Chana Sowing Agrowon
ताज्या बातम्या

Chan Sowing : पुणे विभागात हरभरा पेरणी क्षेत्रात वाढ

गेल्या काही दिवसापासून थंडीत काहीशी वाढ झाल्यामुळे रब्बी हंगामात हरभरा पेरणीच्या क्षेत्रात वाढ झाली आहे.

Team Agrowon

पुणे ः गेल्या काही दिवसापासून थंडीत (Cold Weather) काहीशी वाढ झाल्यामुळे रब्बी हंगामात हरभरा पेरणीच्या (Chana Sowing) क्षेत्रात वाढ झाली आहे. आत्तापर्यंत पुणे विभागात सरासरीच्या एक लाख ८२ हजार ११९ हेक्टरपैकी एक लाख ९१ हजार ३८ हेक्टर म्हणजेच १०५ टक्के पेरण्या (Sowing) झाल्या आहेत.

पेरणी झालेल्या ठिकाणी पिके वाढीच्या अवस्थेत असून, सरासरीच्या तुलनेत ८ हजार ९१९ हेक्टरने पेरणीच्या क्षेत्रात वाढ झाली असल्याचे कृषी विभागाच्या सूत्रांनी सांगितले. हरभऱ्याला चांगले दर मिळत असल्याने मागील काही वर्षापासून हरभरा पिकाकडे शेतकरी मोठ्या प्रमाणात वळत आहेत.

विभागात हरभऱ्यांचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात आहे. यंदाही शेतकऱ्यांनी ज्वारी, गहू, हरभरा या पिकांची पेरणी केली आहे. यामध्ये शेतकऱ्यांनी हरभरा पिकांमध्ये कृषी विद्यापीठाकडील विजय, विशाल यांसारख्या वाणाच्या हरभऱ्यांची पेरणी केली आहे.

यंदा पावसामुळे अनेक ठिकाणी नुकसान झाले असताना हरभरा उत्पादक शेतकऱ्यांनी आर्थिक परिस्थिती नसताना पीककर्ज घेऊन रब्बीची तयारी केली आहे. अनेक शेतकऱ्यांनी बैलाच्या व ट्रॅक्टरच्या साहाय्याने पेरणी केली आहे. पाण्याची सुविधा असलेल्या शेतकऱ्यांनी हरभरा पिकांची पेरणी केली. परंतु ज्या ठिकाणी ओल कमी आहे, अशा ठिकाणी कमी प्रमाणात पेरण्या झाल्या आहेत.

विभागातील सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट तालुक्यात सर्वाधिक पेरणी झाली असून, सरासरीच्या १६ हजार ९५० हेक्टरपैकी २६ हजार ३०१ हेक्टर म्हणजेच १५५ टक्के पेरणी झाली आहे. तर दक्षिण सोलापूर, करमाळा, बार्शी, उत्तर सोलापूर, माढा, मंगळवेढा या तालुक्यांत चांगली पेरणी झाली आहे. पंढरपूर, माळशिरस, मोहोळ, सांगोला या तालुक्यांत कमी-अधिक प्रमाणात पेरणी झाली आहे.

नगर जिल्ह्यातील नगर तालुक्यात १० हजार ४९ हेक्टरपैकी सुमारे ११ हजार ५०१ हेक्टर म्हणजेच ११४ टक्के पेरणी झाली आहे. तर, पारनेर, कर्जत, जामखेड, पाथर्डी, अकोले, श्रीरामपूर या तालुक्यांत ५० टक्क्यांहून अधिक, तर शेवगाव, नेवासा, राहुरी, राहाता या तालुक्यांत कमी पेरणी झाली आहे.

पुणे जिल्ह्यात पुरंदर तालुक्यात सर्वाधिक पेरणी झाली असून, सरासरीच्या ३ हजार ६७ हेक्टरपैकी ३ हजार २२१ हेक्टर म्हणजेच १०५ टक्के पेरणी झाली आहे. तर उर्वरित तालुक्यात कमी-अधिक प्रमाणात पेरणी झाली आहे. ज्या ठिकाणी पेरणी झाली आहे, तेथे हरभरा उगवून आला असून, पिके वाढीच्या अवस्थेत आहे.

जिल्हानिहाय झालेली हरभरा पिकांची पेरणी (हेक्टरमध्ये)

जिल्हा --- सरासरी क्षेत्र --- झालेली पेरणी -- टक्के

नगर --- ८८,३७७ -- ८२,७७८ -- ९४

पुणे -- ३४,३३० -- १९,९९३ -- ५८

सोलापूर -- ५९,४१२ -- ८८,२६७ -- ११९

एकूण -- १,८२,११९ -- १,९१,०३८ -- १०५

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Kharif Sowing 2025: सोयाबीन, कापूस, तुरीची पेरणी कमी; मक्याच्या लागवडीत मोठी वाढ

New Tractor In India : कमी इंधनात जास्त ताकद; व्हीएसटीकडून ट्रॅक्टरची पाच मॉडेल बाजारात दाखल

Agriculture Minister Bharane: राज्याच्या कानाकोपऱ्यात जाऊन शेतकऱ्यांचे प्रश्न समजून घेणार; कृषिमंत्री दत्तात्रय भरणे

Rural Youth Farming : युवा शेतकरी ठरतोय अभ्यासपूर्ण शेतीचा आदर्श

Drought Management: कमी किंवा जास्त पावसात पीक व्यवस्थापनाच्या ४ सोप्या पध्दती!

SCROLL FOR NEXT