Grape Expo Agrowon
ताज्या बातम्या

Agrowon Grape Expo : एकाच छताखाली द्राक्षाचे सर्वकाही !

Grape Farming : ‘सकाळ-ॲग्रोवन’च्या वतीने आयोजित ‘ॲग्रोवन द्राक्ष प्रदर्शन २०२३’ मध्ये द्राक्ष पिकाविषयी सर्व प्रकारचे राष्ट्रीय आणि आंतरराष्‍ट्रीय तंत्रज्ञान एकाच छताखाली उपलब्ध होणार आहे. प्र

Team Agrowon

Nashik News : येथे ‘सकाळ-ॲग्रोवन’च्या वतीने आयोजित ‘ॲग्रोवन द्राक्ष प्रदर्शन २०२३’ मध्ये द्राक्ष पिकाविषयी सर्व प्रकारचे राष्ट्रीय आणि आंतरराष्‍ट्रीय तंत्रज्ञान एकाच छताखाली उपलब्ध होणार आहे. प्रदर्शन ३० सप्टेंबर ते २ ऑक्टोबर दरम्यान ठक्कर्स डोम (ए.बी.बी. सिग्नलजवळ, नाशिक) येथे होणार असून, प्रवेश सर्वांसाठी खुला आहे.

प्रदर्शनात देशविदेशातील विविध तंत्रज्ञानासह विविध शास्त्रज्ञ, संशोधक, प्रगतिशील शेतकरी मार्गदर्शन करणार आहेत. या प्रदर्शनासाठी आपले तंत्रज्ञान आणि उत्पादने थेट द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्याची संधी विविध उद्योगांना मिळणार आहे.

या प्रदर्शनाचे पूर्वा केमटेक प्रायोजक आहेत. प्रदर्शन पॉवर्डबाय ऑरकिड कंपनी असून, ॲग्री सर्च (इंडिया) प्रा. लि., आनंद ॲग्रो केअर, एशियन ॲग्रीटेक्नोलॉजीस् (इंडिया) प्रा. लि., बायस्टॅड इंडिया लि., गोदावरी ॲग्रो, वेदांत ॲग्रो सायन्स टेक्नॉलॉजिस प्रा. लि, शक्तिमान या कंपन्या सहप्रायोजक आहेत. प्रदर्शनात वितरित होणारी बक्षीसे सोनी गिफ्ट्स प्रा. लि द्वारा प्रायोजित आहेत.

प्रदर्शन नाशिक जिल्ह्यासह लगतच्या पुणे, नगर, छत्रपती संभाजीनगर आणि सांगलीसह द्राक्ष पट्ट्यातील शेतकऱ्यांना लाभदायक ठरणार आहे. शेतकऱ्यांना विविध देशातील द्राक्षशेतीचे तंत्रज्ञान, संशोधन, विपणन, प्रक्रिया, निर्यात आदी विविध क्षेत्रातील माहिती एकाच छताखाली मिळणार आहे.

याशिवाय प्रदर्शनात...

- दररोज होणार द्राक्ष पिकातील तज्ज्ञांची चर्चासत्रे.

- मोफत पाणी परीक्षण करण्यात येणार, लगेच रिपोर्ट.

- प्रदर्शनाला भेट देणाऱ्यांसाठी लकी ड्रॉ, भेटवस्तू जिंकण्याची संधी.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agri Seed Law: स्वतंत्र बियाणे कायदा करणार: कृषिमंत्री दत्तात्रय भरणे

Gold Market: गुंतवणुकीसाठी सोने खरेदीकडे कल

Transparency in Quality Control: ‘गुणनियंत्रणा’साठी ई-लॅब, ई-इन्स्पेक्टर

Maharashtra Heatwave: उन्हाचा चटका कायम राहण्याची शक्यता

Sugarcane FRP: साखर कारखान्यांकडे ३,५०० कोटींची एफआरपी थकीत, राजू शेट्टींची माहिती, साखर आयुक्तांची घेतली भेट

SCROLL FOR NEXT