Water Agrowon
ताज्या बातम्या

Maharashtra Rain Update : कोकण, मराठवाडा, विदर्भात पावसाचे तांडव

Team Agrowon

Pune News : कोकण पाठोपाठ मराठवाडा आणि विदर्भात पावसाचा तांडव सुरू आहे. राज्यातील जवळपास १०० मंडलांमध्ये शंभर मिलिमीटरपेक्षा जास्त पाऊस झाला आहे. तर काही मंडलांमध्ये २०० मिलिमीटर ही पाऊस झाला आहे. पावसाच्या प्रलयामुळे नदी, नाले ओसंडून वाहत असून अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे.

आतापर्यंत झालेल्या पावसामुळे राज्यातील जवळपास सर्वच नद्या आणि धरणांतील पाणीपातळीत वाढ झाली आहे. काही धरणांतून पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला आहे. दरम्यान, गोंदिया जिल्ह्यात वीज पडून दोन जणांचा मृत्यू झाला आहे.

कोकणात ठाणे, रायगड, सिंधुदुर्ग, मराठवाड्यातील नांदेड जिल्ह्यातील माहूर, किनवट आणि विदर्भातील बुलडाणा जिल्ह्यातील संग्रामपूर, अकोल्यातील अकोट, तेल्हारा, वाशीममधील मानोरा, कारंजा, यवतमाळमधील बाभळगाव, यवतमाळ, चंद्रपूरमधील काही ठिकाणी अतिवृष्टीसदृश पाऊस झाल्याने नद्यांनी धोक्याची पाणापातळी ओलांडली.

मराठवाड्यात काही मंडलांत अतिवृष्टी :

मराठवाड्यातील नांदेड जिल्ह्यातील दोन ते तीन तालुक्यांत अतिवृष्टी झाली आहे. शनिवारी (ता. २२) सकाळी आठ वाजेपर्यंत धाराशिव जिल्ह्यातील लोहारा येथे उच्चांकी ३१८.५ मिलिमीटर पाऊस पडला. त्यामुळे धाराशिवमधील रामलिंग धबधबा पूर्ण क्षमतेने ओसंडून वाहू लागला आहे. नांदेडमधील माहूर येथे ३०५ मिलिमीटर पाऊस पडला. किनवट तालुक्यात संततधार पावसामुळे पैनगंगा नदी भरून वाहत आहे.

नदी काठच्या तालुक्यातील सर्वच गावांमध्ये पाणीपातळी वाढली आहे. माहूरकडे येणारा एकमेव धनोडा पूल पाण्याखाली गेला आहे. त्यामुळे पैनगंगा परिसरातील अनेक गावांना पुराचा वेढा पडल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. परभणी, धाराशिव, लातूर, बीड, जालना, छत्रपती संभाजीनगर भागात पावसाचे प्रमाण कमी आहे.

विदर्भात मुसळधार पाऊस

विदर्भातील यवतमाळ, अकोला, वाशीम जिल्ह्यांत मुसळधार पाऊस पडला. सातपुड्यातून वाहणाऱ्या सर्वच नद्यांना पूर आला आहे. त्यामुळे आतापर्यंत विविध कारणांमुळे सात व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. यवतमाळ शहरातील काही भागांसह लासीना, कापरा, गावात पाणी शिरल्याने नागरिकांचे मोठे नुकसान झाले आहे.

मुसळधार पावसामुळे गोसे खुर्द धरणांचे १५ दरवाजे, अप्पर वर्धा धरणाचे ११ दरवाजे उघडण्यात आल्याने नद्यांना पूर आला आहे. पैनगंगा नदीला पूर आल्याने चाळीस नागरिक अडकल्याने बचाव कार्यास अडथळे येत आहेत. धारवा, यवतमाळ, कळंब या भागांचा संपर्क तुटला आहे. तर वाघाडी परिसरात घर पडल्याने महिलेचा मृत्यू झाला आहे.

बुलडाण्यातील संग्रामपूर तालुक्यातील पाऊस झाल्याने केदार नदीला महापूर आल्याने बावनबीर आणि तुणकीरमधील दोन गावांचा संपर्क तुटला. बावनबीर शाळेत पाणी घुसले असून, तलावाचे स्वरूप आले होते. तसेच शनिवारी शाळेला सुटी देण्यात आली आहे.

या भागात वीस वर्षांनंतर पाऊस पडला आहे. तेल्हारा (जि. अकोला) तालुक्यातून वाहणाऱ्या विद्रूपा नदीला पूर आल्याने पाथर्डी येथे घरात पाणी शिरले. रखवालीसाठी शेतात गेलेले दोन तरुण मध्यरात्रीपासून बेपत्ता, पथकांकडून शोध सुरू आहे.

