम कामगार फेडरेशन, अखिल गुरव समाज संघटना तसेच शेतमजूर युनियन, जनवादी महिला संघटना, डीवायएफआय, एसएफआय या समविचारी संघटनांच्या सहभागाने आयोजित हा मोर्चा तीन दिवस पायी चालून, महसूल व दुग्धविकासमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या लोणी येथील कार्यालयावर धडकणार आहे. मोर्चातील मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यास मोर्चाचे रूपांतर लोणी येथे बेमुदत महामुक्काम आंदोलनात करून लढा तीव्र केला जाणार आहे.

राज्यात मागील दोन हंगामात अतिवृष्टीने शेतकऱ्यांची पिके संपूर्णपणे बरबाद केली. सरकारने या पिकांच्या झालेल्या नुकसानीसाठी मदत देण्याच्या मोठमोठ्या घोषणा केल्या.

प्रत्यक्षात मात्र कोठेही मदत करण्यात आली नाही. वन जमिनी, देवस्थान, इनाम, वक्फ, वरकस, आकारीपड, गायरान व घरांच्या तळ जमिनी, नावे करण्याची वारंवार आश्वासने दिली गेली मात्र कार्यवाही नाही.

कोविड संकटात १७ रुपये लिटरप्रमाणे दूध विकावे लागल्याने हतबल झालेले दूध उत्पादक आता थोडे व्यवसायात पुन्हा उभे राहू लागले असताना, पुन्हा एकदा केंद्र सरकारने दुग्धपदार्थ आयात करण्याच्या हालचाली सुरू करून दुग्ध उत्पादकांचे जीणे हैराण केले आहे.

राज्यातील अंगणवाडी कर्मचारी, आशा, सुपरवायझर, आहार कर्मचारी, बांधकाम कामगार, अर्धवेळ परिचर, घरेलू कामगार त्यांचे प्रश्न तीव्र झाल्याने हैराण आहेत. दूध, कापूस, सोयाबीन, हिरडा, तूर, हरभरा यासारख्या पिकांना रास्त भावाची हमी, दुग्धपदार्थ आयात करून दुधाचे भाव पाडण्यास विरोध,

जमीन अधिग्रहणास योग्य मोबदला, शेतकऱ्यांना व निराधारांना पेंशन, सर्वांना घरकुले, कर्ज व वीजबिल माफी, शेतीला सिंचनासाठी धरणांचे पाणी, बांधकाम कामगारांना मेडिक्लेम व घरकुल तसेच आशा कर्मचारी,

आशा सुपरवायझर, अंगणवाडी ताई, पोषण आहार कर्मचारी, अर्धवेळ स्री परिचर, घरेलू कामगार यांचे प्रश्न घेऊन राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या लोणी येथील कार्यालयावर राज्यव्यापी पायी मोर्चा काढण्यात येत आहे.

या मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन डॉ. अशोक ढवळे, जे. पी. गावीत, उमेश देशमुख, डॉ. अजित नवले, किसन गुजर, सुभाष चौधरी, चंद्रकांत घोरखाना, संजय ठाकूर, डॉ. उदय नारकर, सावळीराम पवार, सुनील मालुसरे, रडका कलांगडा, अर्जुन आडे, यशवंत झाडे, सिद्धप्पा कलशेट्टी, उद्धव पौळ, माणिक अवघडे, शामसिंग पाडवी, इरफान शेख, रमेश चौधरी, चंद्रकांत धांगडा, चंद्रकांत वरठा, विजय काटेला, शंकर सिडाम, अजय बुरांडे, गोविंद आर्दड, अनिल गायकवाड, महादेव गारपवार, अमोल वाघमारे, सदाशिव साबळे आदींसह पदाधिकाऱ्यांनी केले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Kharif Season : खरिपात तूर, कपाशी, हळद क्षेत्रवाढीचा अंदाज

Sludge Issue : गाळयुक्‍त खाडीमुळे चिरनेरवासी त्रस्‍त

Dam Water Stock : धरणांच्या पाणीपातळीत घट

Uttarakhand Forest Fire : सर्वोच्च न्यायालयाच्या कानउघडीनंतर थेट १० जणांचे निलंबन; ७ वननिरीक्षकांना कारणे दाखवा नोटीस

Agrowon Sanvad : चांगल्या कापूस उत्पादनासाठी एकात्मिक कीडनियंत्रण करावे

SCROLL FOR NEXT