Koyna Dam Rain
Koyna Dam Rain agrowon
ताज्या बातम्या

Koyna Dam Rain : कोयना धरण परिसरात पावसाचा जोर वाढला, जलाशय पूर्ण क्षमतेने भरणे कठीण

sandeep Shirguppe

Koyna Dam News : महाराष्ट्रातील सर्वात मोठे असलेल्या कोयना धरण परिसरात जोरदार पावसाने हजेरी लावल्याने धरण क्षेत्रात पाण्याचा विसर्ग वाढला आहे. मध्यम ते जोरदार पाऊस होत असल्याने धरणात प्रतिसेकंद ४ हजार १६८ क्युसेक पाण्याची आवक होत असल्याची माहिती समोर आली आहे.

धरणात अद्याप ८५.५२ टीएमसी इतका पाणीसाठा झाला असून धरण पूर्ण क्षमतेने भरण्यासाठी १९.७३ टक्क्यांची गरज आहे. दरम्यान धरण पाणलोट क्षेत्रात मुसळधार पावसाची प्रतिक्षा लागून राहिली आहे. दरम्यान पुढचे दोन दिवस पाऊस असल्याची माहिती हवामान विभागाकडून देण्यात आली आहे. यामुळे धरण पाणलोट क्षेत्रात आणखी पाण्याची आवक वाढण्याची शक्यता आहे.

पाटण तालुक्यातील महाबळेश्वर, नवजा, कोयना या पाणलोट क्षेत्रात पाऊस होत असल्याने धरणाच्या पाणीसाठ्यात संथगतीने वाढ होत आहे. सध्या धरणात एकूण उपलब्ध पाणीसाठ्यापैकी उपयुक्त पाणीसाठा ८०.५२ टीएमसी इतका आहे.

तर जलपातळी ६५४.५०७ मीटर झाली आहे. १०५.२५ टीएमसी पाणी साठवण क्षमता असलेल्या या धरणाला पूर्ण क्षमतेने भरण्यासाठी १९.७३ टीएमसी पाण्याची गरज आहे.

यंदा राज्यात पाऊस कमी झाल्याने खरीप पिकांना पाण्याची गरज असल्याने कोयना पाणलोट क्षेत्रातून पाण्याची विसर्ग करण्यात येत होता. यामुळे कोयना धरणाच्या पायथा वीजगृहातील २० मेगावॅट क्षमतेच्या जनित्राद्वारे वीज निर्मिती करून सिंचनासाठी कोयना नदीत प्रतिसेकंद १ हजार ५० क्युसेक पाण्याचा विसर्ग मागील काही दिवसांपासून सुरू आहे. हा विसर्ग अद्यापही कायम ठेवण्यात आला.

एक जूनपासून सुरू झालेल्या तांत्रिक जलवर्षात आत्तापर्यंत कोयना ३ हजार ६१८ मिलिमीटर, नवजा ५ हजार १५६ मिलिमीटर तर महाबळेश्वरमध्ये ४ हजार ८५४ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. तर पुढचे दोन दिवस पावसाची अशीच परिस्थिती असणार आहे. यामुळे शेतकऱ्यामध्ये समाधान व्यक्त करण्यात येत आहे. मागच्या काही दिवसांपासून सातारा जिल्ह्यातील अनेक भागात पावसाची गरज होती.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmers Scheme : शेतकऱ्यांसाठी ५० हजार गावांमध्ये विशेष योजना; शेतकऱ्यांना हवामान बदलात उत्पादन वाढीसाठी करणार मदत

Soybean Sowing : सोयाबीनचा ४ लाख ४७ हजारांवर हेक्टरवर पेरा

Ashadhi Wari 2024 : 'रामकृष्ण हरीचा जयघोषात' संत तुकाराम महाराजांचा पहिला रिंगण सोहळा संपन्न

Employment Opportunities : रानभाज्यांतून रोजगार संधी

APMC Market : सभापतींची बैठकही निष्फळ; बाजारात शुकशुकाट

SCROLL FOR NEXT