कोकणात जोर कायम :

कोकणातही सर्वच भागांत जोरदार पाऊस पडत असून, धबधबे ओसंडून वाहत आहेत. वाशिष्टीसह, काही नद्यांनी धोक्याची पाणी पातळी ओलांडली आहे. तर काही नद्यांची पाणीपातळी धोक्याच्या पातळीपेक्षा कमी आहे. तर भिवंडीत रस्त्यावर पाणी साचल्याने अनेक दुकानांमध्ये पाणी शिरले होते.

त्यामुळे येथील जनजीवन विस्कळीत झाले होते. मुसळधार पावसामुळे तानसा धरण भरत आल्याने कधीही पाण्याचा विसर्ग सोडण्याची स्थिती तयार झाली आहे. त्यामुळे या भागातील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे शेतात पाणी घुसल्याने पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.

मध्य महाराष्ट्रात हलक्या सरी :

मध्य महाराष्ट्रात पुणे, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यांच्या पश्‍चिम भागात जोरदार पाऊस पडत आहे. कोल्हापुरातील पंचगंगा धरणक्षेत्रात संततधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे नदीला पूर आला आहे. जवळपास ६८ बंधारे पाण्याखाली गेले आहेत. प्रशासन हाय अलर्टवर आहेत. सोलापूर, नगर, सातारा, सांगली, पुणे जिल्ह्यांत पावसाच्या तुरळक सरी बरसत आहेत.

त्यामुळे या भागातील धरणांतील पाणीसाठ्यात बऱ्यापैकी वाढ होत आहे. अनेक धरणांतील पाणीसाठा हा ५० टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे. खानेदशातील धुळे, जळगाव, नंदुरबार, नाशिक जिल्ह्यांत पावसाच्या तुरळक सरी बरसत आहे. काही ठिकाणी पावसाची उघडीप आहे.

२०० मिलिमीटरहून अधिक पडलेला पाऊस

लोहारा ३१८.५, माहूर ३०५, यवतमाळ ३०३, सिंदगी २४२, हिवरी २०३.३, अर्जुना २४०.३, अकोला २४४, सावरगड ३०३, मोहा २९३.८, कोळंबी २१३.३, निगनूर २८१, गुंज, कळी २२६, हिवरा २७९.५, फुलसावंगी २८१, कासोळा २२६,

शंभर मिलिमीटरहून अधिक पडलेल्या पावसाची मंडले :

ठाणे, बलकुम, मुंब्रा १०८.५, दहिसर, बेलापूर, कल्याण, अप्पर १५५, टिटवाळा १०४.३, ठाकुरली १३४.३, भिवंडी १००.८, अप्पर भिवंडी १३४.८, खारबाव १०८.५, कुमभर्ली १९९.३, बदलापूर ७९.८, अलिबाग १३२.३, पोयनाड १३९, किहीम, सरल, चरी १३२.३, चौल, रामरज १३९, तलोजे १५५, नेरळ १०२.३,

पेण १०८.८, कसू १३९, महाड १२६.३, बवरली १३९, कडवी १०८.८, आंगवली १३२, कोंडगाव १४६.३, देवळे ११६.३, देवरूख १२५.८, सौंदळ ११४.८, सावंतवाडी १२२.३, बांदा १०१, आजगाव १०४.५, अंबोली १३६.५, मदुरा ११२, कुडाळ ११४.५, कडवल ११२.५, तालवट १३६.५,

भेडशी ११२.५, साइवन १५८.५, तलसरी १०५.८, झरी १५१.३, विक्रमगड १३५, तलवड १५८.५, हेळवाक, मोरगिरी १०८.३, कडेगाव ११०, चंदगड १०५.३, किनवट १२५.३, बोधडी १९४.८, इस्लापूर, जलधारा, शिवणी १५७.८, वानोळा १७५.३, वाई १४८.८, सिंदखेड ११४.३, दहेली १२३, तेल्हारा १३०.३,

माळेगाव १४४.३, हिवरखेड १४९.३, अडगाव १७६.५, पंचगव्हाण १३०.३, कोप्रा १२०.३, येळबारा १४६.३, बाभूळगाव ११०.५, पिंपळगाव, सावरगाव १५९, कळंब १४६.३, जाडमोहा १२७, मेटिखेडा १५०.५, दारव्हा ११८.३, बोरी १२६.८, लडखेड १८६.८, महागाव १८६.८, तिवरी १३७, अर्णी, जवळा १८६.८,

