Department of Agriculture Agrowon
ताज्या बातम्या

Agriculture Department : कृषी विभागातील रिक्त पदांमुळे कशी मिळणार गतिमान सेवा?

Agriculture Department Vacancies : अगोदर अब्दुल सत्तार आणि आता धनंजय मुंडे यांच्या रूपाने कृषिमंत्री मराठवाड्याला मिळाले. परंतु मराठवाड्यातील कृषी विभागाला लागलेले रिक्त पदांचे ग्रहण संपण्याचे नाव घेताना दिसत नाही.

संतोष मुंढे ः ॲग्रोवन वृत्तसेवा

Chhatrapati Sambhajinagar News : अगोदर अब्दुल सत्तार आणि आता धनंजय मुंडे यांच्या रूपाने कृषिमंत्री मराठवाड्याला मिळाले. परंतु मराठवाड्यातील कृषी विभागाला लागलेले रिक्त पदांचे ग्रहण संपण्याचे नाव घेताना दिसत नाही. त्यामुळे कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना गतिमान सेवा रिक्त पदांमुळे कशी मिळणार? असा प्रश्‍न विचारला जात आहे. कारण आठ जिल्ह्यांत तब्बल १९८४ विविध प्रवर्गातील पदे रिक्त आहेत.

मराठवाड्याची राजधानी असलेल्या छत्रपती संभाजीनगर मधील तीन जिल्ह्यांचे विभागीय कृषी सहसंचालक पद याच कार्यालयातील अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांना सांभाळण्याची वेळ आली आहे. मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड या तीन जिल्ह्यांत मिळून विभागीय कृषी सहसंचालक कार्यालय छत्रपती संभाजीनगरमध्ये आहे.

या कार्यालयांतर्गत तीनही जिल्ह्यात गट अ ते गट ड दरम्यान २४७७ पदांना सुधारित मे २००९ मधील आकृतिबंधानुसार मंजुरी आहे. त्यापैकी १५४८ पदच भरलेली असून तब्बल ९२९ पद रिक्त आहेत. रिक्त असलेल्या पदांमध्ये गट अ ची ११, गट ब ची ९३, गट क ची ५८१ तर गट ड ची २४४ पदे रिक्त आहेत.

जिल्हा निहाय विचार करता छत्रपती संभाजीनगर येथील विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयातील मंजूर ८९ पदांपैकी केवळ ४८ पद भरलेली असून ४१ पद रिक्त आहेत. विभागीय कृषी सहसंचालक या महत्त्वाच्या पदाचा प्रभाव याच कार्यालयातील अधीक्षक कृषी अधिकारी यांना सांभाळण्याची वेळ आली आहे.

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय अंतर्गत जिल्ह्यातील ८१९ मंजूर पदांपैकी केवळ ५२८ भरलेली असून २९१ रिक्त आहेत. जालना जिल्ह्यातील मंजूर ६९० पदांपैकी ४३६ भरलेली असून २५४ रिक्त आहेत.

कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्या बीड जिल्ह्यात मंजूर ८७९ पदांपैकी केवळ ५३६ पदे भरलेली असून तब्बल ३४३ पदे रिक्त आहेत. लातूर कृषी विभागांतर्गत लातूर, धाराशिव, परभणी, हिंगोली, नांदेड ही पाच जिल्हे येतात.

विभागीय कृषी सहसंचालक कार्यालय व पाच जिल्हे मिळून ३३७७ पदांना मंजुरी आहे. त्यापैकी २३२३ पदे भरण्यात आली असून तब्बल १०५४ पद रिक्त आहेत. या रिक्त असलेल्या पदांमध्ये गट अ मधील ८, गट ब मधील १०८, गट क मधील ६४३ व गट ड मधील २९५ रिक्त पदांचा समावेश आहे.

लातूर विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयात ७९ पदं मंजूर असून त्यापैकी ६० भरलेली तर १९ रिक्त आहेत. जिल्हानिहाय विचार करता लातूर जिल्ह्यात मंजूर ६५८ पदांपैकी ४८४ भरलेली असून १७४ रिक्त आहेत. धाराशिव जिल्ह्यात ६३९ मंजूर पदांपैकी ४३८ भरलेली असून २०१ रिक्त आहेत. नांदेड जिल्ह्यात ९४९ मंजूर पदांपैकी ६४५ भरलेली असून ३०४ पदे रिक्त आहेत.

परभणी जिल्ह्यात ६४४ मंजूर पदांपैकी ४४६ भरलेली असून १९८ रिक्त आहेत. तर हिंगोली जिल्ह्यातील ४०८ मंजूर पदांपैकी २५० भरलेली असून १५८ पदे रिक्त आहेत. महत्त्वाची पदेच जर रिक्त असतील आणि आत्मा सारखी दिमतीला असलेली यंत्रणा वाऱ्यावर असेल तर कृषीची यंत्रणा गतिमान व परिणामकारक काम कसे करू शकेल हा प्रश्न आहे.

महत्त्वाचे ...

कृषी सहायकांची तब्बल ४९८ पदे रिक्त

बीड जिल्ह्यात सर्वाधिक ११० कृषी सहायक नाहीत

लातूर विभागात ११ पैकी पाचच कृषी उपसंचालक कार्यरत

मंडळ कृषी सेवा वर्ग २ ची १०६ पदे रिक्त

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast: तुरीचा बाजार मंदीतच; हळदीला मर्यादीत उठाव, कांदा स्थिर, गवार तेजीत, तर कोबीची आवक कायम!

Soil Health : जमिनीचे आरोग्य सांभाळणे गरजेचे

Nagnathanna Nayakvadi : नागनाथअण्णांसारख्या क्रांतिकारकांमुळे देशाला स्वातंत्र्य

Wild Boar : रानडुकराला उपद्रवी वन्य प्राणी घोषित करा

Lumpy Skin Disease: पुण्यात 'लम्पी'चा विळखा; सुप्रिया सुळेंची महापालिका आयुक्तांना उपाययोजनांची पत्राद्वारे विनंती

SCROLL FOR NEXT