Sirajgaon Project : सिरजगाव प्रकल्प ठरतोय सिंचनासाठी पांढरा हत्ती

नियोजनशून्य कारभारामुळे हजारो हेक्टर जमीन पाण्यावाचून तहानलेली
Irrigation Project
Irrigation Project Agrowon

नेर, यवतमाळ : तालुक्यातील शिरजगाव प्रकल्प (Sirajgaon Project ) सिंचनासाठी मृगजळ ठरत असून सिंचन विभागाच्या नियोजन शून्यतेमुळे परिसरातील हजारो हेक्टर जमीन पाण्यावाचून तहानलेली असल्याचे चित्र या ठिकाणी पाहावयास मिळते. सत्तावीस वर्षांपासून या परिसरातील शेतकऱ्यांचे सिंचनाचे स्वप्न धुळीस मिळाले असून, हा प्रकल्प सिंचनासाठी पांढरा हत्ती ठरला आहे.

Irrigation Project
विद्यापीठाची पांढरा हत्ती ही ओळख पुसणार...

१९९५ ला या प्रकल्पाचे लोकार्पण करण्यात आले. शेकडो हेक्टर सुपीक जमीन या प्रकल्पासाठी गेली. या प्रकल्पाचे पाणी १४ किलोमीटर लांब कालव्याद्वारे पोहोचवण्याचे नियोजन आहे. याद्वारे १०६७ हेक्टर शेत जमीन सिंचित होण्याचे उद्दिष्ट होते. १४ किलोमीटर लांब कालव्याच्या शेवटच्या भागापर्यंत सत्तावीस वर्षांत अजूनही पाणी पोहोचले नाही. कालवा कुठे खोल, तर कुठे उथळ या पद्धतीने निर्माण केला गेल्यामुळे पाणी शेवटच्या टोकापर्यंत पोहोचत नाही. शेतकऱ्यांना पाणी सोडण्यासाठी २४ लहान गेट आहेत. २४ पैकी ११ गेटला पाणी सोडण्यासाठी लोखंडी गेट आहे. मात्र उर्वरित ठिकाणी गेटच नसल्यामुळे पाणी अहोरात्र वाया जाते. मागील वर्षी ७००हेक्टर सिंचन झाले. प्रत्यक्षात ४००हेक्टरपेक्षा जास्त ओलित झाले नाही.

शासन स्तरावर दिली जाणारी आकडेवारी दिशाभूल करणारी आहे. नियमानुसार धरणाच्या भिंतीवर कुठल्याही प्रकारचे वृक्षवेली वाढू नये याची काळजी घेतली जाते. धरणाची भिंत वृक्षवेलींनी व्यापून आहे. कालव्याची निर्मिती करताना अनेक राजकीय शक्तींनी हा कालवा मर्जीप्रमाणे वळवल्यामुळे पाण्याचे वहन व्यवस्थित होत नाही. या धरणापासून शिरजगाव, पांढरी, व्याहाळी, अजनी, सावरगाव काळे, गोळेगाव, मलकापूर, खानापूर गावांतील शेकडो हेक्टर जमीन सिंचित होणे अपेक्षित होते. मात्र ढिसाळ नियोजन व भ्रष्टाचाराच्या गर्तेत हा प्रकल्प अडकल्यामुळे दुर्लक्षित झाला आहे.

सिंचन विभागाच्या दुर्लक्षित धोरणामुळे पाणी असूनही सिंचन होत नाही. कालवा चुकीच्या पद्धतीने तयार केल्याने पूर्णपणे सिंचन होत नाही.

-शुभम जाधव, शेतकरी, व्याहळी

Irrigation Project
कृषी संशोधन केंद्रे पांढरा हत्ती ठरू नयेत ः नाना पटोले

सिंचनाचे आकडे दिशाभूल करणारे

प्रत्यक्षात १०६७ हेक्टर जमीन सिंचित करण्याची या प्रकल्पाची एकूण क्षमता आहे. अरुणावती प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता वि. भ. बागूल यांनी एका पत्रात चार वर्षांचे सिंचनाचे आकडे दिले आहेत. २०१७- १८ मध्ये २०५ हेक्टर,१८- १९ मध्ये १३२० हेक्टर,१९-२०मध्ये १०१२ हेक्टर,२०-२१ मध्ये १२०९ हेक्टर सिंचन झाल्याचे त्यांनी पत्राद्वारे सांगितले आहे. प्रत्यक्षात कालव्याद्वारा पाणी केवळ अर्ध्यापर्यंत पोहोचते. एकूण प्रकल्पाची सिंचन क्षमता १०६७ असताना क्षमतेपेक्षा जास्त सिंचन तेही शेवटच्या टोकापर्यंत पाणी न पोहोचता होणे यापेक्षा मोठी दुसरी लबाडी असू शकत नाही.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com