Heavy Rainfall Agrowon
ताज्या बातम्या

Heavy Rainfall : परभणी, हिंगोली जिल्ह्यांतील सात मंडलांत अतिवृष्टी

परभणी, हिंगोली जिल्ह्यातील ५१ मंडलात शुक्रवारी (ता. २१) सकाळी आठ पर्यंतच्या २४ तासांत हलका ते जोरदार पाऊस झाला.

टीम ॲग्रोवन

परभणी ः परभणी, हिंगोली जिल्ह्यातील ५१ मंडलात शुक्रवारी (ता. २१) सकाळी आठ पर्यंतच्या २४ तासांत हलका ते जोरदार पाऊस (Heavy Rainfall) झाला. परभणी जिल्ह्यातील आडगाव बाजार (ता. जिंतूर), वडगाव (ता. सोनपेठ) या दोन मंडलात तर हिंगोली जिल्ह्यातील डिग्रस कऱ्हाळे (ता. हिंगोली), औंढा नागनाथ, येळेगाव, साळणा, जवळा बाजार (Crop Damage) या पाच मंडलात अतिवृष्टी झाली.

नदी नाल्यांना पुरामुळे शेतात कापणी करून ठेवलेल्या सोयाबीनच्या गंजी वाहून गेल्या. कपाशी, तूर आदींसह झेंडू, भाजीपाला पिकांचे ऐन दिवाळीत तोंडाचा घास निसर्गाने हिरावून घेतल्याने शेतकरीहतबल झाले आहेत.

परभणी जिल्ह्यातील ३२ मंडलात हलका ते जोरदार पाऊस झाला. शुक्रवारी (ता. २१) पहाटे अनेक मंडलात जोरदार पाऊस झाला. जिंतूर, सेलू, सोनपेठ, तालुक्यातील मंडलात पावसाचा जोर होता. जिल्ह्यात गेल्या २४ तासांत सरासरी ९.२ मिमी, ऑक्टोंबर महिन्यात एकूण सरासरी १०७.३ मिमी, १ जून पासून आजवर ७५७.७ मिमी पाऊस झाला.

हिंगोली जिल्ह्यातील १९ मंडलात मध्यम ते जोरदार पाऊस झाला. औंढा तालुक्यातील सर्व मंडलात तसेच डिग्रस कऱ्हाळे मंडलात अतिवृष्टी झाली. रस्त्यावरील पूल पाण्याखाली गेले. वसमत औंढा नागनाथ रस्त्यावरील चोंढी जवळील जून पूल तुटला. आसना, उघडी आदी नद्या तसेच नाल्यांच्या पाण्यात सोयाबीनच्या गंजी वाहून गेल्या. जिल्ह्यात गेल्या २४ तासांत सरासरी १७.२ मिमी, ऑक्टोंबर महिन्यात एकूण सरासरी १५९.३ मिमी तर १ जून पासून आजवर एकूण सरासरी १०४४.९ मिमी पाऊस झाला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Harvesting : मराठवाड्यातील तीन जिल्ह्यांत ज्वारी, मका, काढणी सुरू

Crop Damage Compensation : बीडमध्ये मागणीपेक्षा ६८ कोटी कमी

Save Soil: माती आणि मानवी सभ्यता

Diwali Traditions: दिवाळीतल्या गवळणी

Book Review: ‘पर्यावरण’ ऐरणीवर आणणारे लेखन

SCROLL FOR NEXT