Anil Deshmukh Agrowon
ताज्या बातम्या

Inflation News : उद्योगपतींसाठींच्या पैशांकरिता देशात महागाई

जागतिकस्तरावर पेट्रोल, डिझेल स्वस्त असताना भारतात मात्र ते महाग विकले जात आहे.

Team Agrowon

Inflation News यवतमाळ ः जागतिकस्तरावर पेट्रोल, डिझेल स्वस्त असताना भारतात मात्र ते महाग (Fuel Rate) विकले जात आहे. काही उद्योगपतींसाठी पैसा उभा करता यावा याकरिता हे ‘उद्योग’ सुरू असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी केला.

विकास आघाडीच्या वतीने पांढरकवडा येथील रॉयल पॅलेस येथे देशमुख यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी त्यांनी केंद्र सरकारच्या धोरणांचा खरपूस समाचार घेतला.

देशमुख म्हणाले, ‘‘जगात नाही इतकी महागाई भारतात आहे. सर्वसामान्यांसाठी आवश्‍यक असलेल्या सर्वच वस्तू महाग करण्यात आल्या आहेत.

त्यामुळे सामान्यांना केवळ कुटुंब जगविण्याचीच चिंता लागून आहे. दुसरीकडे हाच पैसा काही उद्योगपतींना दिला जातो. त्याकरिता बॅंक, सहकारी संस्था यांच्या निधीचा वापर होतो.

एलआयसीमध्ये सर्वसामान्यांचा पैसा आहे. हा पैसा एका उद्योगपतीला दिला गेला आणि नंतर काय झाले याचा अनुभव सर्वांनी घेतला आहे. सर्वसामान्यांच्या पैशावर हात साफ करण्याची ही पद्धती देशाच्या अर्थव्यवस्थेला धोक्‍यात टाकणारी आहे.

मात्र याच संदर्भाने विरोधी पक्षाने प्रश्‍न उपस्थित केले तर त्यांच्याविरोधात ईडी, सीबीआय सारख्या व्यवस्थांचा वापर करून त्यांना कारागृहात टाकण्याचे काम होते. एकंदरीत सध्याच्या सरकारने लोकशाही संपुष्टात आणली आहे.

मुठभर उद्योगपतीच्या हिताचे धोरण राबवून त्यामाध्यमातून जनतेच्या पैशाची उधळपट्टी करायची आणि असा गैरप्रकार समोर आला की त्याला देशभक्‍तीचा रंग द्यायचा, अशी धोरण राबविली जात आहे.

आता या सुबुद्धीपूर्ण हुकूमशाही सरकारला जनता कंटाळली असून २०२४ मध्ये होणाऱ्या निवडणुकीत जनता त्यांना संपवेल. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक तारिक लोखंडवाला यांनी केले.

यावेळी काँग्रेस नेते शिवाजी मोघे, राजेंद्र गायकवाड, संतोष ढवळे, प्रफुल्ल मानकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे बाळासाहेब गाडे व इतर मान्यवर उपस्थित होते.

कारवाईच्या भीतीने पलायन

ईडी, सीबीआय व इतर यंत्रणांची भीती दाखवून इतर पक्षांतील अनेकांना भाजपने आपल्या पक्षात घेतले आहे. शिवसेनेतून फुटलेले ४० आमदारही केवळ कारवाईच्या भीतीने भाजपमध्ये गेले आहेत, असेही अनिल देशमुख म्हणाले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agricultural Challenges : सोयाबीन दराचा मुद्दा ठरला निष्प्रभ

Satara Assembly Constituency Result : सातारा जिल्ह्यात आठही जागांवर महायुतीचा करिष्मा

Maharashtra Assembly Election Result 2024 : ‘ते’ पुन्हा आले!

Vidhansabha Election 2024 : कोल्हापूर, सांगली जिल्ह्यांत महायुतीचाच प्रभाव

Maharashtra Weather : किमान तापमानात वाढ होण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT