Importance of Millets Agrowon
ताज्या बातम्या

Millets: भरडधान्याचा आहारामध्ये समावेश करा

आंतरराष्ट्रीय भरडधान्य वर्षानिमित्त दीनदयाल शोध संस्थान कृषी विज्ञान केंद्र डिघोळआंबा येथे ‘महिला शेतकरी मेळावा’ आणि भरडधान्य आधारित पोषण आहार स्पर्धा पार पडली.

Team Agrowon

अंबाजोगाई, जि. बीड : महिलांनी राळ, नाचणी, भगरीचा भात तसेच इतर पोषण आहाराचा भरड धान्याची (Millet) निर्मिती करून स्वतःच्या कुटुंबात वापर करावा, असा सल्ला गटविकास अधिकारी समृद्धी दिवाणे -काळे (BDO Samriddhi Dewane-Kale) यांनी दिला.

आंतरराष्ट्रीय भरडधान्य वर्षानिमित्त दीनदयाल शोध संस्थान कृषी विज्ञान केंद्र डिघोळआंबा येथे ‘महिला शेतकरी मेळावा’ आणि भरडधान्य आधारित पोषण आहार स्पर्धा पार पडली.

याप्रसंगी गटविकास अधिकारी समृद्धी दिवाणे-काळे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी व्यासपीठावर दीनदयाल शोध संस्थान बीडचे प्रकल्प प्रमुख डॉ. उपेंद्र कुलकर्णी, सामाजिक कार्यकर्त्या संध्या कुलकर्णी, मंडळ कृषी अधिकारी गोविंद ठाकूर, शास्त्रज्ञ गृहविज्ञान वैशाली देशमुख, सामाजिक कार्यकर्त्या नभा वालवडकर व वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख डॉ. वसंत देशमुख उपस्थित होते.

डॉ. कुलकर्णी म्हणाले, की महिला शेतकऱ्यांनी स्वावलंबी होण्याची गरज आहे. बाजारपेठ व विक्री व्यवस्थेचे ज्ञान व कौशल्य प्राप्त करून धान्य उत्पादनावर मूल्यवर्धन करून त्याच्या साठवणुकीबाबतही चालत असलेले संशोधन ग्रामीण भागापर्यंत येण्याची गरज आहे.

गोविंद ठाकूर यांनी तृणधान्य हे सहनशील पीक असून त्यास कमी निविष्टांची गरज असल्याने कमी खर्चात अधिक उत्पादन मिळते, असे सांगितले.

महिला बचत गटांनी भरड धान्याची विविध पाच उत्पादने निर्मिती करून पॅकिंग कौशल्य वापरून विक्रीस उपलब्ध करावी, असे आवाहन संध्या कुलकर्णी यांनी केले.

विविध भरडधान्य शरीराला ऊर्जा, प्रथिने, स्निग्ध पदार्थ व सूक्ष्म खनिजे आदी पोषकतत्वे प्रदान करतात. कॅन्सर उतीनिर्मिती प्रतिबंधक व मधुमेहासाठी उपयुक्त असे रोग प्रतिकारशक्तिदायक भरड धान्याची व त्यापासून तयार केल्या जाणाऱ्या विविध व्यंजनांची माहिती वैशाली देशमुख यांनी दिली.

सुदृढ समाजासाठी महिलांनी आपल्या पाल्याला समजूतदार बनवून व्यवहारिक ज्ञान द्यावे व लहानपणापासूनच सुदृढ आहार घेण्याची सवय लावावी, असे आवाहन नभा वालवाडकर यांनी केले. डॉ. वसंत देशमुख यांनी प्रास्ताविक केले.

याप्रसंगी आयोजित पोषण आहार स्पर्धेमध्ये बाजरी लाडू, बाजरी खिचडी, राजगिरा लाडू, धपाटे, ज्वारी कापोडी, गूळ कापणी व ज्वारी उपमा यासारखी विविध व्यंजने अनेक महिलांनी तयार करून मांडली होती.

पोषण आहार स्पर्धेमध्ये विजयी महिलांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच ‘अॅग्रोवन’ महिला युवा उद्योजक शेतकरी पुरस्कार प्राप्त केंद्राचे संपर्कित महिला शेतकरी लक्ष्मी बोरा (रा. सिंधी, ता. केज) यांचा केंद्रातर्फे सत्कार करण्यात आला.

सूत्रसंचालन केंद्राच्या गृहविज्ञान शास्त्रज्ञ रोहिणी भरड यांनी केले. आभार कृषी अभियंता प्रमोद रेणापूरकर यांनी मानले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Fertilizer QR Code: खत उपलब्धतेची माहिती आता ‘क्यूआर कोड’वर

Cement Granding Project: प्रस्तावित सिमेंट प्रकल्पाला मंजुरी देऊ नका

Narnala Festival: नरनाळा महोत्सव म्हणजे शेतकऱ्यांच्या ‘जखमेवर मीठ’

Padma Shri Award: प्रजासत्ताक पूर्वसंध्येला पद्म पुरस्कारांची घोषणा; महाराष्ट्राच्या चार व्यक्तींना पद्मश्री पुरस्कार जाहीर

Labor Supply Scam: ऊसतोड मुकादमांकडून वाहनधारकांची फसवणूक

SCROLL FOR NEXT