Agri Tourism
Agri Tourism Agrowon
ताज्या बातम्या

Agri Tourism Conference : आंतरराष्ट्रीय कृषी पर्यटन परिषद १५ आणि १६ मे रोजी

Team Agrowon

Pune News : बारामती येथील कृषी पर्यटन विकास संस्था आणि अमेरिकास्थित जागतिक कृषी पर्यटन संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने १५ आणि १६ मे दरम्यान आंतरराष्ट्रीय कृषी पर्यटन परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. ही परिषद व्हर्चूअल पद्धतीने (झूमवर) होणार आहे, अशी माहिती कृषी पर्यटन विकास संस्थेचे संचालक पांडुरंग तावरे यांनी दिली.

यंदाच्या जागतिक कृषी पर्यटन दिवसाचे थिम ‘ग्रीन ग्रोथ ऑफ व्हिलेजेस थ्रू ॲग्री टुरिझम’ (कृषी पर्यटनातून गावांचा हरित विकास) अशी आहे. या आंतरराष्ट्रीय परिषदेला ४० देशातील ५०० हून अधिक लोकांनी नोंदणी केली आहे.

तर परिषदेला ३० हून अधिक देशातील कृषी पर्यटन विषयातील शेतकरी, शिक्षण, सरकारी अधिकारी, बँकर्स, संशोधक, तसेच पर्यटन क्षेत्रातील विशेष काम करणारे वक्ते आमंत्रित करण्यात आले आहेत.

जागतिक कृषी पर्यटन संघटनेचे अध्यक्षा डॉ. लिसा चेस (व्हरमॉट युनिव्हर्सिटी यूएसए) या प्रमुख पाहुण्या आहेत. तसेच डॉ. रोहणा (श्रीलंका), श्रीमती स्कॉटी जोन्स (लेअपींग लाम्ब फार्म्स यूएसए), चाडली चोळल्यास, डॉ. थॉमस स्ट्रेंडफेनेंद्र (इटली) हे मार्गदर्शक म्हणून उपस्थित राहणार आहेत.

तर श्रीमती टेलर (साऊथ आफ्रिका), श्रीमती मारिया (युगांडा), श्रीमती कॅरोलिन मिल्लर (स्कॉटलंड), श्रीमती मॅरिजके (न्यूझीलंड), श्री. डेविड ग्लिसपे (कॅनडा), कुमार बट्टा (जपान), जॉन स्टॅनली (ऑस्ट्रेलिया), हंस एम्बर्सर (ऑस्ट्रिया) यांचा समावेश आहे.

यानिमित्ताने कृषी पर्यटन पुरस्कार अवॉर्ड्स २०२३ देण्यात येणार आहे. यंदा महाराष्ट्रातून नाशिक येथील बसवंत ॲग्रो टुरिझम फार्म, वाशीम येथील भूमी कृषी पर्यटन केंद्र, पुणे येथील आनंदमळा कृषी पर्यटन केंद्र, ठाणे येथील दीर्घायू कृषी पर्यटन केंद्र, तसेच फिलिपिन्स येथील नेस्टलीन्ग प्लेस इंटिग्रेटेड फार्म, यूएसए येथील लेअपींग लॅम्बस फार्म्स, नागालँड येथील टिझू व्हॅली फार्म्स यांना कृषी पर्यटन पुरस्कार २०२३ जाहीर झाले आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Pandharpur News : २ जूनपासून भाविकांना घेता येणार श्री विठ्ठल-रखुमाईचं पदस्पर्श दर्शन!

Summer Heat : दिवसा उकाडा, रात्री तडाखा

Soybean Seeds : उगवणशक्ती तपासूनच सोयाबीनचे घरचे बियाणे वापरावे

Water Crisis : महाडला पाणीटंचाईचे उग्ररूप

Water Crisis : जिंतूर तालुक्यात जलसंकटाची गडद छाया; सेलू तालूक्याला प्रशासनाचा आधार सोडणार आवर्तन

SCROLL FOR NEXT