Water Issue Agrowon
ताज्या बातम्या

Jat Water Issue : जतच्या वंचित गावांचा पाणीप्रश्न कायमस्वरूपी सोडवू

म्हैसाळ पाणी योजना सोलरवर चालविण्यासाठी केंद्र शासनाने निधी मंजूर केला आहे. त्यामुळे वीजबिलाचा प्रश्न सुटणार आहे.

Team Agrowon

सांगली ः जिल्ह्यातील जास्तीत जास्त क्षेत्र सिंचनाखाली (Irrgation) आणण्याचा निर्धार आहे. विशेषत: जत तालुक्यातील वंचित गावांना पाणी देण्यासाठी (Mhaisal Water Canal) म्हैसाळ विस्तारित योजनेतील वर्षानुवर्षे प्रलंबित असलेली कामे आपल्या सरकारने तीन महिन्यांत (Water Scheme) गतिमान केली आहेत.

या योजनेतील कामांसाठी ९८१ कोटी रुपयांची निविदा नुकतीच प्रसिद्ध करण्यात आली आहे. यामुळे जत तालुक्यातील ६५ गावांतील सिंचनाच्या पाण्याचा (Irrigation In rural) प्रश्न कायमस्वरूपी सोडवला जाईल, अशी ग्वाही कामगार मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे (Dr. Suresh Khade) यांनी दिली.

सांगली येथील पोलीस संचलन मैदानावर भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या ७३ व्या वर्धापन दिनी आयोजित मुख्य शासकीय समारंभाचे ध्वजवंदन पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांच्या हस्ते उत्साहात झाले.

या वेळी खासदार संजय पाटील, महापौर दिग्विजय सूर्यवंशी, आमदार सुधीर गाडगीळ, जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी, पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेली, महानगरपालिका आयुक्त सुनील पवार, जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीच्या अध्यक्षा नंदिनी आवडे, अपर जिल्हाधिकारी डॉ. स्वाती देशमुख, अपर पोलीस आंचल दलाल, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक दीपक चव्हाण, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. सुधीर नणंदकर, स्वातंत्र्य सेनानी माधवराव माने आदी उपस्थित होते.

पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे म्हणाले, की म्हैसाळ पाणी योजना सोलरवर चालविण्यासाठी केंद्र शासनाने निधी मंजूर केला आहे. त्यामुळे वीजबिलाचा प्रश्न सुटणार आहे.

जिल्ह्यात पंतप्रधान किसान सन्मान योजनेचे ४ लाखांहून अधिक शेतकरी लाभार्थी आहेत. आतापर्यंत २ लाखांहून अधिक शेतकऱ्यांना ४५ कोटींपेक्षा जास्त रुपयांचा ११ वा हप्ता वितरित करण्यात आला आहे.

७० हजारांहून अधिक लाभार्थ्यांना १२ व्या हप्त्याचे १४ कोटींहून अधिक रुपये वितरित करण्यात आले आहेत. उर्वरित शेतकऱ्यांना लाभ देण्याची प्रक्रिया सुरू आहे.

विमानतळासाठी प्रयत्नशील

डॉ. खाडे म्हणाले, की जिल्ह्यात महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत नियमित कर्जफेड करणाऱ्या ५६ हजारांहून अधिक शेतकऱ्यांना पहिल्या टप्प्यात २०५ कोटींपेक्षा अधिक अनुदान वितरित केली आहे.

दुसऱ्या टप्प्यामध्ये २४ हजारांपेक्षा जास्त शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण केलेले असून त्यांची रक्कम त्यांच्या खात्यात लवकरच जमा करण्यात येणार आहे.

सांगली जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी शासन कटिबद्ध आहे. सांगली जिल्ह्यात उद्योग, व्यापार, निर्यातीला चालना देण्यासाठी विविध प्रयत्न करण्यात येत आहेत. यामध्ये विमानतळ करण्यासाठी प्रयत्नशील आहोत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Mahayuti Press Conference : महाराष्ट्रातील हा ऐतिहासिक विजय असून लाडक्या बहिणींनी अंडरकरंट दिला; महायुतीच्या पत्रकार परिषदेतून शिंदे, फडणवीस, अजित पवार यांची मविआवर टीका

Onion Cultivation : एक लाख हेक्टरपर्यंत पोहोचले कांदा लागवड क्षेत्र

Sangli Vidhansabha Election : सांगलीत भाजपचं मायक्रो प्लॅनिंग; आर. आर. आबांच्या मुलाने वादळात दिवा लावला

Lumpy Skin Disease : दिघंचीमध्ये ‘लम्पी’चा विळखा

Agrowon Podcast : कांदा बाजारभाव दबावात; कापूस, सोयाबीन, कांदा तसेच काय आहेत गहू दर?

SCROLL FOR NEXT