Rain Update In Maharashtra Agrowon
ताज्या बातम्या

Maharashtra Rain Update : कोकण, घाटमाथ्यावर पावसाचा जोर अधिक

Maharashtra Monsoon Update : मॉन्सून उशिराने दाखल झाल्यानंतर राज्यात पावसाला सुरुवात झाली. कोकण आणि घाटमाथ्यावर पावसाचा जोर अधिक असल्याचे दिसून आले आहे.

Team Agrowon

Pune News : मॉन्सून उशिराने दाखल झाल्यानंतर राज्यात पावसाला सुरुवात झाली. कोकण आणि घाटमाथ्यावर पावसाचा जोर अधिक असल्याचे दिसून आले आहे. मात्र उर्वरित राज्यात पावसाचा जोर कमी-अधिक आहे. पावसातील खंडामुळे खोळंबलेल्या पेरण्या सुरू होऊ लागल्या आहेत. धरणांच्या पाणलोटात मात्र पावसाची रिपरिप सुरूच आहे.

शुक्रवारी (ता. ७) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये कोकण, घाटमाथ्यावर जोरदार ते मुसळधार स्वरुपाचा पाऊस झाला. यात रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, मध्य महाराष्ट्रातील सातारा, धुळे, जळगाव, कोल्हापूर आणि पुणे जिल्ह्यांच्या घाटमाथ्याकडे पावसाचा जोर अधिक होता. मराठवाड्यातील नांदेड जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस झाला. पूर्व विदर्भातील चंद्रपूर, गोंदिया जिल्ह्यांत पावसाचा जोर अधिक होता.

सध्या खानदेश, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात पावसाने उघडीप दिली आहे. तर विदर्भात ढगाळ वातावरण असून अनेक ठिकाणी हलक्या सरी कोसळत आहे. या भागात ज्या ठिकाणी जोरदार पाऊस झाला आहे, तेथे पेरणीस सुरुवात झाल्याचे चित्र आहे.

मागील दोन दिवसांपूर्वी मराठवाडा व विदर्भातील अनेक भागांत पावसाचा जोर वाढला होता. त्यामुळे या भागात हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडला. त्याचवेळी कोकण, मध्य महाराष्ट्रातही कमीअधिक पाऊस होता.

शुक्रवारी (ता. ७) सकाळपर्यंतच्या २४ तासांत पडलेला पाऊस, मिलिमीटरमध्ये (स्रोत - हवामान विभाग) :

कोकण :

मंडणगड १४०, पेन, माथेरान, दापोली प्रत्येकी १३०, हर्णे १२०, कुडाळ, राजापूर प्रत्येकी ११०, सावंतवाडी, कणकवली, रामेश्वर, रत्नागिरी, मुलदे, मालवण, चिपळूण प्रत्येकी १००, दोडामार्ग, वाकवली, लांजा, सुधागड, रोहा प्रत्येकी ९०, वैभववाडी, तळा, देवगड प्रत्येकी ८०, म्हसळा, डहाणू, भिवंडी, श्रीवर्धन, पनवेल, वसई प्रत्येकी ७०.

मध्य महाराष्ट्र :

महाबळेश्वर, गिधाडे प्रत्येकी ११०, गगनबावडा, धरणगाव प्रत्येकी ८०, लोणावळा, जामनेर प्रत्येकी ७०, शिरपूर, धुळे प्रत्येकी ६०, एरंडोल, पारोळा, अमळनेर, राधानगरी प्रत्येकी ५०, इगतपुरी ४०, आजरा, यावल, भुसावळ, चंदगड, सिंदखेडा, जळगाव प्रत्येकी ३०.

मराठवाडा :

उमरी १३०, हदगाव ८०, माहूर, मुदखेड, भोकर प्रत्येकी ४०, छत्रपती संभाजीनगर, सोयगाव, अर्धापूर, नांदेड प्रत्येकी ३०.

विदर्भ :

चंद्रपूर ८०, गोंदिया, एटापल्ली प्रत्येकी ५०, करंजलाड, भामरागड, उमरेड, अमरावती प्रत्येकी ४०, सिरोंचा, चंद्रपूर, महागाव, पुसद, दिग्रस, गोंदिया, आर्णी, रामटेक, सालकेसा प्रत्येकी ३०.

घाटमाथा :

अंभोणे १२०, ताम्हिणी ११०, डुंगरवाडी १००, कोयना पोफळी, दावडी प्रत्येकी ९०.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast: हळदीचे दर स्थिर; मोहरीचे दर टिकून, उडदाचा बाजार दबावात, गव्हाचे दर स्थिरावले, जिऱ्याचे भाव टिकून

Onion Subsidy: कांदा अनुदान योजना; सातबारावर नोंद नसलेल्या शेतकऱ्यांना २८ कोटींचे अनुदान

Banana Farming: केळी बागेचे उत्पादन वाढवण्यासाठी योग्य खत व पाणी व्यवस्थापन

Farmers Protest : ‘काळा’ पोळा करून सरकारला इशारा

Jayakwadi Dam : जायकवाडीच्या आवकेत, विसर्गात वाढ

SCROLL FOR NEXT