Weather Update Agrowon
ताज्या बातम्या

Weather Update : राज्यात पावसाची उघडीप शक्य

मध्य भारतातील कमी दाब क्षेत्र निवळल्यानंतर राज्यात पावसाचा जोर कमी झाला आहे. अनेक ठिकाणी पावसाने उघडीप दिल्याने उन्हाचा चटका आणि उकाड्यात वाढ झाली आहे.

टीम ॲग्रोवन

पुणे : मध्य भारतातील कमी दाब क्षेत्र निवळल्यानंतर राज्यात पावसाचा जोर (Rain Intensity) कमी झाला आहे. अनेक ठिकाणी पावसाने उघडीप दिल्याने उन्हाचा चटका (Temperature) आणि उकाड्यात (Heat) वाढ झाली आहे.

आज (ता. २४) पूर्व विदर्भात विजांसह पावसाची शक्यता (Rain Forecast With Lightning) आहे. तर उर्वरित राज्यात ढगाळ हवामानासह पावसाची मुख्यतः उघडीप राहण्याचा अंदाज हवामान विभागाने (Weather Department) वर्तविला आहे.

मॉन्सूनने वायव्य भारतातून परतीचा प्रवास सुरू केला असून, मंगळवारी (ता. २०) राजस्थानच्या खाजूवाला, बिकानेर, जोधपूर, आणि गुजरातच्या नालिया पर्यंतच्या भागातून मॉन्सून परतला आहे.

परतीच्या प्रवासात कोणतीही वाटचाल न झाल्याने शुक्रवारी (ता. २३) मॉन्सूनच्या परतीची सीमा कायम होती. मध्य प्रदेश आणि परिसरावर चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. बंगालच्या उपसागरापासून या प्रणाली पर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा कायम आहे.

राज्यात ढगाळ वातावरण असून, कमाल तापमान आणि उकाड्यात वाढ होत आहे. आज (ता. २४) पूर्व विदर्भात विजांसह पावसाचा इशारा (येलो अलर्ट) देण्यात आला आहे. तर उर्वरित राज्यात आकाश ढगाळ राहून, मुख्यतः कोरड्या हवामानाचा अंदाज आहे. तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यताही वर्तविण्यात आली आहे.

विजांसह पावसाचा इशारा (येलो अलर्ट) :

विदर्भ : अमरावती, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, गोंदिया, भंडारा, गडचिरोली.

शुक्रवारी (ता. २३) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी पडलेला पाऊस, मिलीमीटरमध्ये (स्रोत : हवामान विभाग) :

कोकण : उल्हासनगर, माथेरान, ठाणे, डहाणू, तळा, तलासरी, भिवंडी, शहापूर, श्रीवर्धन, अंबरनाथ, पनवेल, माणगाव, वसई प्रत्येकी १०.

मध्य महाराष्ट्र : चाळीसगाव, इगतपूरी प्रत्येकी १०.

मराठवाडा : लातूर, बिलोली प्रत्येकी ३०, कन्नड, परळी वैजनाथ, अंबेजोगाई प्रत्येकी २०, शिरूर कासार, केज प्रत्येकी १०.

विदर्भ : सिरोंचा ६०, भामरागड ४०, लाखणी, कुही, साकोली प्रत्येकी २०, तुमसर, रामटेक, सेलू, मोहाडी, सावनेर, कामठी प्रत्येकी १०.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Mahrashtra Summer Weather: उन्हाचा चटका अन् वादळी पावसाचा इशारा

Agricultrure Funding: मंजुरीपेक्षा जास्त निधी देत केंद्राचा सुखद धक्का

Sugar Industry: साखर कारखान्यांना आर्थिक मदत देण्याचा सरकारचा निर्णय, मुख्यमंत्री फडणवीसांची घोषणा

Ice Apple Demand: उन्हामुळे ताडगोळ्यांना मोठी मागणी

Beetroot Farming: वाणगावच्या बीटचा दिल्लीत गोडवा

SCROLL FOR NEXT