Agricultural Festival Agrowon
ताज्या बातम्या

Agricultural Festival : ‘कृषी’च्या क्रीडा, सांस्कृतिक महोत्सवाचे उद्‍घाटन

क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवाचे उद्‍घाटन करण्यापूर्वी कृषी विभागाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी शहरातून दुचाकी रॅली काढत तृणधान्याच्या आहारातील महत्त्वाबाबत नागरिकांमध्ये जनजागृती केली.

Team Agrowon

अकोला ः महाराष्ट्र शासन कृषी विभागाच्या (Department of Agriculture) पुढाकाराने अधिकारी, कर्मचाऱ्यांमधील सूप्तगुणांना वाव मिळवा तसेच कार्यालयीन कामकाजामध्ये खेळीमेळीचे वातावरण निर्माण होऊन एकमेकांशी स्नेहसंबंध जोपासले जावेत.

या हेतूने बुधवारपासून (ता. १) तीन दिवसांचा क्रीडा व सांस्कृतिक महोत्सव (Cultural Festival) आयोजित करण्यात आला आहे. या महोत्सवाचे उद्‍घाटन डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे (Dr. Panjabrao Deshmukh Agricultural University) कुलगुरू डॉ. शरद गडाख (Dr. Sharad Gadakh) यांच्या हस्ते झाले. या महोत्सवाचा समारोप शुक्रवारी (ता. ३) होईल.

या महोत्सवाच्या उद्‍घाटन प्रसंगी विभागीय कृषी सहसंचालक किसन मुळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. मुरली इंगळे, आत्मा प्रकल्प संचालक आरीफ शहा, उपविभागीय कृषी अधिकारी सुशांत शिंदे, बी. के. खोत व इतर उपस्थित होते.

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या क्रीडांगणावर सकाळी या महोत्सवाचे उद्‍घाटन झाले. या महोत्सवात इनडोअर व आउटडोअर स्वरूपातील खेळ तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन तीन दिवस करण्यात आले आहे.

तृणधान्य जनजागृती रॅली

क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवाचे उद्‍घाटन करण्यापूर्वी कृषी विभागाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी शहरातून दुचाकी रॅली काढत तृणधान्याच्या आहारातील महत्त्वाबाबत नागरिकांमध्ये जनजागृती केली.

यामध्ये कृषी खात्याच्या सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांपासून चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांपर्यंत सर्व अधिकारी, कर्मचारी सहभागी झाले होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Pune APMC: पुणे बाजार समितीचे चौकशी समिती अधिकारी बदलले

E-Gokatta: ‘ई-गोकट्टा’ उपक्रमातून देशी गोवंश संवर्धनाचा जागर

Bio Pesticide Conference: ‘राष्ट्रीय जैव कीटकनाशक परिषदे’चे आसाम कृषी विद्यापीठात आयोजन

Cooperative Policy 2025: सहकार धोरणातील बदलासाठी उच्चस्तरीय समिती

Sugarcane FRP: उसाला विनाकपात ३७५१ रुपये उचल मिळावी : राजू शेट्टी

SCROLL FOR NEXT