BDN 716 Tur Verity
BDN 716 Tur Verity Agrowon
ताज्या बातम्या

Tur Crop Verity : तज्ज्ञांकडून तूर पिकाच्या‘बीडीएन ७१६’ वाणाची पाहणी

Team Agrowon

हिंगोली ः जिल्ह्यातील तोंडापूर (ता. कळमनुरी) येथील कृषी विज्ञान केंद्रातर्फे ताकतोडा (ता. सेनगाव) येथे राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान (National Food Security Mission) अंतर्गत समूह प्रथम पंक्ती पीक प्रात्यक्षिक कार्यक्रमातील तुरीच्या ‘बीडीएन ७१६’ (BDN 716 Tur Verity) या वाणाच्या प्रात्यक्षिक पाहणी अंतर्गत सोमवारी (ता. ९) शेती दिन (Agriculture Day) साजरा करण्यात आला.

२०२२ च्या खरीप हंगामात कृषी विज्ञान केंद्राचे अध्यक्ष अॅड. शिवाजी माने, वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. पी. पी. शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली ताकतोडा (ता.सेनगाव) येथे वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने विकसित केलेल्या ‘तुरीच्या बीडीएन ७१६’ या वाणाचा २५ समूह प्रथम पंक्ती पीक प्रात्यक्षिके घेण्यात आली.

सोमवारी (ता.९) प्रयोगशील शेतकरी राहुल कव्हर यांच्या शेतात तूर शेती दिनाचे आयोजन करण्यात आले.

तालुका कृषी अधिकारी संदीप वळकुंडे, कृषी विज्ञान केंद्राचे कृषिविद्या विषय विशेषज्ञ राजेश भालेराव, कृषी विस्तार विषय विशेषज्ञ डॉ. अतुल मुराई, मृदा विज्ञान विषय विशेषज्ञ साईनाथ खरात, प्रमोद सावके, गणेश सावके, गुलाब सूर्यवंशी, हनुमान सावके आदींसह शेतकरी उपस्थित होते.’

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Onion Nursery : खानदेशात कांदा रोपवाटिका निर्मितीची तयारी वेगात

Mango Orchard : आंबा बागायतदारांना पावसाचा फटका

Onion Seed : महात्मा फुले कृषी विद्यापीठात आजपासून कांदा बियाणे विक्री सुरू

Turmeric Market : राजापुरी हळदीची उलाढाल २५८ कोटींनी वाढली

Pre-monsoon Rain : मॉन्सूनपूर्व पावसाने शेतकरी हवालदिल

SCROLL FOR NEXT