Jayakwadi Dam Agrowon
ताज्या बातम्या

Jayakwadi Dam : जायकवाडी धरण भरले

मराठवाड्यासाठी वरदान ठरणारा जायकवाडी (नाथसागर) प्रकल्प १०० टक्के भरला आहे. त्यामुळे शेती, पिण्याच्या पाण्यासह औद्योगिक वसाहतीसाठी लागणाऱ्या पाण्याचा प्रश्‍न मिटला आहे.

टीम ॲग्रोवन

पैठण, जि. औरंगाबाद : मराठवाड्यासाठी वरदान ठरणारा जायकवाडी (Jayakwadi Dam) (नाथसागर) प्रकल्प १०० टक्के भरला आहे. त्यामुळे शेती, पिण्याच्या पाण्यासह औद्योगिक वसाहतीसाठी लागणाऱ्या पाण्याचा प्रश्‍न मिटला आहे.

यंदा २५ जुलैपासून जलाशयातून गोदावरी नदीच्या पात्रात धरणाच्या वक्रदरवाजामधून विसर्ग सोडण्यात आलेला आहे. आतापर्यंत ४ हजार ६९१.०६२८ दलघमी, अर्थात १६५ टीएमसी पाण्याचा विसर्ग गोदावरी नदीच्या पात्रात सोडला आहे.

सध्या प्रकल्पात १०२ टीएमसी पाणीसाठा आहे. या वर्षी एकूण पाण्याची आवक २२१.३५ टीएमसी आहे. सध्या प्रकल्पात जिवंत पाणीसाठा ७६, तर मृत पाणीसाठा २६ टीएमसी आहे. प्रकल्पात एकूण १०२ टीएमसी पाणीसाठा आहे.

गेल्या चार वर्षांपासून जायकवाडी नाथसागर सतत भरत असल्याने आपत्ती व्यवस्थापन व पूरनियंत्राचे काम वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली लाभक्षेत्र विकास औरंगाबादचे मुख्य अभियंता बी. के. गवळी, लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाचे अधीक्षक अभियंता समाधान सब्बीनवार, कार्यकारी अभियंता प्रशांत जाधव, उपविभागागीय अभियंता अशोक चव्हाण, उपविभागागीय अभियंता ज्ञानदेव शिरसाट, धरण अभियंता विजय काकडे आदींनी व्यवस्थित हाताळले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Loan: शेतकऱ्यानं जीवन संपवल्यास बँका जबाबदार- महसूलमंत्री बावनकुळे

Sita Herbal Farm: अल्पभूधारक महिलांच्या ‘सीता हर्बल फार्म’ची वनौषधी उद्योगापर्यंत झेप

Crop Insurance Compensation: शेतकऱ्यांचे डोळे पीक विमा भरपाईकडे

Agricultural Cost Inflation: येत्या वर्षातही वाढणार शेतीवरील खर्च, खाद्य महागाई

Horoscope 5 October 2026 : कठीण परिस्थितीचा धैर्याने सामना कराल

SCROLL FOR NEXT