ताज्या बातम्या

तीर्थक्षेत्र विकास आराखड्यांतर्गत कामांची अप्पर सचिवांकडून पाहणी

तीर्थक्षेत्र विकास आराखड्यांतर्गत पत्रा शेड येथे नव्याने दर्शन मंडप प्रस्तावित केला असून, हा दर्शनी मंडप सर्व सुविधायुक्त व अत्याधुनिक पद्धतीने बांधण्यात येणार आहे.

टीम ॲग्रोवन

पंढरपूर, जि. सोलापूर : श्रीक्षेत्र देहू, आळंदी, भंडारा डोंगर, पंढरपूर व पालखीतळ, पालखी मार्ग विकास आराखड्यांतर्गत (Palkhi Marg Development Plan) श्री विठ्ठल- रुक्मिणी मंदिर (Vithhal Rukmini Temple), मंदिर परिसर, पंढरपूर शहर येथे वारकरी, भाविकांना तसेच स्थानिक नागरिकांना मूलभूत सुविधा पुरविण्याच्या अनुषंगाने तीर्थक्षेत्र विकास आराखड्यांतर्गत नव्याने समाविष्ट करण्यात आलेल्या कामांची पाहणी सामान्य प्रशासनाच्या अपर मुख्य सचिव सुजाता सैनिक यांनी केली.

या वेळी अप्पर मुख्य सचिव श्रीमती सैनिक यांनी मंदिर, पद दर्शन रांग, मुखदर्शन रांग, विठ्ठल-रुक्मिणी सभा मंडप, दर्शन मंडप, नामदेव पायरी, होळकर वाडा, शिंदे सरकार वाडा, गोपाळ कृष्ण मंदिर, यमाई तलाव, ६५ एकर परिसर येथील पाहणी केली.

तीर्थक्षेत्र विकास आराखड्यांतर्गत पत्रा शेड येथे नव्याने दर्शन मंडप प्रस्तावित केला असून, हा दर्शनी मंडप सर्व सुविधायुक्त व अत्याधुनिक पद्धतीने बांधण्यात येणार आहे. यामध्ये भाविकांना आवश्यक सुविधांचा समाविष्ट करण्यात आला आहे.

आषाढी आणि कार्तिकी यात्रेनिमित्त गोपाळपूर येथे गोपाळ कृष्ण मंदिरात पौर्णिमेदिवशी गोपाळकाला केला जातो. यादिवशी मोठ्या प्रमाणात वारकरी भाविकांची गर्दी होत असते. येणाऱ्या भाविकांना सुविधा देण्यासाठी गोपाळ कृष्ण मंदिराचा विकास करण्यात येणार येणार आहे. तसेच पायाभूत सुविधाही उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी श्रीमती सौनिक यांना दिली.

या वेळी वारकरी संप्रदायाच्या प्रथा परंपरेचे व मूळ वस्तूचे जतन करून पुरातत्व विभागाच्या मार्गदर्शनानुसार मंदिर व मंदिर परिसराचा विकास करण्यात येत असल्याची माहिती मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी तथा अप्पर जिल्हाधिकारी संजीव जाधव व वास्तू विशारद तेजस्विनी आफळे यांनी दिली.

या वेळी त्यांच्यासमवेत पुणे विभागीय आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, जिल्हा पोलिस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, मुख्य अभियंता अतुल चव्हाण, अप्पर पोलिस अधीक्षक हिंमतराव जाधव, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता संजय माळी, प्रांताधिकारी गजानन गुरव, तहसीलदार सुशील बेल्हेकर, तीर्थक्षेत्र विकास आराखड्याचे विशेष कार्य अधिकारी राजेश तितर, नगरपालिका प्रशासनाचे सहआयुक्त आशिष लोकरे, मुख्याधिकारी अरविंद माळी उपस्थित होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast: हरभरा दर दबावातच; शेवगा दर तेजीतच, केळीची आवक टिकून, बाजरी दबावातच तर लिंबाचे दर स्थिर

Farmers Protest: कर्जमाफीपासून रस्ते-दुरुस्तीपर्यंत दहा मागण्या; उमरीत ग्रामस्थांचे बेमुदत उपोषण

Farmers Relief: आतापर्यंत १९० कोटींचे अनुदान वितरित

Rabi Season: महाबीज’कडून ७५ हजार क्विंटल रब्बी बियाणे पुरवठा

DY Patil Agri University: डी. वाय. पाटील कृषी व तंत्र विद्यापीठाच्या कुलगुरुपदी डॉ. गुप्ता

SCROLL FOR NEXT