Elephant Rampage Agrowon
ताज्या बातम्या

Elephant Rampage : हत्तीमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई तत्काळ मिळणार

जिल्ह्यातील आजरा, चंदगड, राधानगरीसह इतर ठिकाणी हत्तीकडून होणाऱ्या नुकसानीसाठी तत्काळ मदत दिली जाणार आहे.

टीम ॲग्रोवन

कोल्हापूर : जिल्ह्यातील आजरा, चंदगड, राधानगरीसह इतर ठिकाणी हत्तीकडून (Elephant Rampage) होणाऱ्या नुकसानीसाठी (Crop Damage) तत्काळ मदत दिली जाणार आहे. शेती, प्रापंचिक साहित्य, कृषी अवजारे, घर किंवा वाहनांच्या मोडतोडीसाठी पाच हजार रुपयांपासून एक लाखांपर्यंत मदत दिली जाईल.

ज्या-त्या तालुक्यातील वनपाल, वनसंरक्षकांकडून याचा पंचनामा होईल. पंचनामा झाल्यावर २६ दिवसांत नुकसान भरपाईची रक्कम संबंधित व्यक्तीच्या नावावर जमा केली जाणार आहे. त्यामुळे नुकसान भरपाईसाठी आता वाट पाहावी लागणार नाही. कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा, चंदगड, भुदरगड, राधानगरीसह अभयारण्य परिसरांत हत्तीने नागरिकांचे जगणे अवघड करून ठेवले आहे.

दरम्यान, शासनाने अशा नुकसानग्रस्त शेतकरी आणि ग्रामस्थांसाठी तत्काळ नुकसान भरपाई मिळावी, यासाठी नवीन आदेश दिले आहेत. यात नुकसानग्रस्तांना पाच हजारांपासून एक लाख रुपयांपर्यंत नुकसान भरपाई दिली जाईल.

शेती अवजारे, उपकरणे आणि बैलगाडीचे नुकसान झाल्यास पाच हजार रुपयांपर्यंत, तर संरक्षक भिंती व कुंपणाचे नुकसान झाल्यास दहा हजार रुपये दिले जाणार आहेत. याशिवाय, एखाद्याचे कौलारू, सिमेंट, पत्र्याचे घर किंवा जनावरांच्या गोठ्याचे नुकसान केल्यास ५० हजार रुपये किंवा त्यापेक्षा कमी असणारी रक्कम मिळेल.

एखाद्या हत्तीने विटांच्या किंवा इमारतीच्या स्लॅबचे मोठे नुकसान केले असेल, तर एक लाख रुपयांपर्यंत रक्कम नुकसान भरपाई दिली जाणार आहे. ही नुकसान भरपाई मिळविण्यासाठी संबंधित शेतकऱ्यांना आवश्‍यक कागदपत्रांसह नुकसानीची तक्रार आपल्या तालुक्यातील

वनरक्षक, वनपाल व वनपरीक्षेत्र अधिकाऱ्यांकडे करावी लागे

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Drone: जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला कृषी ड्रोन हाताळणीचा अनुभव

Safflower Sowing: करडईच्या पेरणी क्षेत्रात घट

Soybean Market: सोयाबीनचे ७ कोटी ७१ लाख ७० हजार रुपयांचे चुकारे अदा

Sugarcane Farmer Issues: सीनाकाठच्या शेतकऱ्यांकडे कारखानदारांची पाठ

Manikrao Kokate: क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे पुन्हा अडचणीत, २ वर्षांची कारावासाची शिक्षा कायम, प्रकरण काय?

SCROLL FOR NEXT