Hunger Strike Agrowon
ताज्या बातम्या

Hunger Strike : कृषी सेवक पदावर नियुक्तीसाठी युवकाचे आमरण उपोषण

कृषी सेवक पदावर नियुक्ती देण्याच्या मागणीसाठी जळगाव जिल्ह्यातील ज्ञानेश्वर तिडके या युवकाने विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयासमोर सोमवारपासून (ता. २९) सुरू केलेले आमरण उपोषण गुरुवारीही सुरू होते.

टीम ॲग्रोवन

औरंगाबाद: कृषी सेवक पदावर नियुक्ती (Appointment On Krushi Sevak Post) देण्याच्या मागणीसाठी जळगाव जिल्ह्यातील ज्ञानेश्वर तिडके या युवकाने विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयासमोर सोमवारपासून (ता. २९) सुरू केलेले आमरण उपोषण (Hunger Strike) गुरुवारीही सुरू होते.

कृषी सेवक भरतीत अजूनही रिक्त असलेली माझी विशेष मागास प्रवर्गाची जागा मॅटमध्ये दिलेल्या आश्वासनानुसार न भरल्यास विभागीय कृषी सहसंचालक औरंगाबाद विभाग व प्रशासनिक अधिकारी यांच्या अन्यायकारक कारभारा विरोधात बेमुदत आमरण उपोषणास बसण्याचा इशारा दिला होता. त्याच्या निवेदनानुसार, औरंगाबाद विभागामार्फत २०१९ मध्ये कृषी सेवक या पदासाठी ११२ जागांसाठीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली. त्यावेळी त्या जाहिरातीत विशेष मागास प्रवर्गाची एक जागा देण्यात आली.

या जागेवर त्यांची निवड होण्याची शक्यता असताना विभागामार्फत ती जागा कमी करून त्याच्यावर अन्याय करण्यात आला. त्यामुळे यासंदर्भात अन्याय दूर न केल्यास उपोषणाचे पत्र पाठविण्यात आले. त्यावेळी विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयामार्फत ५ फेब्रुवारी २०२१ रोजी जाहिरातीची मुदत ३१ डिसेंबर २०२० रोजी संपल्याचे सांगण्यात आले.परंतु तरी विभागामार्फत कागदपत्र पडताळणीसाठी उमेदवारांना बोलविण्यात आले. तसेच जवळपास आठ ते दहा नियुक्त्या या ८ डिसेंबर २०२१ पर्यंत संपूर्ण वर्षभर देण्यात आल्या.

शेवटची नियुक्ती ही ८ डिसेंबर २०२१ रोजी देण्यात आली असताना त्याअगोदरच विभागात सेवा कोट्यातील जागा रिक्त असूनही त्या जागेवर नियुक्ती देण्याचा विचारही आपल्या विभागामार्फत करण्यात आला नसल्याचे निवेदनात म्हटले आहे. यासंदर्भात मॅट न्यायालयात धाव घेतली असता न्यायालयात आमच्या बाजूने निर्णय झाला असल्याचे नमूद करत याविषयी न्यायोचित भूमिका घेतली जात नसल्याचे स्पष्ट करता श्री तिडके यांनी उपोषण सुरू केले.बुधवारी (ता. ३१) दुपारपर्यंत हे उपोषण सुरूच असल्याचे उपोषणकर्त्याने कळविले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Debt Trap: कर्जबाजारीपणाचा सापळा

Ativrushti Madat: अतिवृष्टी भरपाईला नियम, निकषांची पाचर

Internation Trade: भारताची कसोटी पाहणारा काळ

Rabi Crop Insurance: रब्बीतही द्या विमा संरक्षण

E Crop Survey: ई-पीक पाहणीला महिनाभर मुदतवाढ

SCROLL FOR NEXT