परभणी ः वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने (Vasantrao Naik Marathwada Agriculture University) विकसित केलेले खरीप ज्वारीचा परभणी शक्ती (Parbhani Shakti Jowar Crop Verity), करडईचा पीबीएनएस १८४, देशी कपाशीचा पीए ८३७ (Cotton PA 837 Crop Verity) या तीन वाणांचा केंद्रीय बियाणे समितीच्या शिफारशीनुसार राष्ट्रीय राजपत्रात (Three Crop Verity In Nation Gadget) (नॅशनल गॅझेट) समावेश झाला आहे. त्याबाबत केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाने ३१ ऑगस्ट रोजी अधिसूचना प्रसिद्ध केली आहे, अशी माहिती संशोधन संचालक डॉ. दत्तप्रसाद वासकर यांनी दिली.
करडईचा पीबीएनएस १८४ या वाणास महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तमिळनाडू, तेलंगणा आदी राज्यांकरिता तर देशी कापसाच्या पीए ८३७ या वाणाची आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक आणि तमिळनाडू राज्यात विक्रीसाठी प्रसारण करण्यास मान्यता देण्यात आली.खरीप ज्वारीच्या परभणी शक्ती वाणास महाराष्ट्र राज्यात प्रसारणास मान्यता प्राप्त झाली. यामुळे बियाणे साखळीमध्ये
या वाणांचा बीजोत्पादन कार्यक्रम घेता येईल.
या वाणांचा प्रचार व प्रसार महाराष्ट्रासह बाहेरील राज्यात मोठ्या प्रमाणावर होण्यास मदत होणार आहे. या राजपत्राचा नोंदणीकृत क्रमांक एसओ ४०६५ अ हा आहे. या बद्दल कुलगुरू डॉ. इंद्र मणी यांनी शास्त्रज्ञांचे अभिनंदन केले, असे डॉ. वासकर यांनी सांगितले.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.