Soybean Sowing Agrowon
ताज्या बातम्या

Soybean Sowing : बीड जिल्ह्यात बऱ्याच ठिकाणी सोयाबीन उगवलेच नाही

Kharif Sowing : बीड जिल्ह्यात ११५ तक्रारी; शेतकऱ्यांचे मोठे नुकसान

Team Agrowon

Soybean Crop : बीड : ‘‘आधीच लांबलेल्या पावसाने पेरणीला विलंब केला असताना बियाणे न उगवल्याने शेतकऱ्यांच्या संकटात आणखी भर पडली आहे. जिल्ह्यात सोयाबीनच्या तब्बल १२१ हेक्टरवरील ११५ तक्रारी प्राप्त झाल्या. जवळपास ६५ टक्के तक्रारींची प्रत्यक्ष पाहणी झाली आहे. इतर तक्रारींची प्रत्यक्ष पाहणी करण्याचे काम सुरू आहे, अशी माहिती कृषी विभागाकडून देण्यात आली.

यंदा पावसाने पेरणीच्या कामात खोडा घातला आहे. १८ जुलैपर्यंत मराठवाड्यात ८० टक्के पेरणी उरकली होती. त्यापैकी बीड जिल्ह्यात जवळपास ८४ टक्के पेरण्या उरकल्या होत्या. पावसाची प्रतीक्षा असतानाच पेरले पण उगवलच नाही, अशी वेळ अनेक शेतकऱ्यांवर आली आहे. अनेक शेतकऱ्यांवर पुन्हा पेरणी करण्याची वेळ आली. ‘महाबीज’च्या बीजोत्पादन कार्यक्रमातीलच सोयाबीन पिकाच्याच उगवणी संदर्भात तक्रारी असल्याचे कृषी विभागाने सांगितले आले. यामध्ये सर्वाधिक ८९. ४ हेक्टरवरील ६१ तक्रारी अंबाजोगाई तालुक्यातील आहेत. त्यापाठोपाठ केज तालुक्यातून १५ हेक्टरवरील २५, धारूरमधून ६ हेक्टरवरील १०, पाटोद्यातून ३.२ हेक्टरवरील ८, बीडमधून २ हेक्टरवरील ५, तर माजलगावातील ४ हेक्टरवरील व परळी तालुक्यातील १.२ हेक्टरवरील प्रत्येकी ३ तक्रारींचा समावेश आहे.

इतर जिल्ह्यांतूनही तक्रारी

दाखल तक्रारींपैकी २२ जुलैपर्यंत ८६ तक्रारी संदर्भात प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली. त्यामध्ये अंबाजोगाई तालुक्यातील ४०, बीडमधील ५, माजलगावमधील ३, धारूरमधील ८, पाटोद्यातील ८, परळीमधील २ व केजमधील २० तक्रारींची प्रत्यक्ष पाहणी केली. छत्रपती संभाजीनगर व इतर जिल्ह्यांतही बियाणे उगवणीबाबत कृषी विभागाकडे तक्रारी प्राप्त झाल्या आहेत.

बीड जिल्ह्यातील जवळपास सर्वच तक्रारी ‘महाबीज’कडून देण्यात आलेल्या बीजोत्पादन कार्यक्रमातील बियाणे उगवणी संदर्भात आहेत. या संदर्भात प्रत्यक्ष पाहणी केलेल्या ठिकाणाचा अहवाल ‘महाबीज’ला देण्यात आला आहे. ‘महाबीज’ने या संदर्भात पावले उचलणे अपेक्षित आहे.

- सायप्पा गरंडे, कृषी विकास अधिकारी, जिल्हा परिषद बीड

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Rain Damage Relief: नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या तोंडाला सरकार पाने पुसणार

NCCF Branch Manager Transfer: ‘एनसीसीएफ’च्या शाखा व्यवस्थापकाची तडकाफडकी बदली

CCI Cotton Procurement: कापूस खरेदीसाठी एक सप्टेंबरपासून नोंदणी

Maharashtra Rain: विदर्भात विजांसह पावसाची शक्यता

Nashik Heavy Rain : नाशिकच्या पश्चिम पट्ट्यात अतिवृष्टी

SCROLL FOR NEXT