Crop Insurance in Nanded: नांदेड जिल्ह्यात शेतकऱ्यांना १६० कोटी रूपयांच्या विमा परताव्याची प्रतीक्षा

केंद्र व राज्य शासनाचा हप्ता जमा झाला. परंतु हा विमा अद्याप मिळाला नसल्याने शेतकरी प्रतीक्षेत आहेत.
Crop Insurance
Crop Insurance Agrowon

Nanded Crop Insurance Update : मागील खरीप हंगामात (Kharif Season) अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या नुकसानग्रस्तांना स्थानिक नेसर्गिक आपत्ती घटकांतर्गत ९७ कोटी ९७ लाख तर काढणीपश्‍चात नुकसान या घटकांतर्गत तीन कोटी २८ लाख तसेच मिड सिझन ॲडव्हर्सिटी घटकांतर्गत ५७ कोटी असा एकूण १५८ कोटींचा परतावा मंजूर झाला.

याबाबत केंद्र व राज्य शासनाचा हप्ता जमा झाला. परंतु हा विमा अद्याप मिळाला नसल्याने शेतकरी प्रतीक्षेत आहेत.

जिल्ह्यात पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गत खरीप हंगाम २०२२ मध्ये युनायटेड इंडिया जनरल इन्शूरन्स कंपनीकडे दहा लाख ५७ हजार ५०८ अर्जदार शेतकऱ्यांनी सहा लाख ५१ हजार ४२२ हेक्टर क्षेत्र विमा संरक्षित केले होते.

यात सोयाबीन, कपाशी, तूर, ज्वारी, उडीद व मूग या पिकांसाठी विमा काढण्यात आला होता. दरम्यान यंदा अतिवृष्टीची नोंद झाल्यामुळे शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. यामुळे नुकसानीबाबत विमा कंपनीकडे दावा दाखल करावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले होते.

Crop Insurance
Crop Insurance : पिकांच्या पंचनाम्यांत विमा कंपनीची अफरातफर

यानुसार जिल्ह्यात चार लाख ७३ हजार ५७० विमाधारकांनी माहिती कळविली होती. यात कंपनीकडून पंचनामा झाल्यानंतर नुकसानीच्या प्रमाणानुसार शेतकऱ्यांना स्थानिक नेसर्गिक आपत्ती घटकांतर्गत ९७ कोटी ९७ लाख तर काढणीपश्‍चात नुकसान या घटकांतर्गत तीन कोटी २८ लाख असा एकूण १०१ कोटी २५ लाखांचा परतावा मंजूर केला आहे.

यासोबतच जिल्ह्यात यंदा अतिवृष्टीमुळे खरिपातील सव्वापाच लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले होते. यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी हंगामातील प्रतिकूल परिस्थिती (मिड सिझन ॲडव्हर्सिटी) घटकांतर्गत नुकसानीच्या २५ टक्के भरपाई मिळावी यासाठी अधिसूचना जाहीर केली होती.

ही अधिसूचना विमा कंपनीने मंजूर करून सोयाबीन, कपाशी, तूर व ज्वारी या पिकांचा विमा भरलेल्या सर्वच शेतकऱ्यांना ३६७ कोटींची रक्कम मंजूर केली. यातील ८५ टक्क्यांसार ३१० कोटी रुपये शेतकऱ्यांना दिले आहेत. तर शिल्लक १५ टक्क्यांनुसार ५७ कोटी अद्याप मिळाले नाहीत.

केंद्र सरकारकडून हप्ता विमा कंपन्यांकडे जमा

केंद्र तसेच राज्य सरकारकडून विमा कंपन्यांना वितरित करण्यात येणार विमा हप्ता कंपनीकडे नुकताच जमा झाला आहे.

याबाबत कंपनीकडून २५ ते ३० मार्च या कालावधीत शेतकऱ्यांच्या खात्यावर परतावा जमा करण्यात येणार असल्याचे सांगितले होते. परंतु अद्याप तो शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाला नसल्याची माहिती समोर आली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com