Maharashra Monsoon Prediction: उन्हाचा चटका तापदायक ठरत असताना, परतीच्या पावसाने दिलासा दिला आहे. आज (ता. २२) राज्यात सर्वदूर जोरदार वारे, मेघगर्जना आणि विजांसह वादळी पावसाची शक्यता आहे. तसेच कोकणातील रायगड, मध्य महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्याचा घाटमाथा आणि सोलापूर जिल्ह्यात जोरदार पावसाचा अंदाज असल्याने सतर्कतेचा इशारा (येलो अलर्ट) देण्यात आला आहे. तर उर्वरित राज्यात तुरळक ठिकाणी विजांसह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे..मध्य तमिळनाडू परिसरावर ४.५ ते ७.६ किलोमीटर उंचीवर चक्राकार वारे वाहत आहेत. ठळक कमी दाबाच्या चक्राकार वाऱ्यापासून तमिळनाडू, केरळ ते आग्नेय अरबी समुद्रापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा विस्तारला आहे. ईशान्य अरबी समुद्रात समुद्र सपाटीपासून ३.१ ते ७.६ किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती कायम आहे..सोमवारी (ता. २१) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये अकोला येथे राज्यातील उच्चांकी ३५.३ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. महाबळेश्वर येथे राज्यातील नीचांकी १८.३ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले. सकाळी ८.३० वाजेपर्यंतच्या २४ तासांत सोलापूरमधील मोहोळ येथे सर्वाधिक ५० मिलिमीटर पावसाची नोंद झाली..Maharashtra Rain Update: कोकण, घाटमाथा, विदर्भ आणि मराठवाड्यात पावसाचा अंदाज.आज (ता. २२) कोकणातील रायगड, मध्य महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्याचा घाटमाथा, सोलापूर जिल्ह्यात जोरदार पावसाची, तसेच कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात ताशी ३० ते ४० किलोमीटर वेगाने वाहणारे वारे, मेघगर्जना, विजांसह वादळी पावसाची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा (येलो अलर्ट) देण्यात आला आहे. तर उर्वरित राज्यात ढगाळ हवामानासह तुरळक ठिकाणी विजांसह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे..कमी दाब क्षेत्र झाले ठळकबंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाची तीव्रता वाढत आहे. सोमवारी (ता. २१) पश्चिम-मध्य बंगालच्या उपसागरातील प्रणाली ठळक होऊन, तिला लागून समुद्र सपाटीपासून ७.६ किलोमीटर उंचीपर्यंत चक्राकार वाऱ्यांची स्थिती होती. वायव्येकडे सरकत असलेली ही प्रणाली आज (ता. २२) आणखी तीव्र होण्याचे संकेत आहेत. उद्यापर्यंत (ता. २३) ही प्रणाली ओडिशा-आंध्र प्रदेशच्या किनाऱ्याकडे येण्याची शक्यता आहे..सोमवारी (ता. २१) सकाळी ८.३० वाजेपर्यंतच्या २४ तासांमध्ये नोंदले गेलेले तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) :ठिकाणे---तापमान कमाल---तापमान किमानपुणे---३२.०---२३.३अहिल्यानगर---३३.९---२३.३धुळे---३४.०---१९.८जळगाव---३३.७---२१.१जेऊर---३४.५---२३.०कोल्हापूर---३२.८---२२.३महाबळेश्वर---२३.१---१८.३.Weekly Weather: उघडिपीसह अल्प पावसाची शक्यता.मालेगाव---३३.२---२१.२नाशिक---३१.९---२३.९निफाड---३३.७---२३.६सांगली---३४.४---२२.६सातारा---३३.२---२१.४सोलापूर---३३.६---२४.६सांताक्रूझ---३२.३---२६.५.डहाणू---३२.७---२४.६रत्नागिरी---३२.५---२६.१छत्रपती संभाजीनगर---३३.८---२३.८धाराशिव---३०.९---२१.७परभणी---३३.५---२३.०परभणी (कृषी)---३३.५---२३.०अकोला---३५.३---२४.७.अमरावती---३५.८---२२.७ब्रह्मपूरी---३३.५---२४.२बुलडाणा---३२.८---२३.०चंद्रपूर---३३.६---२४.२गडचिरोली---३३.२--२४.४गोंदिया---३४.०---२१.२नागपूर---३३.६---२२.४वर्धा---३५.०---२४.२वाशीम---३३.०---निरंकयवतमाळ---३३.८---१९.२.सरासरी तापमान (अंश से.)विभाग---किमान---कमालउत्तर महाराष्ट्र---१९.८---३३.०पश्चिम महाराष्ट्र---१८.८---३४.०कोकण---२४.६--३२.७मराठवाडा---२१.७---३३.८विदर्भ---१९.२---३५.८.जोरदार पावसाची शक्यता (येलो अलर्ट) : रायगड, सातारा घाटमाथा, सोलापूर.विजांसह वादळी पावसाचा अंदाज (येलो अलर्ट) : ठाणे, रत्नागिरी, नाशिक, अहिल्यानगर, पुणे, सातारा, कोल्हापूर, सांगली, बीड, जालना, परभणी, हिंगोली, धाराशिव, लातूर, नांदेड, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली.उन्हाचा चटका अधिक असलेली ठिकाणे (तापमान अंश सेल्सिअसमध्ये) : अकोला ३५.३, वर्धा ३५, जेऊर ३४.५, सांगली ३४.४, धुळे ३४..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.