Rain Update
Rain Update Agrowon
ताज्या बातम्या

Rain Update : पुणे जिल्ह्यात वाढला पुन्हा पावसाचा जोर

टीम ॲग्रोवन

पुणे : गेल्या आठवड्यापासून पावसाने चांगलाच जोर (Rain Intensity) धरला आहे. दोन दिवसांपूर्वी ओसरलेला पाऊस (Rainfall) पुन्हा वाढला आहे. शुक्रवारी (ता.१६) सकाळपासूनच जिल्ह्यांत पावसाने संततधार सुरू केली होती. दिवसभर पडणाऱ्या पावसामुळे धरणातील पाणी पातळीत (Dam Water Level) चांगलीच वाढ झाली. खडकवासला, वरसगाव, पानशेत, पवना, मुळशी, चासकमान या धरणाच्या विसर्गात वाढ करण्यात येत आहे. त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क राहावे, अशा सूचना जलसंपदा विभागाच्या (Department Of Water Resources) सूत्रांनी दिल्या.

जिल्ह्यात गुरुवारी (ता.१५) दिवसभर पावसाने चांगलीच उघडीप दिली होती. परंतु सायंकाळनंतर वातावरणात बदल होऊन मध्यरात्रीपासून पावसास सुरूवात झाली. शुक्रवारी सकाळी अनेक भागात हलका ते मध्यम पाऊस पडला. तर पश्चिम भागातील तालुक्यात पावसाचा जोर अधिक होता. मुळशीच्या घाटमाथ्यावर सर्वाधिक १३८ मिलिमीटर पाऊस पडला. लोणावळ्यात १००, वळवण ७९, शिरोटा ६५, ठोकरवाडीत ५४ मिलिमीटर पाऊस पडला. त्यामुळे धरणात चोवीस तासांत ११.३८ टीएमसी पाण्याची नव्याने आवक झाली. जिल्ह्यातील जवळपास सर्वच धरणे शंभर टक्के भरली आहेत.

मुळशी, मावळ, वेल्हा, जुन्नर, खेड तालुक्यात पावसाने चांगली हजेरी लावली. आंबेगाव शहरामध्ये १०१ मिलिमीटर पाऊस झाला. पावसामुळे टोमॅटो, सोयाबीन, मूग, उडीद, भाजीपाला व फळपिकांचे काही ठिकाणी मोठे नुकसान झाले आहे. तर हवेली तालुक्यातही हलक्या सरी बरसल्या.

शुक्रवारी (ता.१६) सकाळी आठ वाजेपर्यंतच्या चोवीस तासांतील मंडलनिहाय पाऊस (मि.मी) :

हवेली - पुणे वेधशाळा १४, केशवनगर १४, कोथरूड १७, खेड १८, भोसरी १०, चिंचवड ११,

मुळशी - पौड ३३, घोटावडे ३१, थेरगाव २१, माले ५५, मुठे ५५, पिरंगुट २२

भोर - भोलावडे ४५, नसरापूर ४५, वेळू १८, आंबवडे १५, निगुडघर ३२

मावळ - वडगाव मावळ २१, तळेगाव २१, काले ३८, कार्ला ६७, खडकाळा ६७, लोणावळा ७७, शिवणे २६

वेल्हा - वेल्हा ५२, पानशेत ३९, विंझर २२, आंबवणे ३८

जुन्नर - जुन्नर २२, नारायणगाव ११, वडगाव आनंद १२, राजूर ५४, डिंगोरे ३४, आपटाळे ५४, ओतूर १६

खेड - वाडा २०, राजगुरुनगर ११, कुडे १५, पाईट १९, चाकण १४, आळंदी १०, कडूस ११

आंबेगाव - घोडेगाव १८.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Accident Insurance Scheme : अपघात विमा योजनेतून ४५० शेतकरी कुटुंबांना मदत

Banana Sunburn : उन्हाच्या तीव्रतेमुळे जळताहेत केळीची रोपे

Summer Heat : मालेगावात वैशाखाआधीच वणवा

Adulterated Milk : भेसळयुक्त दूध रोखण्यासाठी उपाययोजना कराव्यात

Water Scarcity : कळंबा परिसरात पाण्याचा प्रश्‍न गंभीर

SCROLL FOR NEXT