Heat Wave India Agrowon
ताज्या बातम्या

भारत ठरला जगात सर्वांत उष्ण देश

‘अल डोरॅडो वेदर’कडून नोंद

टीम ॲग्रोवन 

पुणे : उन्हाचा चटका चांगलाच वाढल्याने भारत जगातील सर्वांत उष्ण देश ठरला आहे. जगभरातील पहिल्या १५ उष्ण शहरांत सध्या भारतातील १४ शहरांचा समावेश आहे. बुधवारी (ता. २०) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये झारखंड राज्यातील डाल्टनगंज येथे जगातील सर्वांत उच्चांकी ४५.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. भारतासह सेनगल या देशातील उमारिया मध्येही उच्चांकी तापमानाची नोंद झाली आहे.

‘अल डोरॅडो वेदर’ या जागतिक तापमानाची नोंद घेणाऱ्या संकेतस्थळावर ही माहिती प्रसिद्ध करण्यात आली आहे. यंदा मार्च महिन्यापासूनच देशात उन्हाळ्याच्या झळा अधिक असल्याचे दिसून आले आहे. १९०१ पासूनच्या १२२ वर्षांतील मार्च महिन्याच्या कमाल तापमानाचा विचार करता यंदाचा मार्च सर्वांत उष्ण ठरला. तर एप्रिल महिन्यातही उन्हाचा चटका कायम असल्याचे दिसून आले आहे.

बुधवारी (ता. २०) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये उत्तरेकडील हिमाचल प्रदेश, हरियाना, चंडीगड, दिल्ली, राजस्थानमध्ये तीव्र उष्ण लाट, तर पंजाब, मध्य प्रदेश, झारखंड, पश्‍चिम उत्तर प्रदेश, सौराष्ट्र, कच्छ या भागांत उष्णतेची लाट आली. अनेक ठिकाणी तापमान ४० ते ४४ अंशांच्या दरम्यान होते. तर काही ठिकाणी तापमान ४४ अंशांच्या वर गेल्याने ही शहरे जगात सर्वांत उष्ण ठरली आहेत.

विदर्भ यंदाही तापलेला...

विशेष म्हणजे महाराष्ट्रातील विदर्भात उन्हाचा चटका अधिक असल्याचे दिसून आले आहे. अकोला, चंद्रपूर, वर्धा (प्रत्येकी ४४.८ अंश) ही जगभरातील दुसऱ्या क्रमांकाची उष्ण शहरे ठरली आहेत. त्या पाठोपाठ ब्रह्मपुरी (४४.७ अंश) शहरातही उच्चांकी तापमान नोंदले गेले. विदर्भासह उत्तर महाराष्ट्र, मराठवाड्यातही ४३ अंशांपेक्षा अधिक तापमानाची नोंद होत आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Weather Alert: मराठवाडा, विदर्भात वादळी पावसाची शक्यता

Rain Crop Damage: पावसामुळे १४९० हेक्टरला फटका

Milk Regulation: उत्पादक, विक्रेत्यांना नोंदणी बंधनकारक

Unseasonal Rain Impact: पूर्वमोसमी पावसाचा दणका सुरूच

Pesticide Price Increase : कीटकनाशकांच्या किंमतीत वाढ होण्याची शक्यता; पश्चिम आशियातील तणावामुळे पुरवठा विस्कळीत

SCROLL FOR NEXT