लोनबेहल १५५, सावळी ११४.३, बोरगाव १८६.८, अंजनखेड १५५, नेर १८५, वरूड १००.३, मालखेड १८४.३, पुसद १०४.८, बोरी १०४, दराटी १७५.३, रुंजा १०८.८, घाटंजी १४६.३, शिरोली १६५.८, साखरा १४६.३, महागाव, मोरथ १८९.५, पाटणबोरी १२८.३, वरध १०८.८, घोटी १९१, पारवा १६५.८,

राळेगाव १४२.८, झाडगाव ११२.३, गिरोली ११९, कानदगाव ११६.५, पाथरी, विहाड ११९, येनापूर १९१.३, भेंडाळा १९१.५, आहेरी १४८.८, अल्लापाल्ली १२१.३, बिशनूर ११५, चामोर्शी १९१.३, येवळी १०३.५, महाबळेश्‍वर १३०.३.

राज्यात मंडलनिहाय पडलेला पाऊस, मिलिमीटरमध्ये (स्रोत - कृषी विभाग)

कोकण विभाग : देहरी ९३.५, अंगाव ८३.३, डिघशी ६४, पडघा ६२.५, शहापूर ६७.८, खर्डी ८५, किनहवळी, वसींड ६७.८, डोलखांब, उल्हासनगर, अंबरनाथ, गोरेगाव ७९.८, बदलापूर ७९.८, मोराबी ६९.८, कडाव ७३.३, कळंब ७६.३, वौशी ८९.८, उरण ८७, पाली, जांभूळपाडा ७०, आटोने ६९.३,

कामरली ८९.८ बिरवडी ८१.८, करंजवडी ८४.३, नाटे ८३, खारवली ८१.८, तुडली ९६.३, माणगाव ७५.३, गोरेगाव, लोनेरे ८८, निझामपूर ६९.८, पोलादपूर ६८, कोंडवी ८४.३, वाकण ६८, बवरली १३९, वहाळ ७८.३, असुर्डे ८२.३, कळकवणे, शिरगाव ७१.३, भरणे ७३.३, मंडणगड ८१.५, टरवल ७९.३, मुरडव ९२.८, फुणगुस ७९.३, फणसवणे ९१.५,

तुळसानी ९९.३, माभळ ७९.३, तेर्ये ९१.५, राजापूर ७८.८, जैतापूर ८८.५, कुंभवडे ८२.५, नाटे ८८.५, ओणी ७२.५, पाचल ९७.८, लांजा ८१.५, भांबेड ८६, पुनस ८१.५, साटवली ८८.५, विलवडे ८६, पाटगाव ७७.५, मालवण ७३, पेंडूर ८३, पोइप ९७, शिरोडा ७८.८ वेटोरे ७७.३, कणकवली ९७.५, नांदगाव ७१.५, वागडे ९७.५, कसाल ८४.८, वैभववाडी ८०.३,

येडगाव ७२, भुईबावडा ८०.३, वसई, मांडवी ७०.५, अंगशी ५६.३, निर्मल ७०.५, विरार ५०.८, मानिकपूर ७०.५, वाडा ७०.३, कडुस ५१, कोणे ७०.३, कांचगड ७०.८, डहाणू, मालयण ४७.५, कसा ५७.८, चिंचणी, पालघर, बायसर, सपला, आगरवाडी, तारापूर, ६९.५, मनवर ९०, जव्हार ८२.५, साखर ८८.८.

मध्य महाराष्ट्र : मालेगाव ६४, मानखेड ४०.५, पेठ ६५.३, कार्ला ६०.५, लोणावळा ७८.५, वेल्हा ७२.८, निंबर्गी ४४.५, चरण ४१, पन्हाळा ४४.३, काळे ६३.८, पडळ ३९.५, बाजार भोगाव ८६.८, कोतोली ५७, भेडसगाव ३९.८, बांबवडे ५९, करंजफेन ८४.५, सरूड ५०.८, मलकापूर ३६.८, आंबा. १४६.३, राधानगरी, कसबा ३७.८, आवळी ४५, राशिवडे ३६, कसबा ४५.५, गगनबावडा ८०.३,

साळवण ७१.३, सांगरूळ ५९.३, बालिंगा ४९.३, नेसरी ४०, पिंपळगाव ४७.५, कराडवाडी ४८.५, आजरा ५१, गवसे ८१, मडिलगे ४०, उत्तूर ४४.५, नारंगवाडी ६३, माणगाव ५५, कोवाड ३५.३, तुर्केवाडी ५२.५, हेरे ९१.५.

