Kartiki Vari Agrowon
ताज्या बातम्या

Kartiki Vari : ‘कार्तिकी वारीचा’चा उद्या सोहळा, वारकऱ्यांच्या गर्दीने पंढरी गजबजली

उपमुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते सपत्नीक होणार महापूजा

Radhika Mhetre

अॅग्रोवन वृत्तसेवा
सोलापूर ः श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनाची आस ठेवून शुक्रवारी (ता. ४) होणाऱ्या कार्तिकी वारीच्या (Kartiki Vari) सोहळ्यात सहभागासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून वारकरी (Varkari) पंढरपुरात दाखल होत असून, पंढरपुरातील वर्दळ चांगलीच वाढली.

एकीकडे वारकऱ्यांची लागलेली रीघ आणि दुसरीकडे हरिनामाचा जयघोष आणि टाळ-मृदंगाच्या गजराने बुधवारी (ता.२) अवघी पंढरी दुमदुमून गेली. दरम्यान, शुक्रवारी पहाटे अडीच वाजता श्री विठ्ठल-रुक्मिणीची कार्तिकी वारीची शासकीय महापूजा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सपत्नीक होणार आहे.
आषाढी-कार्तिकी या वर्षातील दोन मोठ्या वाऱ्या समजल्या जातात.

आषाढीला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आणि कार्तिकीला उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते शासकीय महापूजा करण्याची परंपरा आहे. त्यानुसार ही महापूजा होणार आहे. कार्तिकीच्या या सोहळ्यात सहभागासाठी गेल्या दोन-तीन दिवसांपासून राज्याच्या कानाकोपऱ्यातून दिंड्या पंढरपुरात येऊ लागल्या आहेत. शहरातील विविध मंदिरे, मठ, धर्मशाळांमधून भजनाचे सूर आळवले जात आहेत. अनेक ठिकाणी प्रवचने आणि कीर्तने रंगली आहेत.

मंदिर परिसरासह नगरप्रदक्षिणा मार्गावर तसेच चंद्रभागा वाळवंटात वारकऱ्यांची रेलचेल वाढली आहे. श्री विठ्ठल-रुक्मिणीमातेचे दर्शन २४ तास खुले करण्यात आले आहे. दर्शनरांगांसह मुखदर्शनाच्या रांगेतही वारकऱ्यांची गर्दी आहे. दर्शन मंडपामध्ये वारकऱ्यांना पाणी आणि चहाची मोफत व्यवस्था करण्यात आली आहे.

दर्शनरांगेत आज किमान १० हजारांपर्यंत वारकरी उभे होते. चंद्रभागेतील दशमीच्या स्नानाला विशेष महत्त्व असल्याने शुक्रवारी रात्रीपर्यंत पंढरीत आणखी गर्दी वाढणार आहे. दर्शनरांग आणि मंदिर परिसरात मंदिरातील थेट दर्शनासाठी चार एलईडी स्क्रीनही बसवण्यात आल्या आहेत. मंदिर परिसरात सोई-सुविधांसह सुरक्षेच्या दृष्टीने प्रशासन आणि पोलिसांनी चोख व्यवस्था ठेवली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Weather Alert: कोकणात उष्ण व दमट हवामानाचा अंदाज; काही भागात पावसाची शक्यता

Well Subsidy Scheme: सरकारकडून नवी विहीर खोदण्यासाठी ४ लाख तर दुरुस्तीसाठी मिळणार १ लाख रुपये अनुदान; जाणून घ्या अर्ज प्रक्रिया!

Farmer Demand: कर्जमाफीतील प्रलंबित प्रकरणे निकाली काढा; अन्यथा दिवाळीत आंदोलन : लक्ष्मीकांत कौठकर

Drought Water Management: ‘मानवलोक’ने घेतला दुष्काळ मुक्तीच्या कामांचा वसा

Moringa in Drought: दुष्काळात शेवगा पीक ठरु शकते फायदेशीर

SCROLL FOR NEXT