Crop Loan Agrowon
ताज्या बातम्या

Crop Loan : कपाशी, तूर, मूग, ऊस पिकाच्या कर्जदारात वाढ

Kharif Loan : खऱीप हंगामात कपाशी, तूर, मूग, उडीद, ऊस या पिकांच्या कर्जदरात वाढ करण्यात आली आहे. सोयाबीन, हळद या पिकांचे कर्जदर गतवर्षीएवढेच आहेत.

Team Agrowon

Parbhani News : हंगामी पिके, बागायती पिके, फळे, भाजीपाला पिकांसाठी प्रतिएकरी कर्ज दर तसेच शेतीपूरक व्यवसायासाठी आवश्यक खेळत्या भांडवलासाठी कर्जदर निश्चित करण्यात आले आहेत. कपाशी, तूर, मूग, उडीद, ऊस या पिकांच्या कर्जदरात वाढ करण्यात आली आहे. सोयाबीन, हळद या पिकांचे कर्जदर गतवर्षीएवढेच आहेत.

राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक (नाबार्ड) च्या सूचनेनुसार जिल्ह्यात या (२०२३-२४ ) आर्थिक वर्षासाठी जिल्हास्तरीय तांत्रिक समितीने केलेल्या शिफारशीनुसार हे कर्जदर निश्‍चित करण्यात आले. यावर्षी बागायती कपाशीच्या कर्जदरात २ हजार रुपये, ठिबक सिंचनावरील कपाशी ३ हजार रुपये, तूर १ हजार रुपये, तर मूग, उडदाच्या कर्जदरात प्रत्येकी १ हजार २०० रुपये वाढ करण्यात आली आहे. उसाच्या कर्जदरात १ हजार रुपये ते १० हजार ४०० रुपयांची वाढ केली आहे.

प्रमुख पिकांसाठी यंदाचे एकरी कर्जदर (कंसात रुपये)

हंगामी पिके ः कापूस बागायती (३१०००), कापूस जिरायती (२४०००), कापूस ठिबक सिंचन (३३०००) सोयाबीन (२२०००), तूर (१६०००), मूग (१००००), उडीद (१००००), ज्वारी खरीप (१२०००), ज्वारी रब्बी (१३५००), बाजरी (१२०००), गहू (१२०००), गहू बागायती (१७०००), हरभरा (१५०००), करडई (१२८००), सूर्यफूल (१२०००), भुईमूग (१८०००).

बागायती पिके ः ऊस सुरु, पूर्वहंगामी (५२०००), ऊस आडसाली (५४०००), ऊस खोडवा (५४०००), केळी (४४०००), केळी टिश्यू कल्चर (५६०००), हळद (४७०००).

फळपिके ः संत्रा, मोसंबी (३५२००).आंबा (६२०००), द्राक्षे (१२८०००),पेरू (२८०००), लिंबू (३१०००), सीताफळ (२४०००), डाळिंब (५७०००), आवळा (१७६००), पपई (३००००), ड्रॅगन फ्रूट (२३०८००).

शेडनेट, पॉलिहाऊस संरक्षित शेती पिके कर्जदर (प्रति १० गुंठे क्षेत्रासाठी) गुलाब, लिलियम (४२६०००), जरबेरा, कार्नेशन (६१००००), अॅलोवेरा, ऑरचिड (७०००००), ढोबळी मिरची (१५००००).

शेतीपूरक व्यवसाय खेळते भांडवल कर्जदर ः दुग्धव्यवसाय गाय - म्हैस १, (३३२५०,३५१५०), शेळी, मेंढी पालन १० अधिक १ (३०४०००), कुक्कुटपालन (बॉयलर) १००० पक्षी (१ लाख रुपये), कुक्कुटपालन अंडिउत्पादन १००० पक्षी (७१२५००), मत्स व्यवसाय (१ हेक्टरी शेततळी) (२२००००),मत्स्यव्यवसाय तलाव, नदी (२८५००),रेशीम शेती (११००००),मधुमक्षिकापालन (८५०००)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Rain Alert : राज्यात पावसाचा जोर ओसरणार

Sugar Rate : श्रावणातील वाढत्या मागणीमुळे साखरेचे दर वाढण्याची शक्यता

Cooperative Institute Maharashtra : सहकारी संस्था चांगल्या पद्धतीने चालल्या पाहिजेत

Agriculture Scheme : कृषी स्वावलंबन, कृषिक्रांती योजनेकडे शेतकऱ्यांचा कल

Fertilizer Stock : युरिया, डीएपी खतांचा साठा शेतकऱ्यांसाठी खुला

SCROLL FOR NEXT