मराठवाडा : शेळगाव, बीड ६३.५, नांदेड शहर ५०.८, तुप्पा ४९, रामतीर्थ ६१.५, तळणी ५५.८, मंठा ४५, पिंपरखेड ५५.३, आष्टी ४०.३, मोघाळी ४२.८, किणी ४०.३ मांडवी ९६.५, उमरी बाजार ९६.५, उमरी ५१.३, गोळेगाव ४३.८, दाभड ४५.३, आखाडा बाळापूर ४०, डोंगरकडा ३५.८, वारंगा फाटा ३५.५.

विदर्भ : जळगाव ४६, जामोद ५६.८, वडशिंगी ४०, संग्रामपूर ८८, सोनाळा, बावनबीर ६५, पातुर्डा ४८.५, कवठळ ४०, शेगाव, जवळा ४४, अकोट, मुंडगाव ४०.५, उमरा ७०.५, अगर ४७.३, राजंदा ४१.८, मानोरा ५८.५, इंझोरी ७७, कुपटा ६४, शेंदूर्जन ५४.८, उमरी ९५.८, धनज ४०.५, हिवरा ७५.८, उंबरडा ४२.५, कामरगाव, खेर्डा ७५.८, पूर्णानगर, आष्टी ५३.५, निंभा ४८.८, चांदूर रेल्वे ४०.३,

पळसखेड ३५.८, गुहीखेड ३६.३, अमळा ४८.५, साटेफळा ३५.५, वरखेड ४२.५, कुऱ्हा ७३.३, हिवरखेड ४०.३, रिद्धापूर ४६.३, लोणी ५१, बेलोरा ५३.५, चिंचोली ६३.५, बटकुली ४१, अजानसिंगी ४३.८, मंगरूळ ४२.५, वणी ७५, घारफळ ८५.५, सावर ७८, कोठा ७५, चिखली ६७.३, मांगकिन्ही ७७.५, लोही ६६.५, दिग्रज ९७.५, कळगाव ९३.३, तूप ९४.५, शिरजगाव ६८.५, गौळ ५४.५, शेंबळ ४४.८, खंडाळा ५०.८, ब्राह्मणगाव, जांब ५०.८, उमरखेड ७९.३,

मुळवा ६८.८, वाडूल ७७, चाटरी ७८.३, धानकी ६९.५, बिटरगाव ६९.५, कुपटी ६५.३, पुनवट ४८.८, शिरपूर ४८.८, गणेशपूर ६३.५, मारेगाव ६१.३, मार्डी ६८, कुंभा ६१.३, बोटोनी ५६.३, झरी ८८.५, खडकडोह ५८, मुकुटबन ४०.५, मथार्जून ८८.५, शिबला ७०.८, पांढरकवडा ७३.५, पाहापळ ९९.८, चालबराडी ८९.३, करंजी ७७.५, केळापूर ९५.८, शिवणी ८८.५, कुर्ली ९६.५,

धानोरा, वाढोणा ९०.३, वडकी ८०.८, किन्ही ७२.८, कन्नमवरग्राम ७३.५, वर्धा ६७, अंजी ५७.५, वायगाव ६६.५, सिल्लोड ६२.३, सेवाग्राम ६०.८, तळेगाव ६४, झाडसी ६४.३, देवळी ९८.३, पुलगाव ९५.८, विजय गोपाल ७३.३, भिडी ८१.५, अंदोरी ८०.३, वडनेर ६६.८, पोन्हा ८०.८, सिरसगाव ७६,

आमडी ६५, काटोल ६८, परडसिंगा ६२.५, नरखेड, मोवाड ६७.८, जलालखेडा ७०.३, मेंधळा ७४.३, केंद्री ९०.५, बारव्हा ६३.३, मूल, बेंबळ, चिखली ८९.३, धोडपेठ ६४.५, सावळी ८९.३, पोंभुर्णा ८९, गडचिरोली ८८, काढोली ६०.८, अरमोरी ९३, पिसेवढथा ९७.५, कुंघाडा ९२, घोट ७६.३, आष्टी ९४.३, मुलचेरा ७२.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Diwali Ank 2024 : गोठ्यात राबणाऱ्या हातांनी केले ‘ॲग्रोवन’ दिवाळी अंकाचे थाटात प्रकाशन

Heavy Rain : आभाळ फाटले, हातातोंडाशी आलेला घास हिरावला

Sugar Factory Repayment : आमची राखीव थकहमी द्या

Fruit Crop Insurance : फळपीक विमा योजनेत नियमबाह्य सहभागाबाबत कारवाईसत्र

Onion Farming : अतिवृष्टीमुळे कांदा रोपवाटिकांची अवस्था बिकट

SCROLL FOR NEXT