Onion Market Agrowon
ताज्या बातम्या

Onion Market : शिरूरमध्ये कांद्याला क्विंटलला १३५० रु. दर

शिरूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नवीन मार्केट यार्डवर भरणाऱ्या कांदा मार्केटमध्ये दिवसेंदिवस कांद्याच्या आवकेत लक्षणीय वाढ होत आहे.

Radhika Mhetre

ॲग्रोवन वृत्तसेवा
Onion Market Rate : पुणे : शिरूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या (Shirur Agricultural Produce Market Committee) नवीन मार्केट यार्डवर भरणाऱ्या कांदा मार्केटमध्ये दिवसेंदिवस कांद्याच्या आवकेत लक्षणीय वाढ होत आहे.

नवीन मार्केट यार्डमध्ये कांद्याचे जाहीर लिलाव आठवड्यातील शनिवार वगळता दररोज भरत आहे.

कांदा मार्केटमध्ये दररोज कांद्याची सुमारे आठ ते नऊ हजार पिशवीची आवक होत आहे. मंगळवारी (ता. ३०) चांगल्या प्रतीच्या कांद्यास रुपये १३५० प्रतिक्विंटल याप्रमाणे दर मिळाला.

शिरूर येथे परिसरातील शेतकऱ्यांना आपल्या शेतामध्ये पिकविलेल्या कांद्यासाठी जवळची आणि हक्काची बाजारपेठ मिळाली असून शेतकरी वर्ग अत्यंत समाधानी आहे.

तसेच शेतकऱ्यांचा वाहतूक खर्च व वेळेची मोठी बचत होत आहे. त्यामुळे रविवार, बुधवार, शुक्रवार या दिवशी आवक जास्त असते.

कांदा पीक शेतकऱ्यांचे नगदी पीक असून शिरूर यार्डवर शिरूर, पारनेर, श्रीगोंदा, खेड, दौंड, जुन्नर तालुक्यांतून शेतकऱ्यांना जवळचे मार्केट असल्यामुळे चांगली आवक होत आहे. बाजार समितीने यार्डवर शेतकऱ्यांचा कांदा उतरविण्यासाठी प्रशस्त असे चार शेड, लाईट, स्वच्छतागृह, सी.सी.टी.व्ही. इत्यादी आवश्यक त्या पायाभूत सुविधा उभारलेल्या आहेत.

पुणे व शेजारील नगर, नाशिक जिल्ह्यांमध्ये हळवा व गरवा जातीचा डबल पत्ती असणाऱ्या कांद्याची मोठ्या प्रमाणावर लागवड केली जाते.

हा कांदा टिकाऊ असून त्यास चांगली मागणी असते. यार्डवरील कांदा कर्नाटक, आंध्र प्रदेश, केरळ, तमिळनाडू, पश्चिम बंगाल, झारखंड, आसाम तसेच राजस्तान, दिल्ली, जम्मू-काश्मीर इत्यादी राज्यांमध्ये विक्रीसाठी जात असतो.

शेतकऱ्यांनी पिकविलेला शेतीमाल मार्केट यार्डवरच विक्रीठी आणावा. शिरूर बाजार समितीच्या नवीन मार्केटयार्डवर रविवार ते शुक्रवार दररोज सकाळी ११ च्या आत कांदा विक्रीसाठी आणण्याचे तसेच वाळवून, निवडून गुलटी, दुभळका वेगवेगळ्या बारदाण्यात प्रतवारी करून आणावा.

यार्डवर कांदा विक्रीचे दर नेहमी इतर मार्केटपेक्षा जास्तच निघत असल्याचे सचिव अनिल ढोकले यांनी सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

PDKV Garlic Planter: दुष्काळात लसूण लागवडीत बियाण्याची बचत करा; पीडीकेव्हीचे टोकण यंत्र ठरेल फायदेशीर

Fertilizer Subsidy: 'रब्बी'साठी स्फुरद, पालाशयुक्त खतांच्या अनुदान रकमेत वाढ; 'डीएपी'ची पिशवी १,३५० रुपयांनाच

Farmer Government Schemes: जमीन कसणाऱ्या शेतकऱ्यांनाही सरकारी योजनांचा लाभ मिळणार, सरकारचा महत्त्वाचा निर्णय

Agrowon Diwali Article: ‘कृषिगती’चा इलेक्ट्रिक साथी’

Agrowon Diwali Article: गावकुसातील तरुण ‘क्रिएटर्स’

SCROLL FOR NEXT