Taag Crop Agrowon
ताज्या बातम्या

Taag Crop : ताग पीक जोमात

ताग, सोयाबीन, कोरडवाहू कापूस, मका आदी पिकांची स्थिती बरी आहे. पिके जोमात असून, त्यांची चांगली वाढ झाली आहे.

टीम ॲग्रोवन

जळगाव ः खानदेशात अतिवृष्टीने (Wet Drought)पूर्वहंगामी कापूस, उडीद, ज्वारी पिकाची हानी झाली आहे. परंतु ताग,(Taag) सोयाबीन,(Soybean) कोरडवाहू कापूस, (Cotton)मका आदी पिकांची स्थिती बरी आहे. पिके जोमात असून, त्यांची चांगली वाढ झाली आहे.

तागाची लागवड जळगाव जिल्ह्यात जळगाव तालुक्यातील गिरणा व तापी काठी केली जाते. खानदेशात सुमारे दीड हजार हेक्टरवर ताग पीक आहे. त्याची लागवड मागील १० वर्षात कमी झाली आहे. पण चोपडा, अमळनेर, जामनेर, भडगाव आदी भागांतही काही शेतकरी अजूनही तागाची लागवड करतात.

जुलैच्या अखेरीस लागवड झाली होती. पाऊसमान चांगले झाल्याने त्याची वाढही चांगली झाली आहे. कुठलीही फवारणी त्यात करावी लागलेली नाही. अतिपावसातही त्याची कुठलाही हानी झालेली नाही. अत्यल्प खते व कमी खर्चात पीक वाढले आहे. यामुळे शेतकऱ्यांत समाधान आहे.

मागील चार हंगाम पीक चांगले येत आहे. कारण पाऊसमान चांगले असून, मागील तीन हंगामात सप्टेंबर व ऑक्टोबरमध्येही पाऊस झाला. यंदाही सप्टेंबरमध्ये चांगला पाऊस झाला. आता फक्त एक वेळेस सिंचन करून पीक हाती येईल. सध्या ताग पिकात फुले लगडली आहेत. शेंगा ऑक्टोबरच्या सुरवातीला पक्व होतील.

जमिनीत ओलावा असल्याने शेंगाही जोमात वाढतील, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. मका, कापूस, सोयाबीनची चांगली वाढ पावसाचा परिणाम सोयाबीन, मका व कोरडवाहू कापूस पिकातही सकारात्मक दिसत आहे. मका पिकाची चांगली वाढ झाली आहे. कणसांत दाणे पक्व झाले आहेत. कोरडवाहू कापूस पीकही निरोगी व जोमात आहे. तसेच सोयाबीनमध्ये शेंगांत दाणे पक्व होत आहेत. कोरडे वातावरण पुढील काही दिवस राहिल्यास ही पिकेही जोमात येतील, असे दिसत आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

livestock Vaccination: पशुवैद्यक महाविद्यालयातर्फे इटलापूर येथे पशुधनाचे लसीकरण

Mahareshim Abhiyan: हिंगोलीत महारेशीम अभियानात १२० शेतकऱ्यांची नोंदणी

Watermelon Disease Control: अवकाळीनंतर कलिंगडावर रोगांचा धोका! कसे करावे नियंत्रण?

Sugarcane Production Drops: ऊस पिकाच्या उत्पादनात मोठी घट

Krushi Kumbh Exhibition: ‘कृषी कुंभ’ प्रदर्शनाचे आयोजन नेटके,मात्र शासकीय यंत्रणांची उदासीनता

SCROLL FOR NEXT