Kartike Ekadashi
Kartike Ekadashi Agrowon
ताज्या बातम्या

Kartiki Ekadashi : पंढरपुरात चार नोव्हेंबरला कार्तिकी वारीचा सोहळा

टीम ॲग्रोवन

सोलापूर ः कार्तिकी एकादशीचा (Kartike Ekadashi) सोहळा पंढरपुरात येत्या शुक्रवारी (ता. ४) पार पडत असून, प्रशासन आणि पोलिस या दोन्ही स्तरावर सध्या वारीचे नियोजन सुरू आहे. या दिवशी पहाटे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Phadnvis) यांच्या हस्ते सपत्निक श्री विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा होणार आहे.

आषाढीसह कार्तिकी वारीला वारकरी परंपरेत महत्त्व आहे. आषाढीची शासकीय महापूजा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आणि कार्तिकीची महापूजा उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्याची परंपरा आहे. त्यानुसार मंदिर समितीचे सहअध्यक्ष हभप गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी मंदिर समिती सदस्यांसह नुकतीच उपमुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेऊन वारकरी पटका, वीणा व श्रींची मूर्ती भेट देऊन त्यांना निमंत्रण दिले.

या वेळी आमदार बालाजी किणीकर, मंदिर समितीचे सदस्य श्रीमती शकुंतला नडगिरे, हभप ज्ञानेश्वर देशमुख जळगावकर, ॲड. माधवी निगडे, हभप शिवाजीराव मोरे, हभप प्रकाश जवजाळ, आचार्य तुषार भोसले, मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी संजीव जाधव, व्यवस्थापक बालाजी पुदलवाड उपस्थित होते.

दरम्यान, वारीच्या पार्श्वभूमीवर पंढरपुरात प्रशासनाकडून जोरदार तयारी सुरू आहे. स्वच्छता, पिण्याच्या पाण्यासह चंद्रभागा नदी परिसर आणि ६५ एकर क्षेत्रावरील सोई-सुविधांचा आढावा घेण्यात येत आहे. कोरोनामुळे गेल्या दोन वर्षांत पंढरपुरात वारकऱ्यांची वर्दळ कमी राहिली. पण आता वातावरण पूर्ववत होत असल्याने गर्दी वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन नियोजन करण्यात येत आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Rain : विदर्भात पुढील ५ दिवस पावसाचा अंदाज; राज्यात ठिकठिकाणी वादळी पावसाचा अंदाज

Drought 2024 : देशातील प्रमुख धरणात पाणीसाठा घटला; पाणीसंकट गंभीर ?

Sludge Remove Campaign : ‘घरणी’तील गाळ उपसा मोहिमेची जिल्हाधिकाऱ्यांनी केली पाहणी

Water Scarcity : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ४१२ गावांना ६७८ टॅंकर्सद्वारे पाणीपुरवठा

Parbhani city Water supply : अखेर भर उन्हाळ्यात तोडलेला वीजपुरवठा सुरळीत; परभणी शहराला पाणीपुरवठा सुरळीत

SCROLL FOR NEXT