Crop Insurance  Agrowon
ताज्या बातम्या

Crop Insurance News : लिंबू फळबाग, कांद्याच्या बीजोत्पादनाला विमाकवच द्या

सध्या लिंबू पिकाला मृग बहरात विमा काढण्याची तरतूद आहे. मात्र, या भागात लिंबूचा हस्त बहर सर्वाधिक शेतकरी घेतात.

Team Agrowon

Akola News :जिल्ह्यात मोठ्या क्षेत्रावर घेतल्या जाणाऱ्या कागदी लिंबूला (Lemon) हस्त व आंबिया बहरासाठी तसेच कांदा बीजोत्पादनाला पीकविम्याच्या (Crop Insurance) कक्षेत समाविष्ट करावे, अशी मागणी शेतकऱ्यांनी कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्याकडे केली आहे.

सध्या लिंबू पिकाला मृग बहरात विमा काढण्याची तरतूद आहे. मात्र, या भागात लिंबूचा हस्त बहर सर्वाधिक शेतकरी घेतात. त्यामुळे हस्त व आंबिया बहराला विमा तरतुदीची गरज आहे.

सत्तार हे अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या भागाच्या दौऱ्यावर सोमवारी (ता. १०) आले होते. त्यांनी जिल्ह्यात बेलुरा शिवारात नुकसानग्रस्त लिंबू बागेची पाहणी केली. या वेळी शेतकऱ्यांनी आपली समस्या मांडली.

सद्यःस्थितीत इतर सर्व शेती पीक आणि फळ पिकांना विमा कवच आहे. परंतु दुर्दैवाने कागदी लिंबू या फळ पिकाला फक्त मृग बहरासाठी विमा लाभ मिळतो. इतर दोन बहारांसाठी विमा कवच नाही.

त्यामुळे या बहाराची फळे झाडावर असताना नैसर्गिक आपत्ती आली तर शेतकऱ्याला फक्त नैसर्गिक आपत्तीच्या मदतीवर अवलंबून राहावे लागते. मिळणारी मदत ही तुटपुंजी असल्यामुळे खर्च सुद्धा निघत नाही. त्यामुळे विमा कवच असेल तर शेतकऱ्याला त्याचा फायदा होईल.

सध्या हस्त बहर सुरू असून, अवकाळी पावसाने लिंबू बागांचे अतोनात नुकसान केले. फळांची प्रचंड प्रमाणात गळती झाली. सोबतच झाडेही उखडून पडली.

अशा काळात विम्याचे संरक्षण मिळालेले असते तर शेतकऱ्यांना फायदा झाला असता, असेही या वेळी शेतकऱ्यांनी सत्तार यांच्या निदर्शनात आणून दिले.

या पिकाचा विमा हप्तादेखील नुकताच महाराष्ट्र शासनाने जाहीर केल्याप्रमाणे नाममात्र असावा, अशी मागणीही शेतकऱ्यांनी केली.

या भागात बरेच शेतकरी कांदा बीजोत्पादन घेतात. त्यालासुद्धा विमा कवच नसल्यामुळे हे पीक नैसर्गिक आपत्तीमध्ये सापडल्यास नुकसान होते. शासनाने दोन्ही पिकांना विमा कवच द्यावे, अशी मागणी शेतकरी मनोहर डांगे, राजेंद्र देशमुख, अविनाश देशमुख, सुधाकर देशमुख आदींनी केली. यावर यादृष्टीने शासन योग्य ती पावले उचलेल, असे आश्‍वासन सत्तार यांनी दिले.

...असे असतात लिंबाचे बहर

कागदी लिंबाचे मुखत्वे तीन बहर घेतले जातात. मृग बहर, हस्त बहर आणि आंबिया बहर. यापैकी मृग बहराची फळे सप्टेंबर, ऑक्टोबरमध्ये विक्रीस येतात, तर हस्त बहराची लिंबे मार्च, एप्रिलमध्ये विक्रीला येतात. त्यामुळे याच बहराच्या लिंबाला बाजारात चांगले दर मिळतात. तर आंबिया बहराची फळे जून-जुलैमध्ये विक्रीस येतात.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Students Protest: मांजरीतील आदिवासी विद्यार्थ्यांचे बेमुदत उपोषण; १३व्या दिवशी एका विद्यार्थ्याची प्रकृती बिघडली

Papaya Farming: खानदेशात पपई येतेय काढणीवर

Micro Irrigation: ठिबक अनुदानाबाबत शेतकऱ्यांत संभ्रम

Sugar Prices: साखरेचे दर कमी होतील का? 'इस्मा'नं दिली महत्त्वाची माहिती

Agrowon Podcast: सोयाबीनच्या दरात घसरण, हरभरा दरात घसरण, टोमॅटो दरात चढ-उतार, पालक आवकेत वाढ तर डाळिंबाच्या दरात बदल

SCROLL FOR NEXT