Crop Damage Agrowon
ताज्या बातम्या

Crop Damage : नांदेड जिल्ह्यात गारपिटीने उरल्या पिकांचीही नासाडी

नांदेड जिल्ह्यात मागील चार दिवसांपासून वादळी पावसाने मुक्काम ठोकला आहे.

Team Agrowon

Nanded News नांदेड जिल्ह्यात मागील चार दिवसांपासून वादळी पावसाने (unseasonal Rain) मुक्काम ठोकला आहे. बुधवारनंतर (ता. २६) गुरुवारी (ता. २७) दुपारी वादळी वाऱ्या‍सह गारपीट (Hailstorm) झाली.

त्यामुळे जिल्ह्यातील हजारो झाडे उन्मळून पडली. तर उन्हाळी ज्वारी, सोयाबीन, टरबूज, आंबा, केळी, पपई आदी पिकांचे नुकसान झाले. सलगच्या गारपिटीने उरल्या-सुरल्या पिकांची नासाडी झाली आहे.

वादळी पावसाने अनेकांच्या घरावरील पत्रे उडून गेले. वीज पडून जनावरेही दगावली आहेत. जिल्ह्यात सोमवारपासून पावसाने मुक्काम ठोकला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. केळी पिकांसह पपई, आंबा, टरबूज, उन्हाळी सोयाबीन, ज्वारी ही पिके जमीनदोस्त झाली आहेत.

बुधवारनंतर गुरुवारी जिल्ह्यात पुन्हा अवकाळीने जोरदार हजेरी लावली. या वेळी गारांचाही मारा झाला आहे. परिणामी, नायगाव, लोहा, कंधार तालुक्यांतील हळद, उन्हाळी सोयाबीन, उन्हाळी ज्वारी, टरबूज, पपई, कांदा आदी पिकांचे मोठे नुकसान झाले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Loan : सावकारी कर्ज फेडण्यासाठी शेतकऱ्याने विकली किडनी; चंद्रपूर जिल्ह्यातील धक्कादायक घटना

MGNREGA Scheme: मंत्र्यांकडून योजनांचा आढावा

Sickle Cell Disease: राज्यात सिकलसेलचे १२ हजार ४२० रुग्ण

Rabbi Sowing 2025 : रब्बी हंगामातील पेरणी जोमात; मागील वर्षीच्या तुलनेत ४.५ टक्क्यांनी आघाडी

Farmer ID: अकोल्यातील ४१ हजार शेतकरी फार्मर आयडीपासून लांब

SCROLL FOR NEXT