Crop Damage Agrowon
ताज्या बातम्या

Heavy Rain : चार जिल्ह्यातील दहा मंडळात अतिवृष्टी

मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद व लातूर या पाचही जिल्ह्यातील काही मंडळाचा अपवाद वगळता सोमवारी (ता.१७) सकाळपर्यंतच्या २४ तासात सर्वदूर पावसाची कमी अधिक प्रमाणात हजेरी लागली.

टीम ॲग्रोवन

औरंगाबाद : मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद व लातूर या पाचही जिल्ह्यातील काही मंडळाचा अपवाद वगळता सोमवारी (ता.१७) सकाळपर्यंतच्या २४ तासात सर्वदूर पावसाची (Rainfall) कमी अधिक प्रमाणात हजेरी लागली. औरंगाबाद, जालना, बीड व उस्मानाबाद या चार जिल्ह्यातील दहा मंडळात अतिवृष्टी (Heavy Rain Marathwada) झाली. जालन्यात पावसाचा जोर (Rain Intensity) सर्वाधिक होता. या पावसामुळे काढणीला आलेल्या सोयाबीन (Soybean Crop Damage) सह वेचणीला आलेल्या कापसाची (Cotton Crop Damage) दैना थांबण्याचे नाव घेत नसल्याची स्थिती आहे.

औरंगाबाद जिल्ह्यातील सर्व ६५ मंडळात तुरळक, हलका, मध्यम ते दमदार पाऊस झाला. जिल्ह्यातील २४ मंडळात २० ते ५१ मिलिमीटर दरम्यान पावसाची नोंद झाली. फुलंब्री तालुक्यातील पीरबावडा मंडळात अतिवृष्टी झाली. जालना जिल्ह्यातील सर्व ४९ मंडळात हलका, मध्यम ते दमदार पाऊस झाला. जिल्ह्यातील भोकरदन व जाफराबाद तालुक्यात पावसाचा जोर सर्वाधिक होता.

या दोन तालुक्यातील पाच व जालना तालुक्यातील एका मंडळात मिळून जिल्ह्यातील सहा मंडळात अतिवृष्टी झाली. जाफराबाद,जालना, अंबड, भोकरदन, जाफराबाद, जालना, अंबड, बदनापूर व मंठा या तालुक्यात सरासरी ३० ते ५२ मिलिमीटर दरम्यान पावसाची नोंद झाली. बीड जिल्ह्यातील सर्व ६३ मंडळात तुरळक, हलका ते मध्यम पाऊस झाला. जिल्ह्यातील गंगामसला व नांदूरघाट मंडळात अतिवृष्टी झाली. लातूर जिल्ह्यातील ६० पैकी ५१ मंडळात तुरळक, हलका, पाऊस झाला.

जिल्ह्यातील सहा मंडळात १५ ते ४१ मिलिमीटर दरम्यान पावसाची नोंद झाली. उस्मानाबाद जिल्ह्यातील ४२ पैकी २७ मंडळात १५ ते ३९ मिलिमीटर दरम्यान पावसाची नोंद झाली. उस्मानाबाद तालुक्यातील केशेगाव मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली.

जिल्हानिहाय अतिवृष्टीची मंडळे

(पाऊस मिलिमिटरमध्ये)

औरंगाबाद जिल्हा

पिरबावडा ७०.७५

जालना जिल्हा

राजूर ६५.७५

केदारखेडा ६६

जाफराबाद ६५.२५

कुंभारझरी ६५.७५

टेंभुर्णी ६६

रामनगर ६५.२५

बीड जिल्हा

गंगामसला ७९.७५

नांदूरघाट ६६.५०

उस्मानाबाद जिल्हा

केशेगाव ६६.२५

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

ZP Election: जिल्हा परिषद निवडणुका फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात?

India EU FTA: भारत-युरोपियन महासंघात मुक्त व्यापार करारावर चर्चा

Aaple Sarkar Portal: सात दाखले आता ‘आपले सरकार’वर मिळणार

Guava Farming: ‘सरदार पेरू’- शेतकऱ्यांचा विश्वासाचा साथी

Vegetable Cultivation: सांगलीत वाढत्या थंडीमुळे भाजीपाला लागवड थांबली

SCROLL FOR NEXT