Kharif Season
Kharif Season Agrowon
ताज्या बातम्या

Kharif Season : पावसाची दडी, खरीप धोक्यात

Ganesh Kore

Nashik Kharif Season Crisis: यंदा पावसाळ्याच्या सुरुवातीपासूनच असमाधानकारक पाऊस झाल्याने आणि खरिपातील ऐन पिकांच्या उगवणीच्या काळातच पावसाने दडी मारल्याने पुरंदर-जेजुरी तालुक्यातील खरीप धोक्यात आला आहे.

अनेक शेतकऱ्यांनी अद्याप पेरण्याच केलेल्या नाहीत, तर ज्यांनी केल्या त्यांची पिके पाण्याविना सुकून चालली आहेत. तर पशुधनासाठीदेखील चारा टंचाईचे सावट निर्माण झाले आहे. या परिस्थितीमुळे यामुळे यंदा दुष्काळाच्या भीतीने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे.

हिवरे (ता.पुरंदर) येथील दत्तात्रेय निवृत्ती गायकवाड हे शेतकरी गेल्या अनेक वर्षांपासून एक एकर शेती खंडाने कसत आहेत. पावसाच्या आशेवर आणि उपलब्ध पाण्यावर त्यांनी अर्धा एकरावर दुधी भोपळ्याची लागवड केली. विहिरीच्या पाण्यावर कसेबसे उत्पादन सुरू झाले. मात्र ऐन वाढीच्या अवस्थेतच पावसाने फटका दिल्याने दुधी भोपळ्याचे उत्पादन घटले आहे.

दुधीनंतर काटेरी वांगी लावण्याचे त्यांचे नियोजन होते. त्यासाठी रोपवाटिकेमध्ये रोपांची नोंदणी देखील केली. मात्र पाऊसच नसल्याने वांगी लावू की नको, असा प्रश्‍न त्यांच्या पुढे आहे. तरीपण पाऊस येईल या आशेवर त्यांनी रोपांची लागवड करण्याचे धाडस केले आहे. यासाठी त्यांनी शेतात ठिबक सिंचनांच्या नळ्या अंथरण्याची लगबग सुरू केली आहे.

पाऊसपाण्याबाबत ते म्हणाले, ‘‘जूनपासून म्हणावा असा पाऊसच झालेला नाही. फक्त ढग येतात आणि जातात. जोरदार पाऊसच न झाल्याने ओढ्यांना, विहिरींना अद्याप पाणीच आलेले नाही. विहिरी आटत आहेत.

रात्रभर विहिरीत झऱ्याचे थोडे पाणी साचते. ते घरच्या वापराला आणि गुरांना पुरते. एवढ्या पाण्यावर शेती होत नाही. पण पावसाच्या आशेवर लावलेले दुधी भोपळ्याचे पीक वाळू लागले आहे. वांगी लावण्याचे नियोजन होते पण ते फसले आहे,’’ अशी व्यथा त्यांनी बोलून दाखविली.

साकुर्डे (ता. पुरंदर) येथील शेतकरी निवृत्ती हिंगणे हे त्यांच्या वयोवृद्ध सहकाऱ्यासोबत सोयाबीन लागवडीसाठी वावर तयार करत होते. पावसाने दडी मारल्याने अद्यापही त्यांची सोयाबीनची लागवड झालेली नाही.

दोन एकरांवर ते सोयाबीन, भुईमूग आणि बाजरीचे उत्पादन घेतात. पावसाच्या आशेवर भुईमूग आणि बाजरीची पेरणी केली आहे. त्यांची पण वाढ समाधानकारक नसल्याचे त्यांनी सांगितले. त्यांच्या शेताच्या बाजूनेच ओढा जातो. विहीरही आहे. पण ऐन पावसाळ्यात विहीर आणि ओढा कोरडा पडल्याने ते चिंताग्रस्त आहेत.

बापूराव खैरे (जेजुरी) यांची दीड एकर शेती असून, त्यांनी दोन वेळा बाजरी पेरली मात्र पावसाअभावी उगवलीच नसल्याची व्यथा त्यांनी सांगितली. बाजरीसह ज्वारी, मक्याची लागवड केली. ती पिकेही पाण्यावाचून जळू लागली आहेत.

नाझरे धरण कोरड पडले आहे, विहिरीला पाणी नाही अशी अवस्था आहे. यामुळे आता त्यांनी बोअरवेल खोदण्याचा निर्णय घेतलाय. पाणाड्याने १०० फुटांवर पाणी सांगितले असल्याने त्या आशेवर बोअर घेण्याचे धाडस करत असल्याचे खैरे यांनी सांगितले. ‘‘नशिबाने पाणी लागले, नाही तर काय करणार,’’ अशी उद्वग्निताही त्यांनी व्यक्त केली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Pre Monsoon Precautions : मॉन्सूनपूर्व सर्व कामे यंत्रणांनी वेळेत पूर्ण करावीत

Agriculture Fertilizer : खतांचे दोन लाख २० हजार टन आवंटन जिल्ह्यासाठी मंजूर

Illegal Seeds : सीमावर्ती भागात बेकायदा बियाणे गुणनियंत्रणच्या रडारवर

Pre-Kharif Review Meeting : गावनिहाय पीक उत्पादन आराखडे वेळेत तयार करावेत

Agriculture Cultivation : रत्नागिरीत लागवडीखालील क्षेत्र ४ हजार हेक्टरने घटले

SCROLL FOR NEXT