ताज्या बातम्या

Uday Samant : इंडियाबुल्सने उद्योग उभारावेत; अथवा जमीन शेतकऱ्यांना परत द्यावी

Team Agrowon

Nashik News : जिल्ह्यातील सिन्नर औद्योगिक क्षेत्रातील सुमारे चार हजारांपेक्षा अधिक हेक्टर जमीन (Land Acquisition) इंडिया बुल्स कंपनीने घेतली खरी. पण आजपर्यंत कुठलाही उद्योग उभा करू शकले नाहीत.

त्यामुळे ही जमीन शेतकऱ्यांना परत करावी. इंडिया बुल्स जमीनविषयक अभ्यास सुरू असून, आवश्‍यकता भासल्यास कारवाई केली जाईल, असे उद्योगमंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी स्पष्ट केले.

उद्योग विभागाच्या आढावा बैठकीच्या समारोपासाठी मंगळवारी (ता. २५) मंत्री सामंत नाशिकमध्ये आले असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, की पुण्यात सात हजार एकर जमीन शेतकऱ्यांना परत केली. पिंपरी-चिंचवडमध्ये असा निर्णय घेतला आहे.

दरम्यान, पंधरा वर्षांपासून मुसळगाव, गुळवंच, देवपूर, पागंरी आदींसह विविध गावांतील जमीन इंडिया बुल्स कंपनीने घेतली. टप्प्याटप्प्याने उद्योग उभा करण्याचे आश्‍वासन कंपनीने दिले होते.

मात्र कंपनीने एकही उद्योग उभारला नाही. त्यातच किमान दोन हजार हेक्टर जमीन महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने घ्यावी आणि मूलभूत सुविधा उपलब्ध करून उद्योग आणावेत, असा प्रस्ताव राजकीय नेते आणि उद्योग संघटनांनी दिला होता. भूसंपादनावेळी शेतकरी आणि प्रशासनामध्ये संघर्ष झाला होता.

एका पोलीस अधिकाऱ्याला गावातील मंदिरात डांबून ठेवण्यात आले होते. अनेकांनी भीतीपोटी गाव सोडले. अशा परिस्थितीत कंपनी उद्योग उभारणार नसल्यास एवढा खटाटोप का केला, असा प्रश्‍न शेतकऱ्यांचा आहे.

त्यावर निर्णय झाला नसल्याने जमीन पडून आहे. त्यामुळे इंडिया बुल्स कंपनी उद्योग उभारत नसेल, तर जमीन एमआयडीसी अथवा संबंधित शेतकऱ्यांना परत करण्याबाबत निर्णय घेतला जाईल.

बारसू रिफायनरी प्रकल्पासंबंधी उद्धव ठाकरेंचा दुटप्पीपणा

कोकणातील बारसूच्या रिफायनरी प्रकल्पासंबंधी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा दुटप्पीपणा असल्याचा आरोप उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केला. उद्योग बाहेर गेले, असे म्हणणाऱ्यांनी आता उद्योग येत असताना त्याला विरोध का, याचे उत्तर द्यावे, असेही ते म्हणाले.

ठाकरे यांनी मुख्यमंत्री असताना १२ जानेवारी २०२२ला पंतप्रधानांना पत्र लिहिले. त्यात बारसूमध्ये तेराशे एकर जमीन रिफायनरीसाठी देऊ शकतो, असे नमूद केले आहे. हा प्रकल्प आल्याने पर्यावरणाचा ऱ्हास होणार नाही.

त्यामुळे आता कोण ‘मॅनेज' झाले, हे मला माहिती नाही. एकनाथ शिंदे यांच्याऐवजी ते मुख्यमंत्री असते, तर हा प्रकल्प पुढे गेला असता. सर्व पक्षांच्या नेत्यांनी कोकणाच्या विकासासाठी एकत्र आले पाहिजे, असे सामंत म्हणाले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Update : गुणवत्तापूर्ण बियाणे, खते शेतकऱ्यांना द्या : इटनकर

Summer Weather : परभणीत दिवसाचा पारा ४३ अंशांवर

Water Stock : मराठवाड्यातील उपयुक्त पाणीसाठा ७ ते ८ टक्क्यांवर

Flower Rate : लग्नसराईमुळे फुलांच्या दरांत वाढ

Anandacha Shidha : आनंदाच्या शिध्याची प्रतीक्षा

SCROLL FOR NEXT