Onion Auction : मुंगसे उपबाजार आवारात अखेर कांद्याचे लिलाव सुरू

Onion Market : बाजार सुरू होताच पहिल्याच दिवशी १५ हजार क्विंटल कांद्याची आवक होती. केवळ एका ट्रॅक्टरला १ हजार ८०१ रुपये क्विंटल भाव मिळाला.
Onion
Onion Agrowon

Nashik News : व्यापारी व माथाडी कामगारांमधील लेव्हीच्या वादामुळे गेल्या सव्वा महिन्यापासून बंद असलेला येथील मालेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचा मुंगसे कांदा उपबाजार आवार गुरुवारी (ता. २) सुरू झाले. बाजार सुरू होताच पहिल्याच दिवशी १५ हजार क्विंटल कांद्याची आवक होती. केवळ एका ट्रॅक्टरला १ हजार ८०१ रुपये क्विंटल भाव मिळाला.

सरासरी कांदा १२०० ते १४०० रुपये क्विंटलने विकला गेला. दुय्यम प्रतीचा कांदा ९०० ते १२०० रुपये, तर सर्वसाधारण कांद्याची ४०० ते ८०० रुपये दराने विक्री झाली. दरम्यान, शुक्रवारी (ता. ३) व्यापाऱ्यांचा लाक्षणिक संप आणि शनिवार व रविवारची नियमित सुटी असल्याने तीन दिवस पुन्हा बाजार बंद राहणार आहे.

Onion
Onion Export : कांदा निर्यातबंदी उठवली, मात्र निर्यात वाढणार नाही याचीही सोय केली

लेव्हीच्या मुद्यावर व्यापारी व माथाडी कामगारांमधील संघर्ष महिन्यापासून सुरू आहे. मध्यंतरीच्या काळात २१ एप्रिलला बाजार सुरू झाला होता. पुन्हा वाद निर्माण झाल्याने लिलाव बंद झाले. बाजार समिती पदाधिकारी, व्यापारी व माथाडी कामगारांमध्ये २९ एप्रिलला झालेल्या बैठकीनंतर बाजार सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला.

व्यापाऱ्यांनी हमाली, मापाई व वाराई कपात न करता लिलाव करण्याची भूमिका घेतली. तर माथाडी कामगारांनी जोपर्यंत पुढचा निर्णय होत नाही तोपर्यंत आम्ही कामकाजात भाग घेणार नाही, मात्र कामावर असल्याची स्वाक्षरी हजेरी पुस्तकात घ्यावी, अशी अट ठेवण्यात आली. समितीच्या पदाधिकाऱ्यांनी ती मान्य केल्याने ३० एप्रिलला येथील बाजार समितीच्या मुख्य आवारातील मका, धान्य व कडधान्याचे लिलाव झाले. मुंगसे कांदा बाजार मात्र सुरू झाला. सकाळ व दुपार या दोन्ही सत्रांत लिलावाचे कामकाज झाले.

Onion
Onion Export Ban : केंद्र सरकारच्या चलाखीमुळे कांदा निर्यातीवरील लगाम कायम; शेतकऱ्यांना कितपत फायदा होणार?

व्यापाऱ्यांनी हमाली, मापाई व तोलाई कपात न करता लिलाव केले. केंद्र शासनाने ९९ हजार १५० टन कांदा निर्यातीस परवानगी दिली आहे. या निर्णयामुळे भाव वाढतील अशी शक्यता होती. प्रत्यक्षात केवळ एका ट्रॅक्टरला कमाल दर १८०१ रुपये भाव मिळाला. उर्वरित १००० ते १५०० रुपये दरम्यान विकला गेला. अपेक्षित भाव न मिळाल्याने शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली.

कामबंद आंदोलन

पिंपळगाव येथे माथाडी कामगारांनी व्यापाऱ्यांना अपशब्द वापरल्याच्या निषेधार्थ शुक्रवारी (ता. ३) लिलावाचे कामकाज बंद असेल. शनिवारी व रविवारी नियमित सुटी असल्याने कांदा बाजार ६ मे ला सुरू होईल. येथील समितीच्या मुख्य आवारातील मका, धान्य व कडधान्याचे लिलाव शनिवारी (ता. ४) नियमितपणे होणार असल्याचे व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष भिका कोतकर यांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com