Heavy Rain Agrowon
ताज्या बातम्या

Pune Rain Update : सर्वदूर संततधार

Pune Rain : गेल्या दहा ते बारा दिवसांपासून धरणक्षेत्रात मुसळधार पाऊस कोसळत आहे. मुळशी पाठोपाठ लोणावळा घाटमाथ्यावर १०७ मिलिमीटर, शिरोटा ६८, ठोकरवाडी ६१, वळवण ७७, कुंडली ६२ मिलिमीटर पाऊस पडला.

Team Agrowon

Pune Rain News : जिल्ह्यातील धरणक्षेत्रात पावसाचा जोर कमीअधिक होत आहे. घाटमाथ्यावर जोर अधिक आहे. मुळशी घाटमाथ्यावर पावसाची संततधार सुरू आहे. गुरुवारी (ता. २७) सकाळी आठ वाजेपर्यंत येथे सर्वाधिक १७७ मिलिमीटर पाऊस पडला.

गेल्या दहा ते बारा दिवसांपासून धरणक्षेत्रात मुसळधार पाऊस कोसळत आहे. मुळशी पाठोपाठ लोणावळा घाटमाथ्यावर १०७ मिलिमीटर, शिरोटा ६८, ठोकरवाडी ६१, वळवण ७७, कुंडली ६२ मिलिमीटर पाऊस पडला.

त्यामुळे भात खाचरे तुडुंब भरून वाहत आहेत. ओढे, नाले, धबधबे खळाळून वाहत आहेत. नद्यांच्या पाणीपातळीत वाढ होत आहे. सध्या मुठा खोऱ्यातील धरणक्षेत्रात मध्यम, नीरा खोऱ्यातील काही धरणक्षेत्रात हलका, तर कुकडी खोऱ्यातील धरणक्षेत्रात तुरळक सरी बरसल्या. पवना धरणक्षेत्रात ८२ मिलिमीटर पाऊस पडला. विसापूर, वीर, उजनी धरणक्षेत्रात पावसाची उघडीप होती. परंतु गुरुवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत धरणात ७.०३ टीएमसी पाण्याची आवक झाली.

धरणक्षेत्रापाठोपाठ हवेलीतील वाघोली मंडलात १४, थेऊर १२.५, उरुळीकांचन १२.८ मिलिमीटर पाऊस पडला. मुळशीतील माले ६५.८, मुठे ४५.५, घोटावडे ११ मिलिमीटर, तर पौड, थेरगाव, पिरंगुट मंडलांत तुरळक पाऊस पडला. भोरमधील निगुडघर ३७, आंबवडे २०.५, तर भोर, भोलावडे, नसरापूर, किकवी, वेळू, संगमनेर हलका पाऊस पडला.

मावळमधील काले ३७.८, कार्ला ७४.८, खडकाळा २१.३, लोणावळा ७९, शिवणे २७.८, वेल्हा येथे ९७.८, विंझर १५.३, आंबवणे येथे १०.५ मिलिमीटर, जुन्नरमधील आंबेगाव येथे ५९.३ मिलिमीटर पाऊस पडला. जुन्नर, खेड, शिरूर, बारामती, इंदापूर, दौंड, पुरंदर येथेही पाऊस झाला.

‘खडकवासला’, ‘कासारसाई’तून विसर्ग

खडकवासला धरण ९७ टक्के भरले आहे. गुरुवारी (ता. २७) संध्याकाळी खडकवासला धरणातून ८५६ क्युसेक पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला. तसेच कासारसाई धरण ८७ टक्के क्षमतेने भरले आहे. या धरणाच्या सांडव्यावरून विसर्ग सुरू करण्यात आला. त्यामुळे नागरिकांनी नदी पात्रात उतरू नये, आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

GM Crop Import : जीएम अन्नपदार्थांना लगाम घाला; गाय आधारित सेंद्रिय शेतीला चालना द्या, भारतीय किसान संघाची मागणी

Mosambi Pest Control : नवीन किडीविषयी संशोधन करून त्यावर उपाययोजना करणार

Kolhapur Rain : कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचा जोर मंदावला

Onion Market : कांदा बाजारभावावरील गंभीर स्थितीवर लासलगावी होणार चर्चा

Ladki Bahin Yojana: ५० लाखांवर लाडक्या बहीणींना मिळणार डच्चू; अपात्र बहीणींची संख्या वाढणार

SCROLL FOR NEXT