Kolhapur Rain agrowon
ताज्या बातम्या

Kolhapur Rain : पंचगंगा नदी इशारा पातळीकडे, एका दिवसाच्या पावसाने ५३ बंधारे पाण्याखाली

Panchganga River : कोल्हापूर जिल्ह्यात मागच्या २४ तासांत झालेल्या पावसाने तब्बल १० ते १२ फुटांनी पंचगंगा नदीची पाणी पातळी वाढली आहे.

sandeep Shirguppe

Kolhapur Orange Alert : कोल्हापूर जिल्ह्यात मागच्या २४ तासांत झालेल्या पावसाने तब्बल १० ते १२ फुटांनी पंचगंगा नदीची पाणी पातळी वाढली आहे. दरम्यान हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार आज जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर रात्रीच्या सुमारास पंचगंगा नदी आपल्या पात्राबाहेर पडली असून पंचगंगा नदीची पाणी पातळी आज (ता.२०) सकाळी ९ वाजता ३३ फूटांवर होती. पंचगंगा नदी इशारा पातळी ३९ फुटांवर आहे तर धोका पातळी ४३ फुटांवर आहे.

दरम्यान NDRF ची पहिली तुकडी देखील कोल्हापुरात दाखल झाली आहे. तर घाटमाथ्यावर होत असलेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील अनेक नद्यांना पूर आला आहे. शाहूवाडी, गगनबावडा, आजरा, राधानगरी यासह धरण क्षेत्रात अतिवृष्टी झाली.

राधानगरी धरणात ६२.६१ % पाणीसाठा झाला आहे. यामुळे धरणाच्या पॉवर हाऊस मधून १२०० क्युसेक पाण्याचा विसर्ग भोगावती नदीपात्रात सुरू करण्यात आला आहे.

आतापर्यंत ५१ बंधारे पाण्याखाली गेले आहेत तर अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. पंचगंगा नदीवरील शिंगणापूर, राजाराम, सुर्वे, रूई, इचलकरंजी, तेरवाड, शिरोळ. भोगावती नदीवरील हळदी, राशिवडे, सरकारी कोगे, खडक कोगे. कासारी नदीवरील यवलूज, पुनाळ तिरपण, ठाणे आळवे, कांटे, वालोली. हिरण्यकेशी नदीवरील साळगांव, सुळेरान, चांदेवाडी, दाभिळ, ऐनापूर.

घटप्रभा नदीवरील पिळणी, बिजूर-भोगोली, हिंडगांव, कानडे- सावर्डे, अडकूर. वेदगंगा नदीवरील निळपण, वाघापूर, कुरणी, बस्तवडे, म्हसवे, गारगोटी, सुरूपली, चिखली. कुंभी नदीवरील कळे, शेनवडे, वेतवडे, मांडूकली.

वारणा नदीवरील चिंचोली, माणगांव, तांदूळवाडी. कडवी नदीवरील भोसलेवाडी, कोपार्डे, शिरगांव, सवते सावर्डे. धामणी नदीवरील सुळे. तुळशी नदीवरील बीड असे बंधारे पाण्याखाली गेले आहेत.

जिल्ह्यातील आजरा तालुक्यामध्ये हिरण्यकेशी नदीवरील कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यावर पाणी आल्यामुळे नवले देवकांडगाव कोरेवडे, साळगाव मार्ग बंद करण्यात आला असून पर्यायी मार्ग बाचनी पेरंडोली मार्गे वाहतूक सुरू आहे.

शिरोळ तालुक्यातील शिरोळ केटीवेअर वर दोन फूट पाणी आल्याने चिंचवाड, शिरोळ ,कुरुंदवाड, बस्तावाड, अकिटवाड, खिद्रापूर हा रस्ता बंद करण्यात आला असून पर्यायी मार्ग हा शिरोळ कुरुंदवाड राष्ट्रीय महामार्ग १५३ वळवण्यात आला आहे.

गगनबावडा तालुक्यातील मोरेवर पाणी आल्याने बाजार भोगाव किसरूळ ते कांजिर्डा घाटात मिळणाऱ्या मार्ग हा बंद करण्यात आला असून या मार्गावरील वाहतूक थांबवण्यात आली आहे.

तर करवीर तालुक्यातील शिंगणापूर बंधाऱ्यावर पाणी आल्याने हा रस्ता वाहतुकीस बंद करण्यात आला असून आंबेवाडी चिखली मार्गे सध्या वाहतूक सुरू आहे. तर चंदगड तालुक्यातील घटप्रभा नदीवरील इब्राहिमपूर पुलावर तीन फूट पाणी आल्याने कानुर कुरणे गवसे अडकूर रस्त्यावर वाहतूक वळवण्यात आले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Ativrushti Madat: २ ते ३ हेक्टरच्या नुकसानीपोटी १२० कोटींची मदत मंजूर; ८ जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना मिळणार मदत

Rabbi Anudan GR : रब्बी हंगामासाठी प्रति हेक्टरी १० हजार रुपयांचा शासन निर्णय जारी; मदत कोणत्या जिल्ह्यांसाठी?

Crop Loss Compensation: अमरावतीला दिलासा; अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी ५७० कोटींची मदत जाहीर

Crop Advisory: कृषी सल्ला : राहुरी विभाग

Rabbi Anudan Scheme : हेक्टरी १० हजार अनुदानासाठी १७६५ कोटी रुपये मंजूर; ७ जिल्ह्यांतील २१ लाख शेतकऱ्यांना मिळणार मदत

SCROLL FOR NEXT