Pesticide QR - Code Agrowon
ताज्या बातम्या

Pesticide QR - Code : कीटकनाशकांबाबतची माहिती ‘क्‍यु-आर कोड’ने मिळावी

‘माफदा’ करणार गुणवत्ता नियंत्रण यंत्रणेकडे पाठपुरावा

Team Agrowon

विनोद इंगोले : ॲग्रोवन वृत्तसेवा
नागपूर : किटकनाशकांसोबत (Pesticides) देण्यात येणाऱ्या माहितीपत्रकांवरील शब्दांचा आकार कमी असल्याने त्यावरील अक्षरे वाचणेही शक्‍य होत नाही.

परिणामी कागदाचा अपव्यय होत असल्याने हा प्रकार थांबवीत त्याऐवजी बाटलीवरच ‘क्‍यु-आर कोड’च्या (QR - Code) आधारे ही माहिती देण्याची सोय करावी, अशी मागणी होत आहे.

‘माफदा’ने (MAFDA) या संदर्भात राज्यातील गुणवत्ता नियंत्रण यंत्रणेकडे पाठपुरावा करण्याचा निर्णय घेतला आहे.

उत्पादनांसोबत त्याचे परिणाम, दुष्परिणाम याविषयीची माहिती असणारे पत्रक देण्याची पध्दत आहे. औषधांच्या बाटलीवर देखील त्यातील घटकांची माहिती दिलेली असते.

कीटकनाशकांच्या बाटल्याही त्याला अपवाद नाहीत. कीटकनाशकांसोबत त्यातील घटक, विषबाधा झाल्यास करावयाच्या उपाययोजना याबाबतची माहिती नोंदविलेले पत्रक दिलेले असते.

सर्व कंपन्यांना त्यासाठीची सक्‍ती करण्यात आली असून ही माहिती विविध भाषांमध्ये राहते. परंतु सक्‍ती असल्यानेच हे पत्रक देण्याची औपचारिकता कंपन्यांकडून पूर्ण केली जाते.

कारण अशा पत्रकांवरील माहितीची अक्षरे ही अत्यंत बारीक असतात. त्यामुळे साध्या डोळ्यांनी ते वाचणेही शक्‍य होत नाही. परिणामी अशा पत्रकांचा उपयोग काय?, असा प्रश्‍न वर्धा येथील कृषी सेवा केंद्र संचालक किशोर पाटील यांनी उपस्थित केला आहे.

कीटकनाशकांच्या बाटल्यांसोबत मिळणाऱ्या पत्रकांवरील अक्षरे वाचता येत नाहीत. शेतकरी ही पत्रके फेकून देतात. परिणामी कागद तयार करण्यासाठी झाडांची होणारी कत्तल आणि त्यापायी पर्यावरणाचा होणारा ऱ्हास असे संकट आहे.

त्याचे गांभीर्य लक्षात घेऊन डिजिटल इंडिया धोरणा अंतर्गत अशाप्रकारची माहिती ‘क्‍यु-आर कोड’च्या आधारे द्यावी.
- विपिन कासलीवाल, महासचिव,
महाराष्ट्र फर्टिलायझर, पेस्टिसाईड ऍण्ड इन्सेक्‍टिसाईड डीलर्स असोसिएशन.


किटकनाशकांसोबत दिले जाणारे माहितीपत्रक वाचण्यायोग्य नसते. हा प्रकार तत्कालीन कृषी आयुक्‍त सुनील केंद्रेकर यांच्या निदर्शनास आणून दिला होता.

त्यासोबतच तत्कालीन गृहराज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांनाही कळविले. मात्र आजवर या समस्येचे समाधान झाले नाही. हा प्रकार गंभीर असल्याने त्याची वेळीच दखल घ्यावी.
- ओम हेडा, शेतकरी,
हातोला, जि. अकोला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Injustice: शेतकरी नावडे सर्वांना

Illegal Agri Inputs: अवैधतेचे गुजरात मॉडेल

Vidarbha Irrigation Project: विदर्भातील १३ सिंचन प्रकल्प रद्द

Land Acquisition Law: भूसंपादन कायद्यातील बदलाबाबत सरकार गंभीर

BG II Cotton: ‘वनामकृवि’ कडून कपाशीचे सरळ वाण बीजी II मध्ये परिवर्तित

SCROLL FOR NEXT