Lumpy Skin Disease Agrowon
ताज्या बातम्या

Lumpy Skin : सोलापूर जिल्ह्यात लम्पी स्कीनचा वाढता प्रादुर्भाव

सोलापुराचा रिकव्हरी रेट ६४ टक्के; वासरांमध्ये सर्वाधिक लक्षणे

Team Agrowon

सोलापूर ः सोलापूर जिल्ह्यात लम्पी स्कीनचा (Lumpy Skin) प्रादुर्भाव वाढत असला, तरी नियंत्रणात आहे. त्यातही वासरांमध्ये सर्वाधिक लक्षणे आढळून येत आहेत, सध्या थंडीचे दिवस असल्याने लहान वासरांमध्ये लम्पी स्कीनसह न्युमोनियाचे प्रमाणही वाढत आहे. असे असले तरी लम्पीच्या आजाराने दुसरीकडे जनावरेही बरी होत आहेत. सध्या लम्पी स्कीनचा रिकव्हरी रेट ६४ टक्क्यांपर्यंत आहे.

जिल्ह्यातील माळशिरस, पंढरपूर, माढा, सांगोला आणि करमाळा या तालुक्यांमध्ये सुरवातीपासूनच लम्पी स्कीनचा प्रादुर्भाव अधिक आहे. पशुसंवर्धन विभाग आपल्या परीने त्यासाठी प्रयत्न करत आहे. यापूर्वी प्रत्येक तालुकानिहाय लसीकरणासाठी शिबिरेही घेण्यात आली आहेत. पण लम्पीचा प्रादुर्भाव नियंत्रणात येत नव्हता, पण सध्या काही प्रमाणात तरी तो नियंत्रणात आहे. सर्वाधिक लागण असलेल्या या तालुक्यात संकरित जनावरांचा समावेश अधिक आहे. तसेच एकाच गोठ्यात दहा ते पंधरा जनावरे तर काही ठिकाणी वीस ते पंचवीस जनावरे आहेत.

अनेक ठिकाणी मुक्तपद्धतीचे गोठे असल्यानेही लम्पीला वाढण्यास वातावरण पोषक होत आहे. लम्पीवर सध्या पशुसंवर्धन विभागाचे पथके काम करतच आहेत. पण शेतकऱ्यांचेही प्रबोधन मोठ्या प्रमाणात कऱण्यात येत आहे. शेजारच्या पुणे जिल्ह्यातील काही तालुक्यातूनही पशुधन विकास अधिकाऱ्यांकडे जिल्ह्यातील जबाबदारी देण्यात आली आहे. उदगीरच्या पशुवैद्यकीय महाविद्यालयातील प्राध्यापकांचेही मार्गदर्शन घेतले जात आहे, असे पशुसंवर्धन विभागाचे प्रभारी उपायुक्त डॅा. भस्कर पराडे यांनी सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shiv Sena Split Case: शिंदेंनी कोणत्या आधारे 'मुख्य नेता' पद स्वतःला बहाल केलं? ठाकरेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद

Rain Damage Compensation: अतिवृष्टीग्रस्तांसाठी ३९ कोटींच्या निधी वाटपाला गती

Krantisinha Nana Patil Award : क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार’ राजू देसले यांना

Farmers Loan Waiver: शेतकऱ्यांची कर्जमुक्तीकडे वाटचाल

Koyna Dam Water : कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद

SCROLL FOR NEXT