Banana  Agrowon
ताज्या बातम्या

Banana Board : केळी महामंडळासाठी विद्यापीठाऐवजी कृषी विज्ञान केंद्राचीच जागा योग्य

Banana Production : शासनाने जळगावात केळी महामंडळ स्थापन करण्याची घोषणा केली आहे. त्यासंबंधी जागेचा शोध सुरू आहे. अनेक जागांचे पर्याय शासन, प्रशासनासमोर आहेत.

Team Agrowon

Jalgaon News : शासनाने जळगावात केळी महामंडळ स्थापन करण्याची घोषणा केली आहे. त्यासंबंधी जागेचा शोध सुरू आहे. अनेक जागांचे पर्याय शासन, प्रशासनासमोर आहेत. यात महामंडळाचे कार्यालय व इतर केंद्रांची स्थापना ममुराबाद (ता. जि. जळगाव) येथील कृषी विज्ञान केंद्रात किंवा जळगाव शहरालगत निमखेडी शिवारातील तेलबिया संशोधन केंद्रात करण्याचा मुद्दा शेतकरी, अभ्यासक उपस्थित करीत आहेत.

मध्यंतरी आधुनिक केळी संशोधन व उतिसंवर्धित केळी रोपे उत्पादन केंद्र यावल तालुक्यात स्थापन करण्याचा विषय होता. हा विषय अपूर्णच राहीला. आता केळी महामंडळाची घोषणा शासनाने केली आहे. या महामंडळासाठी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात प्रशासनाने जागेची पाहणी केली आहे. तसेच ममुराबाद (ता. जि. जळगाव) येथील कृषी विज्ञान केंद्रातही जागेची पाहणी झाली आहे.

यात ममुराबाद (ता.जि. जळगाव) येथील कृषी विज्ञान केंद्रात हे महामंडळ स्थापन करणे योग्य राहील, असा मुद्दा शेतकरी उपस्थित करीत आहेत. केळीची लागवड यावल, रावेर, मुक्ताईनगर, चोपडा, जळगाव, जामनेर, भडगाव, पाचोरा व चाळीसगावातही केली जाते. या भागातील शेतकऱ्यांना जळगाव शहरातून ममुराबाद (ता. जि. जळगाव) येथील कृषी विज्ञान केंद्रात जाणे परवडणारे व सुकर आहे. विद्यापीठात जाण्यासाठी या भागातील शेतकऱ्यांना जळगाव शहर पूर्णतः ओलांडावे लागेल.

शिवाय विद्यापीठ बिगर कृषीसंबंधी आहे. तेथे पूरक वातावरणदेखील नाही. ममुराबाद (ता. जि. जळगाव) येथील कृषी विज्ञान केंद्रात शेतकऱ्यांची ये-जा सुरू असते. कृषीसंबंधी अनेक प्रकल्प या केंद्रात असतात. यामुळे पूरक बाबी लक्षात घेऊन केळी महामंडळ ममुराबाद (ता. जि. जळगाव) येथील कृषी विज्ञान केंद्रात किंवा निमखेडी शिवारातील तेलबिया संशोधन केंद्रात स्थापन करावे, अशी मागणी केली जात आहे.

केळी महामंडळ जळगाव जिल्ह्यात होत आहे, याचा आनंद आहे. परंतु त्यासाठी जागा निवडताना शेतकऱ्यांशी देखील प्रशासनाने चर्चा करावी. केळी लागवडीचे क्षेत्र, शेतकऱ्यांना कुठे सोईस्कर राहील, यावर चर्चा व्हायला हवी. ममुराबाद (ता. जि. जळगाव) येथील कृषी विज्ञान केंद्रात किंवा निमखेडी येथील तेलबिया संशोधन केंद्रात महामंडळ स्थापन करायला हवे, असे मला वाटते.
- विशाल महाजन, केळी उत्पादक, नायगाव (ता. मुक्ताईनगर, जि. जळगाव)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Vidhan Sabha Election Results : काँग्रेसच्या दिग्गजांना मोठा धक्का, पृथ्वीराज चव्हाण, थोरात, देखमुखांसह काँग्रेसचे अनेक दिग्गज पिछाडीवर

Climate Change Issue : हवामान बदलाच्या परिणामांना सामोरे जाण्यासाठी हवे ‘हवामान वित्त’

Maharashtra Vidhansabha Result 2024 : लाडकी बहिण योजनेचा महायुतीला फायदा; सोयाबीन दराचा मुद्दा ठरला 'फेल'?

Maharashtra Assembly Election : कोल्हापूर जिल्ह्यातील डझनभर कारखानदारांचे भवितव्य ठरणार, पहिल्या ३ तासांचा काय सांगतो कल

Farmers Exploitation : कोणा सांगाव्या शेतकऱ्यांच्या व्यथा

SCROLL FOR NEXT