Rain
Rain Agrowon
ताज्या बातम्या

धरणातील पाण्याच्या आवकेत वाढ होण्यास सुरुवात

टीम ॲग्रोवन

पुणे : पावसासाठी वातावरण (Rain Condition) तयार झाल्याने दोन दिवसांपासून धरणक्षेत्रात पावसाने पुन्हा जोर (Rain Started In Dam Area) धरण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे धरणांत पुन्हा पाण्याची आवक (Water Arrival In Dam) सुरू झाली आहे. शुक्रवारी (ता.५) सकाळी आठ वाजेपर्यंतच्या चोवीस तासांमध्ये १.८० टीएमसी एवढी नव्याने पाण्याची आवक झाली आहे. त्यामुळे धरणांतील पाणीपातळीत (Dam Water Level) पुन्हा वाढ होऊ लागली आहे.

गेल्या पंधरा दिवसांपासून धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर काहीसा कमी झाला आहे. यामुळे धरणातील पाण्याच्या आवकेत काही प्रमाणात घट झाली आहे. दोन ऑगस्ट रोजी धरणातील पाण्याच्या आवकेत एक टीएमसीहून कमी घट झाली. त्यानंतर ३ ऑगस्ट (बुधवारी) सकाळी आठ वाजेपर्यंत धरणांत ०.५८ टीएमसी एवढी कमी घट झाली. परंतु चार ऑगस्टपासून पावसाला सुरुवात झाल्याने धरणांत आवक वाढायला सुरुवात झाली आहे. गुरुवारी (ता.४) धरणांत ०.९१ टीएमसी, तर शुक्रवारी त्यात आणखी वाढ झाली आहे.

जूनमध्ये कमी-अधिक स्वरूपात पाऊस पडल्याने धरणांत फारशी आवक झालेली नव्हती. परंतु जुलै महिन्यात पावसाने चांगलाच जोर धरला होता. त्यातच घाटमाथ्यावरही मुसळधार पावसाच्या सरी बरसल्याने धरणांत नव्याने पाण्याची आवक सुरू झाली होती. सुरुवातीला आवक कमी होती. मात्र जसजसे पावसाचे प्रमाण वाढत गेले, त्यानुसार धरणांतील पाण्याच्या आवकेत वाढ होत गेली. प्रामुख्याने ७ ते २० जुलै या कालावधीत धरणांत पाण्याची चांगलीच आवक झाली. १४ जुलै रोजीच्या चोवीस तासांत धरणांत सर्वाधिक १८.१९ टीएमसी एवढा पाणीसाठा झाला होता. त्यानंतर १५ जुलै रोजी १७.८६ टीएमसी पाण्याची आवक झाली. त्यामुळे जिल्ह्यातील २६ धरणांतील पाणीपातळी झपाट्याने वाढत गेली. परंतु त्यानंतर पावसाचा जोर कमी झाल्यानंतर आवकेत घट होण्यास सुरुवात झाली होती.

मुठा खोऱ्यातील टेमघर, वरसगाव, पानशेत, खडकवासला धरणांत शुक्रवारी (ता.५) सकाळी आठपर्यंत नव्याने ०.११ टीएमसी एवढी नव्याने पाण्याची आवक झाली आहे. नीरा खोऱ्यातील चासकमान, भामा आसखेड, नाझरे, गुंजवणी, नीरा देवघर, वीर, भाटघर या धरणांच्या आवकेत ०.१६ टीएमसी, तर कुकडी खोऱ्यातील येडगाव, वडज, डिंभे, घोड, चिल्हेवाडी या धरणांच्या आवकेत ०.२७ टीएमसी, तर भीमा खोऱ्यातील उजनी, विसापूर या धरणांच्या आवकेत १.११ टीएमसी एवढी पाण्याची आवक झाली आहे.

शुक्रवारी (ता.५) सकाळी आठ वाजेपर्यंतच्या चोवीस तासांमध्ये धरणनिहाय झालेली पाण्याची आवक, श्(टीएमसीमध्ये)

पानशेत ०.०६, खडकवासला ०.०५, चासकमान ०.०१, भामा आसखेड ०.०२, आंध्रा ०.०१, शेटफळ ०.०१, नाझरे ०.०६, गुंजवणी ०.०२, भाटघर ०.०३, वीर ०.११, येडगाव ०.०४, वडज ०.०१, डिंभे ०.०३, चिल्हेवाडी ०.०४, घोड ०.१५, विसापूर ०.०२, उजनी ०.४३, मुळशी ०.०५

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast : सोयाबीनमध्ये काहीशी सुधारणा; कापूस, सोयाबीन, हरभरा, कांदा यांचे काय आहेत दर ?

APMC Market : ढोलबारेत खासगी बाजार समिती सुरू

Gokul Milk Sangh : उन्हाळ्यात गोकुळची दूध क्रांती, तब्बल २ लाख लिटरने संकलन वाढलं

Onion Auction : मुंगसे उपबाजार आवारात अखेर कांद्याचे लिलाव सुरू

Agriculture Update : शेतकऱ्यांना बियाणे, खते योग्यवेळी उपलब्ध करून द्या

SCROLL FOR NEXT