jal Jeevan Mission Agrowon
ताज्या बातम्या

Jal Jivan Mission : खेड्यापाड्यांना जल‘स्वातंत्र्य’

Water Supply Scheme : पालघर जिल्ह्यात घरोघरी नागरिकांना पाणी मिळावे, यासाठी जलमिशन योजना आखली गेली आहे.

Team Agrowon

Vasai News : पालघर जिल्ह्यात घरोघरी नागरिकांना पाणी मिळावे, यासाठी जलमिशन योजना आखली गेली आहे. या अंतर्गत ग्रामीण भागातील तहानलेल्या १३ गावांसाठी २१ कोटीची योजनेची निविदा प्रक्रिया पूर्ण करून कार्यादेश देखील संबंधित कंत्राटदाराला देण्यात आले आहेत. लवकरच कामाला सुरुवात होणार असल्याने ग्रामीण भागातील नागरिकांना पाणी समस्येपासून लवकरच मुक्तता मिळणार आहे.

डोक्यावरील हंडा उतरणार...

एकीकडे पाण्यासाठी ग्रामीण भागातील जनतेला पायपीट करावी लागते. उन्हाळ्यात डोंगराळ भागातील वस्तीला अधिक फटका बसतो. दुर्भिक्ष्य निर्माण झाल्यास पाण्यासाठी वणवण सहन करताना महिलावर्गाचे हाल होतात.

डोक्यावर हंडा, कळशी घेत मैलभर चालावे लागते. त्यामुळे नागरिकांना घरोघरी पाणी मिळावे, म्हणून सरकारने जलजीवन योजना सुरू केली आहे. पालघर जिल्ह्यातील अनेक गाव-पाडे अद्यापही तहानलेले आहेत.

त्यांची तहान भागवण्यासाठी योजना जलदगतीने पूर्ण करण्याचे काम सुरू आहे. आमदार हितेंद्र ठाकूर, आमदार क्षितिज ठाकूर, आमदार राजेश पाटील यांनी पाठपुरावा केला. तसेच सरपंच असताना दिवंगत अरुण पाटील यांनी देखील ग्रामीण भागातील खेड्या-पाड्यातील गावांना पाणी मिळावे, म्हणून सातत्याने प्रयत्न केले होते.

योजनेत समाविष्ट गावांची नावे

पारोळ

मेढे

तिल्हेर

आंबोडे

माजिवली

आदणे

भिणार

शिरवली

करंजोन

कळंबोन

सायवन

देपीवली

वडघर

वसईचे आमदार हितेंद्र ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली खेड्यापाड्यांतील वस्तीला पाणी मिळावे, यासाठी पाठपुरावा सुरु होता. त्याला यश प्राप्त झाले आहे. पावसाळ्यानंतर या कामाला गती येणार आहे. पाण्यापासून कोणी वंचित राहू नये, याकरिता योजना कामी येणार.
राजेश पाटील, आमदार

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shalinitai Patil Passes Away: माजी मंत्री शालिनीताई पाटील यांचे निधन

Sugarcane Price: प्रतापगड कारखान्याचा प्रतिटन एकरकमी ३३५० रुपये दर

Wheat Rust Disease: गव्हावरील तांबेरा रोगाचे नियंत्रण करण्यासाठी महत्त्वाच्या टिप्स

Flood Relief: भूम तालुक्यात पूरग्रस्तांना ९० कोटींचे अनुदान वाटप

Loan Recovery Issue: कर्जमाफीची घोषणा; तरीही ऊसबिलातून वसुली सुरूच!

SCROLL FOR NEXT