Agriculture Income Agrowon
ताज्या बातम्या

Agriculture Income : काळ प्रकल्‍पामुळे शेती उत्‍पन्नात वाढ

अनेक गावे टँकर मुक्त झाली आहेत. तसेच वर्षांतून एकच पीक घेणारे शेतकरी दुबार पीक घेऊ लागले आहेत. पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही निकाली निघाला आहे.

Team Agrowon

माणगाव ः माणगाव हा डोंगराळ व दुर्गम तालुका आहे. डोलवहाळ बंधारा उभारणीपूर्वी तालुक्यातील सुमारे दीडशे ते दोनशे गावांतील नागरिकांना विशेषतः उन्हाळ्यात पाण्यासाठी (Water) मैलोन् मैलाची पायपीट करावी लागत होती.

तर खरीप हंगामानंतर (kharif Season) शेतकऱ्यांना अन्य रोजगाराचे (Employment) साधने नसल्यामुळे कुटुंबातील तरुण-तरुणी मुंबईत स्थलांतरित होऊन नोकरी करायचे, मात्र डोलवहाळ बंधाऱ्यामुळे शेकडो गावांच्या पाणी पुरवठा योजनांना (Water Supply Scheme) संजीवनी मिळाली आहे.

अनेक गावे टँकर (Tanker Free Village) मुक्त झाली आहेत. तसेच वर्षांतून एकच पीक घेणारे शेतकरी दुबार पीक घेऊ लागले आहेत. पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही निकाली निघाला आहे. दुबार शेतीमुळे शेतकऱ्यांच्या आर्थिक उत्‍पन्नातही भर पडली आहे.

सह्याद्रीच्या कडे-कपारीत वसवलेल्या माणगाव तालुक्यात प्रामुख्याने कुणबी समाजाचे लोक पारंपरिक पद्धतीने पिढ्यानपिढ्या शेती करतात.

याठिकाणी सुमारे ३०० ते ४०० सेंटीमीटर एवढे वार्षिक पर्जन्यमान असतानाही केवळ भाताचे एकच पीक पूर्वी घेतले जायचे.

साहजिकच शेतकरी कुटुंबाची गुजराण करताना आर्थिक ओढाताण व्हायची. त्‍यामुळे भातपीक आल्‍यावर अनेकजण नोकरी-व्यवसायानिमित्‌त मुंबईत स्‍थलांतरित व्हायचे.

पावसाळा संपल्यानंतर जेमतेम महिनाभर नदीतील पाण्याचे स्रोत सुरू राहायचे, त्‍यानंतर नागरिकांची व जनावरांची पाण्यासाठी वणवण सुरू व्हायची, तो पुढील पावसाळा येईपर्यंत.

रोहा तालुक्यातील डोलवहाळ येथे काळ प्रकल्प उभारल्यामुळे शेतकऱ्यांची भटकंती थांबली आहे. शिवाय दुबार पीक घेता येत असल्‍याने आर्थिक उत्‍पन्नही वाढले आहे.

रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यातील कुंडलिका नदीवर काळ प्रकल्पांतर्गत डोलवहाळ विक्षेपण बंधारा बांधून भिरा येथील टाटा जलविद्युत केंद्रातून बाहेर पडणाऱ्या अतिरिक्‍त जलावर काळ प्रकल्प कार्यान्वित झाला आहे.

१९७६ पासून प्रत्यक्ष सिंचनास सुरुवात झाली. काळ प्रकल्पांतर्गत माणगावमधील ७६ व रोह्यातील ४८ गावांना उन्हाळी हंगामात सिंचनासाठी पाणी मिळते.

पारंपरिक शेतीला बगल देत काही शेतकरी पीक, त्याचे वाण, लागवड, मशागत, सिंचनाच्या नव्या वाटा शोधत आहेत. लहरी निसर्गामुळे शेतीचे नुकसान होत असताना, शेतकरी शाश्वत उत्पन्नाचा मार्ग अवलंबत आहेत. भातपीक लागवड व भाजीपाला, कलिंगड, कडधान्य उत्पादन घेऊन अर्थकारणाला बळकटी देण्यास काही शेतकऱ्यांना यश आले आहे. उन्हाळी भातपीक हे नगदी व शाश्वत पीक म्हणून ओळखले जाते.
पंकज तांबे, जिल्हा उपाध्यक्ष कॉंग्रेस

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Bajara Farming: बाजरीची पेरणी आणि खत व्यवस्थापन; चांगल्या उत्पादनासाठी महत्त्वाच्या गोष्टी

RBI MPC Meeting 2026: कर्जाचा हप्ता वाढणार नाही, पण कमी पावसामुळे महागाई वाढणार- आरबीआय गर्व्हनर

Modern Sowing Machines: पेरणीकरिता आधुनिक यंत्रांचा वापर

Crop Impact Management: विदर्भातील पर्जन्यमान अन् पिकांवरील परिणाम

Kharif Crop Planning: खरिपाच्या पूर्वतयारीसाठी हे मुद्दे नका विसरू

SCROLL FOR NEXT