Wet Drought
Wet Drought Agrowon
ताज्या बातम्या

Wet Drought : 'ओल्या दुष्काळा’ च्या ऑनलाइन आंदोलनाला उदंड प्रतिसाद

टीम ॲग्रोवन

पुणे : यंदा मॉन्सूनचा (Monsoon Season) लांबलेला मुक्काम आणि अतिवृष्टीनंतर (Wet Drought) राज्यात सर्वदूर खरिपातील (Kharip Season) उभ्या पिकाची मोठी (Crop Damage) हानी झाली. पिके पाण्यातच सडल्याने राज्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याकरिता सरकारचे लक्ष वेधण्यासाठी समाज माध्यमात गुरुवारी (ता. २७) #आम्ही_शेतकऱ्यांसोबत #ओलादुष्काळ हा मागणी नोंदविणारा ट्रेंड चालविण्यात आला. यात शेतकरी पुत्रांसह किसान सभा, शेतकरी संघटना आणि विविध सामाजिक संघटना, विरोधी पक्षांनी मोठा सहभाग नोंदविला. या ऑनलाइन आंदोलनाच्या ट्रेंडला सर्वाधिक प्रतिसाद तर मिळविलाच शिवाय ओल्या दुष्काळाची चर्चा दिवसभर राज्यात होती.

परतीच्या पावसाने काढणीला आलेल्या पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांना या संकटात दिलासा देण्यासाठी राज्य व केंद्र सरकारने पुरेशा उपाययोजना केलेल्या नाहीत. सरकारने या संकट काळात पुरेशा उपाययोजना कराव्यात यासाठी महाराष्ट्रातील शेतकरी पुत्रांनी गुरुवारी (ता. २७) ऑनलाइन ट्रेंड आयोजित केला होता. ओला दुष्काळ व त्या संबंधीच्या मागण्यांची पोस्टर्स व पोस्ट समाज माध्यमांवर मोठ्या प्रमाणात सादर करून समाजात या प्रश्नांबाबत जागृती निर्माण करणे व सरकारला या बाबतच्या मागण्या पोचविणे असा या ऑनलाइन ट्रेंडचा उद्देश होता. याला राज्याच्या कानाकोपऱ्यातून शेतकऱ्यांनी प्रतिसाद दिला, अशी माहिती किसान सभेचे डॉ. अशोक ढवळे, डॉ. उदय नारकर, जे. पी. गावित, किसन गुजर, डॉ. अजित नवले यांनी दिली.

ऑनलाइन आंदोलनाच्या प्रमुख मागण्या...

- राज्यात ओला दुष्काळ जाहीर करावा.

- खरिपाचे कर्ज माफ करावे.

- शेतकऱ्यांना प्रति एकर ५० हजार रुपये मदत करावी. - शेतकऱ्यांना विमा भरपाई द्यावी

अतिवृष्टीमुळे अख्खा खरीप पाण्याखाली असताना देखील सरकार ओला दुष्काळ जाहीर करत नाही. शेतकऱ्यांप्रती असंवेदनशील आणि झोपलेल्या सरकारला जागे करण्यासाठी #आम्ही_शेतकऱ्यांसोबत #ओलादुष्काळ हा ऑनलाइन ट्रेंड आंदोलनाला चांगला प्रतिसाद शेतकऱ्यांनी आणि लोकप्रतिनिधींनी दिल्यानंतरही झापेचे सोंग घेतलेले सरकार जागे होणार आहे का? जागे होणार नसेल तर शेतकरी आता रस्त्यावर उतरल्या शिवाय राहणार नाही.

- अजित नवले, किसान सभा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Development : शेती विकासाला केंद्र सरकारने कायम प्राधान्य दिले

Crop Insurance : गतवर्षीच्या खरिपातील ३० कोटी पीकविमा मंजूर

Jaljeevan Mission : रायगडमध्ये जलजीवनची निम्‍मी कामे अपूर्ण

Mango Market : उरणमध्ये आंब्यांची आवक वाढली

Water Scarcity : पाणीपुरवठा संस्थांचे शेतकरी पाणी टंचाईच्या कात्रीत

SCROLL FOR NEXT