Team Agrowon
चालू वर्षात चांगला पाऊस झाल्यामुळे पाण्याचा मुबलक साठा उपलब्ध झाला आहे.
जमिनीमध्ये ओलावा भरपूर असल्यामुळे या रब्बी हंगामात (Rabi Season) हरभरा पिकाची लागवड झाली आहे.
हरभरा हे पीक द्विदल धान्य वर्गीय असल्यामुळे या पिकास युरियातून नत्र मात्रा देण्याची आवश्यकता नाही.
काही शेतकरी युरिया खत देत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे फायदा होण्याऐवजी नुकसानच होणार आहे, अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार यांनी दिली.
पिकाचा काटकपणा कमी होऊन किडीचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात होतो.
युरिया खत दिल्यामुळे पीक स्फुरद, पलाश, झिंक व लोह इत्यादी घटक जमिनीत उपलब्ध असून सुद्धा घेऊ शकत नाही. त्यामुळे उत्पादनात घट येते. असेही तोटावार यांनी म्हटले आहे.