Salty Water  Agrowon
ताज्या बातम्या

Soil Health : खाऱ्या पाण्यामुळे शेकडो एकर शेतजमीन नापिक बनण्याची शक्यता

Salty Water : नादुरूस्त बंधाऱ्यातून शिरलेल्या खाऱ्यापाण्याने आचरा येथील शेकडो एकर जमीन नापिक होण्याची शक्यता आहे, या प्रकारामुळे खरीप हंगामातील भातपिकासमोर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

Team Agrowon

Sindhudurg News : नादुरूस्त बंधाऱ्यातून शिरलेल्या खाऱ्यापाण्याने आचरा येथील शेकडो एकर जमीन नापिक होण्याची शक्यता आहे, या प्रकारामुळे खरीप हंगामातील भातपिकासमोर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

खाडीचे खारेपाणी रोखण्यासाठी खारभुमी विभागाने आचरा येथे बंधारा बांधला होता. परंतु गेल्या काही महिन्यांपूर्वी भगदाड पडले आहे. त्यामुळे समुद्राच्या भरतीचे पाणी या भगदाडातून गावातील गाऊडवाडी, काझीवाडा, भंडारवाडी, डोंगरेवाडी या गावातील शेकडो एकर शेती, बागायतीमध्ये शिरले आहे.

समुद्राला भरती असल्यामुळे अनेक दिवस खारेपाणी या शेतजमिनीत साचून राहिल्याने ही संपूर्ण जमीन नापिक बनण्याची शक्यता आहे. खारेपाणी साचल्याने जमिनीत असलेले २०० ते ३०० माडांचा प्रश्न निर्माण झाला आहे.

भातपीक लागवड करीत असलेल्या जमिनीतच पाणी साचल्याने येत्या खरीप हंगामात भातलागवड करता येणार नसल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. गावातील सार्वजनिक विहिरीमध्ये खारे पाणी गेल्यामुळे पिण्याच्या पाण्याचे देखील दूषित होण्याची शक्यता आहे.

हा बंधारा दुरुस्त करावा, अशी मागणी सातत्याने आचरा ग्रामस्थांनी खारभुमी विभागाकडे केलेली आहे. परंतु त्याकडे कानाडोळा केल्यामुळे हा प्रसंग उद्भवला असल्याचा आरोप ग्रामस्थांमधून केला जात आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver Third List: कर्जमाफीची तिसरी यादी जाहीर, ३ लाख ५१ हजार १९२ शेतकऱ्यांचा समावेश

Sugar MSP: साखर 'एमएसपी' प्रश्नी दिल्लीतील बैठक निष्फळ, उद्यापासून महाराष्ट्र-कर्नाटकातील महामार्ग रोखणार, राजू शेट्टींचा इशारा

Canal Repair : पहिल्या आवर्तनापूर्वी कालव्यांची दुरुस्ती करा

Solar Irrigation : सातारा जिल्ह्यातील उपसा सिंचन योजना सौर ऊर्जेुळे उजळणार

Water Tanker Surge : टॅंकरच्या संख्येत झपाट्याने वाढ

SCROLL FOR NEXT