Agri Student Protest Agrowon
ताज्या बातम्या

Agri Student Protest : मागण्या मान्य न झाल्यास पुन्हा आंदोलन; कृषी अभियांत्रिकी विद्यार्थ्यांचा इशारा

मात्र मागण्या मान्य झाल्या नाही तर पुन्हा आंदोलन करण्याचा इशारा अभियांत्रिकी विद्यार्थ्यांनी दिला आहे.

Team Agrowon

Nagar News ः महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (MPSC) कृषी सेवा मुख्य परीक्षेला स्थगिती देऊन अभ्यासक्रम पूर्वीप्रमाणे करावेत, स्वतंत्र कृषी अभियांत्रिकी (Agriculture Engineering) संचालनालय स्थापन करावे यासह अन्य मागण्यांसाठी महात्मा फुले कृषी विद्यापीठासह (MPKV, Rahuri) राज्यातील अन्य कृषी विद्यापीठात सुरू असलेले विद्यार्थ्यांचे आंदोलन शासनाच्या आश्वासनानंतर स्थगित करण्यात आले आहे. मात्र मागण्या मान्य झाल्या नाही तर पुन्हा आंदोलन करण्याचा इशारा अभियांत्रिकी विद्यार्थ्यांनी दिला आहे.

कृषी अभियांत्रिकी विद्यार्थ्यांचे महात्मा फुले कृषी विद्यापीठासह अन्य कृषी विद्यापीठात महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे कृषी सेवा मुख्य परीक्षेला स्थगिती देऊन अभ्यासक्रम पूर्वीप्रमाणे करावेत,

स्वतंत्र कृषी अभियांत्रिकी संचालनालय स्थापन करावे यासह अन्य मागण्यासाठी प्रशासकीय इमारतीसमोर ५० दिवसांपासून सुरू असलेल्या कृषी अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांचे आंदोलन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आश्वासनानंतर मागे घेण्यात आले आहे.

फडणवीस यांनी विद्यार्थ्यांच्या सर्व मागण्या समजून घेऊन सकारात्मक प्रतिसाद दिला व लवकरात लवकर उच्चस्तरीय समिती स्थापन करून कृषी अभियंत्यांना न्याय देऊ, असे आश्वासन दिले आहे. कृषी अभियांत्रिकी शाखेच्या विद्यार्थ्यांनी राज्यभर सुरू असलेले आंदोलन मागे घ्यावे, अशी विनंती केली.

विद्यार्थ्यांनी या आश्वासनाचा मान ठेवत आंदोलन मागे घेत असल्याचे सांगितले. गेल्या ५० दिवसांपासून सुरू असलेल्या या आंदोलनास सर्व विद्यापीठांचे कुलगुरू, अधिष्ठाता, सहयोगी अधिष्ठाता, कुलसचिव व प्रशासन यांनी विद्यार्थ्यांना मदत केली.

अधिवेशन संपल्यानंतर स्वतंत्र समिती करून मागण्यांवर तोडगा काढला जाणार आहे. मात्र मागण्या मान्य झाल्यास पुन्हा आंदोलन करण्याचा इशारा विद्यार्थ्यांनी दिलेला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agricultural University Vacancy: कृषी विद्यापीठांत ५७ टक्के जागा रिक्त

PM Suryaghar Yojana: ‘सूर्यघर’चा साडेपंधरा हजार ग्राहकांनी घेतला लाभ

Drip Irrigation Subsidy: ठिबक अनुदानाचे २० हजार अर्ज गायब

Rural Development: शेतकऱ्यांची स्थिती सुधारली तरच भारत प्रगत होईल

Onion Storage Facility: कांदा-लसूण साठवणूक गृहासाठी अर्ज प्रक्रिया सुरू

SCROLL FOR NEXT