Agri Tourism
Agri TourismAgroowon

Agri Tourism : अधिक उत्पन्नासाठी शेतीसोबत पूरक व्यवसायासाठी प्रयत्न हवे

शासनाच्या वतीने शेतकऱ्यांना प्रोत्साहन म्हणून विविध पुरस्कार दिले जातात.
Published on

Buldana News : जिल्‍ह्यातील शेतकऱ्यांनी कृषी पर्यटनाप्रमाणेच (Agritourism) इतर पूरक व्यवसाय (Agri Business) केल्यास अधिक आर्थिक उत्पन्न मिळू शकते. यादृष्टीने प्रयत्न व्हावेत, असे आवाहन जिल्हा परिषद कृषी विकास अधिकारी अनिसा महाबळे यांनी केले.

चिखली तालुक्यात आयोजित जिल्हा कृषी मासिक चर्चासत्राच्या वैरागड येथे समारोपीय कार्यक्रमात त्या बोलत होत्या.

या वेळी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे (Dr. Panjabrao Deshmukh Agricultural University) शास्त्रज्ञ डॉ. सी. पी. जायभाये, डॉ. देशमुख, डॉ. देशपांडे, प्रयोगशील शेतकरी पंढरीनाथ गुंजकर, तालुका कृषी अधिकारी अमोल शिंदे आदी व्यासपिठावर उपस्थित होते.

Agri Tourism
Agriculture Department : कृषी आयुक्तांकडून अधिकारी, कर्मचाऱ्यांचा गौरव

शासनाच्या वतीने शेतकऱ्यांना प्रोत्साहन म्हणून विविध पुरस्कार दिले जातात. अशा पुरस्कारांसाठी प्रत्येक तालुक्यातून अधिकाधिक प्रस्ताव दाखल कसे होतील यासाठी तालुकास्तरीय कृषी यंत्रणांनी प्रयत्न केले पाहिजेत, असेही श्रीमती महाबळे यांनी सुचवले.

येत्या १३ मार्चला वाशीम कृषी संशोधन केंद्रावर ज्वारीसंदर्भातील महत्त्वाचा कार्यक्रम होत असून या ठिकाणी उपस्थित राहण्याबाबत शास्त्रज्ञ डॉ. जायभाये यांनी आवाहन केले.

सावरखेड येथे विवेक खेते यांच्या अत्याधुनिक बॉयलर पोल्ट्री युनिटची पाहणी केली. अमडापूर येथील विठोबा उथळे यांच्या शेतात फुले रेवती या ज्वारी वाणास भेट दिली.

डासाळा येथे साहेबराव पैठणे यांनी लागवड केलेल्या नागपुरी संत्रा बागेस भेट दिली. गणेश दुधाळे सुरती ज्वारीचीही पाहणी केली.

Agri Tourism
Agrowon Podcast : नाफेड गुजरातमध्येही कांदा खरेदी करणार

समारोपीय कार्यक्रम वैरागड येथील अमोल साठे यांच्या सह्याद्री कृषी पर्यटन स्थळी झाला. त्यांनी कृषी पर्यटन हा एक शेतीला जोडधंदा सुरू केला.

चर्चासत्राचे सूत्रसंचालन चिखली तालुका कृषी अधिकारी अमोल शिंदे यांनी केले. आभार मंडळ कृषी अधिकारी डी. व्ही. आरमाळ यांनी मानले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com